Author Sangieta Devkar

Abstract Inspirational

3  

Author Sangieta Devkar

Abstract Inspirational

एज इज जस्ट अ नंबर

एज इज जस्ट अ नंबर

5 mins
208


वनिता,अग तू नुसतीच काय बघत राहिली आहेस, फक्त विंडो शॉपिंग करायची का तुला? घे ना तुझ्यासाठी काही.

सुधा बोलली.

सुधा अग काय घेवू मी मला काही या कॉस्मेटिक मधल समजत नाही.मी कधी काही वापरले ही नाही ग.

वनिता आता आपली वाटचाल पन्नाशी कडे सुरू झाली,या वयात वेगवेगळे स्किन टोनर,रिकल फ्री क्रिमस, विंटर बॉडी लोशन हे वापरायचे असते .त्यामुळे आपली स्किन तरुण राहते लवकर सुरकुत्या पडुन ओघळ त नाही.

सुधा आता तूच मला काहीतरी घेवून दे.

सुधा ने मग एक रिंकल फ्री अँटी एजेंट क्रीम वनिता साठी घेतली.ही बघ क्रीम सकाळी अंघोळी नंतर लावायची ,याने आपली स्किन टाईट राहते.

सुधा अग पण त्याची किंमत बघ ना,किती महाग आहे ते.

वनिता यार घे काही ही होत नाही .अशी कशी ग तू, स्वतः साठी कधी तरी खर्च नको का करायला?

वनिता ने मग गपचुप ती क्रीम घेतली.थोडा वेळ मॉल मध्ये फिरून सुधा ने तिच्या साठी बरीच खरेदी केली.वनिता ने मात्र फार कमी केली .दोघी कॉफी प्यायला आल्या.


वनिता ,आता या वयात आपण आपल्या बॉडी आणि स्किन कडे जास्त लक्ष द्यायला हवे ग.तरुण पणी चा तो चार्म टिकवून ठेवायला हवा ,नाहीतर लवकर आपण म्हाताऱ्या दिसायला लागु.

सुधा अग वय तर वाढत राहणार हा निसर्गाचा नियम आहे,त्यात आपण का ढवळाढवळ करायची? आणि अस वरून काही लावून आपल वय थोडीच लपणार आहे का?

वनिता आजकाल इतके कॉस्मेटिक बाजारात आले आहेत की त्यांच्या वापरा मुळे आपल वय खरच खूप कमी दिसते.आपण तरुण आणि सुंदर दिसू लागतो.तुला मागेच मी बोलले होते जरा, पार्लर वैगेरे जात जा.ब्लिच फेशियल कर.पण तुला काहीच आवडत नाही.

सुधा मला ते पार्लर मध्ये फेशियल करायला नाही आवडत आणि किती पैसे घेतात ते.त्या पेक्षा आहे अशी मी छान दिसते की.

वनिता,अग या वयात आपण सुंदर नाही दिसलो तर आपल्याला इतर बायका कडे बघून कॉम्प्लेक्स यायला लागेल.विचार कर आता एक दोन वर्षातच तुझ्या डोळ्यां खाली डार्क सर्कल्स वाढले, ऑलरेडी ते आहेतच तुला.स्किन अगदी लूज दिसू लागली ,चेहरा आकर्षक नाही राहिला तर , विनय ला ही तुझ्यात इंटरेस्ट वाटेल का? रिया आणि समीर ला आपली आई गबाळी वाटत राहणार.आणि कोणत्या ही वयात स्त्री ला आपण आकर्षक आणि सुंदरच दिसावं असं मनोमन वाटत असते.तुला नाही वाटत का वनिता?

वाटते ग पण मग कशाला इतका खर्च करायचा, तो ही एकटी साठी अस वाटत राहते.

वनिता अस काही नाही.आता मुल मोठी झाली आहेत.तुझा नवरा चांगला कमवतो.आणि तुझे सेविंगज असतील ना मग.?


हो ग सुधा,रिया ची दहावी म्हणून शाळेतला जॉब सोडून दिला तशी काही गरज ही नव्हती.माझे सेविंग आहेत बऱ्या पैकी.

मग आता स्वतः साठी खर्च कर.दर महिन्याला फेशियल,ब्लिच आणि हेयर कलर सुद्धा करत जा.आपण सुंदर नाही दिसलो की मग पुरुष बाहेर शोधत राहतात सौंदर्य आणि बायको मधला इंटरेस्ट संपून जातो.

नाही ग विनय तसा नाही ,त्याच खूप प्रेम आहे माझ्यावर.

तरी सुद्धा वनिता तू अपटुडेट रहा.

वनिता मग घरी आली.सगळ्या शॉपिंग बॅग रिकाम्या करत होती ."आई अग हे काय कसली ही क्रीम आणली आहेस? .रिया ने ते अँटी एजेंट क्रीम बघून विचारले.

अग ते या वयात माझ्या साठी लावायला क्रीम आणली आहे. सुधा मावशी नेच घेवून दिली.

आई अग किती महाग आहे ही,आणि असे पण अशा क्रीम वापरून काही फायदा होत नाही.निदान मला विचारायचे तरी होते,मी ऑनलाईन अगोदर सर्च केले असते लोकांचे रिविव्यू पाहिले असते मग घेतले असते.


रिया आता आणली आहे तर बघते वापरून.

वनिता अग कोणी काही सांगितले म्हणून लगेच काही घ्यायचे नसते.सासू बाई बोलल्याच.

वनिता आपल सामान घेवुन रूम मध्ये गेली.

रात्री तिने ते अँटी एजेंट क्रीम चेहर्या वर लावले.काय ग वनिता किती तेलकट दिसतो तुझा चेहरा,काय लावलेस हे.विनय म्हणाला.

अहो,ते दुपारी क्रीम आणली ना.तीच लावली.

काय होते या क्रीम ने?

अहो आता या वयात माझी स्किन डल होणार , सुरकत्या पडणार,त्या साठी ही क्रीम,हे लावल्याने चेहरा रिकल फ्री राहतो.

सकाळी अंघोळी नंतर वनिता ने दुसरे एक मॉशचरायझर लावले.

वनिता तोंडाला काय बाम बिम लावलास काय ग.किती पीचपीच दिसतो चेहरा तुझा.आई बोलल्या.

समीर ही किचन मध्ये आला,आई अग कसला हा वास आहे हा,उग्र औषधा सारखा..

अरे तुझ्या आई ने कसले से रिकल फ्री लोशन लावले आहे. विनय आत येत म्हणाला.

वनिता पटकन बाथरूम मध्ये गेली आणि पाण्याने चेहरा खसाखसा धुवून टाकला.तिच्या डोळ्यात पाणी आल.इतकी महाग क्रीम मी आणली आणि हे सगळे जण मला नाव ठेवत आहेत.वनिता विचार करत होती.

विनय रूम मध्ये आला.काय ग काय झाले इथे का बसली आहेस वनिता?

काही नाही मी टिफीन भरते या आवरून तुम्ही.वनिता रूम मधून बाहेर गेली.तिचा उतरेलेला चेहरा त्याचा नजरेतून सुटला नाही.


संध्याकाळी विनय घरी आला.वनिता ने दोघांचा चहा बनवला.वनिता आवरून घे.आपण जरा फिरून येवू विनय म्हणाला.

आता कुठे बाहेर आणि रात्री चा स्वयपाक आहे करायचा.

असू दे येवू आपण लगेच.जा आवरून ये.


वनिता मग छान आवरून आली.दोघे कार मधून पर्वती वर आले.छान सूर्यास्त चा नजारा टेकडी वर होता. केशरी रंगात सूर्य न्हावून गेला होता थंड हवा होती.एका झाडा खाली विनय आणि वनिता बसले.वनिता,हे बघ झाडाचे पान..अर्धे हिरवे आणि अर्धे पिवळे..

हो,आता वसंत ऋतू ची चाहूल लागली ना,म्हणून ही पानगळ होऊन नवीन पालवी फुटेल झाडाला.

वनिता तरी सुद्धा हे पान किती सुंदर दिसते हो ना.आणि हे बघ पूर्ण पिकलेले पिवळे पान हे ही सुंदरच दिसते .विनय एक पान दाखवत म्हणाला,आणि हा सूर्यास्त पण बघ किती सुंदर दिसतो, सूर्य अस्ताला चालला आहे तरी!

हो,सुरवातीला असणार हिरव गार पान,मग अर्धवट पिवळे हिरवे आणि नंतर पूर्ण पिवळे पान हा पानाचा प्रवास असतो.

अस असताना देखील हिरव आणि पिवळ पान आप आपले सौंदर्य लेऊन छानच दिसतात नाही का?

हो विनय बरोबर आहे तुमचे म्हणणे.

मग मला सांग वनिता जे जस आहे तसेच ते सुंदर आहे अस आपण मानायला नको का? आपल वय ही वाढत जाणार बरोबर,पण त्या सोबत होणारे बदल ते ही आनंदा ने नको का स्वीकारायला? हे अस वरून क्रीम वैगेरे लावून आपण आपल वय का लपवायचे? त्या त्या वयातले सौंदर्य वेगळेच असते.हा तू योगा,वॉक आणि चांगला सकस आहार घे त्याने तुझी तब्येत उत्तम राहील आणि त्या सोबत सौंदर्य ही छान राहील.वय लपवण्याचा अट्टाहास कशा साठी,तर माझ्या नजरेत तू सुंदर दिसावीस म्हणून ना.अग तू मला आता ही तितकीच प्रिय आहेस जितकी लग्न झाल्या वर होतीस.माझं आज ही तुझ्या वर पहिल्या इतके किंबहुना जास्तच प्रेम आहे वनिता.तुझ्या चेहर्याचा चार्म गेला, रिंकल आले म्हणून माझं तुझ्या वरच प्रेम कमी नाही होणार ग.शेवटी प्रेम हे मना वर अवलंबून असते ना की शरीरावर..काही येते का लक्षात?

हो विनय,बरोबर बोललात तुम्ही.हे अस वरवर क्रीम वैगेरे वापरून वय लपत नसते .तेच आपल शरीर सुदृढ असेल तर आपोआप चेहरा ही सुंदरच दिसतो.हसतच वनिता म्हणाली.दोघे मग घरी आले.


आई मी उद्या तुझी पार्लर ची अपॉइंटमेंट घेतली आहे.घरीच ब्युटिशियन येईल.तुला फेशियल ब्लिच जे करायचे करून घे.रिया म्हणाली.

वनिता ने विनय कडे पाहीले. विनय ने हसत मानेनेच तिला होकार दिला.


समाप्त 



Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract