दलितांचा राजा.....
दलितांचा राजा.....
14 एप्रिल परमपूज्य विश्व रत्न ज्ञान सुर्य डाॅकटर भीमराव रामजी आंबेडकर यांची 131वी जयंती 🙏INDIA that is a bharat व आम्ही भारताचे नागरिक आम्ही भारतीय या वचनाने सुvरवात होणारी सर्वोच्च राज्य घटना डाॅकटर आंबेडकर यांनी ज्या दिवशी आपल्याला दिली त्या दिवशी आपण एका नव्या समाजात नव्या नियमात नव्या राष्ट्रात प्रवेश केला.🙏त्याच्या अगोदर हजारो वर्ष इथली व्यवस्था देव व धर्म, असा देव ज्याची उत्पत्ती तोंडातून, छातीतून जांघेतून काखेतून, घामातून, इतकेच काय सुर्य, घोडा,हरण इ.इ.पासून होत होती🙏 आणि असा धर्म जिथ एका जिवंत माणसाचा दुसर्या माणसाला विटाळ होता माणूस माणसाचा गुलाम होता.🙏 डाॅकटर आंबेडकर यांनी राज्य घटना लिहीली व या सारया पांखंडी वृत्तीचा शिरचछेदच केला🙏.माणसाला आपण मानुस आहोत आपलयाला हकक व अधिकार कर्तव्य आहेत याची जाणिव होऊ लागली 🙏या एका महान व्यक्तीने दिन दुबळ्याला कोटी बांधवांना जोखडातुन मुक्त करून निळं आभाळ दाखवलं🙏.रात्र दिवस अभ्यास करून अर्थकारण धर्म, हतिहास भूगोल पंरपराचा अभ्यास करून कोट्यावधी गुलामांच्या डोळयावरील झापडं हटवली🙏 गांधीजींच्या हरीजन, व खेडयाकडे चला या ऊकतीला आव्हान देऊन जात,अंधश्रद्धा, दारिद्र्य, व विशमतेचा जन्म खेडयात होतोय दिनदुबळया दलीतांना गावकुसाबाहेर रहावे लागते त्यामुळे खरा विकास खेडयात नाही असे ठणकावून व सांगितले🙏 माणुस अंतिम आहे!🙏आर्थिक राजकिय व सामिजिक ऊत्थापनासाठी शहराकडे वळायला प्रवृत्त केले🙏 इंग्लंड हुन येताना ट्रंक भरून पुस्तक घेऊन येणारे आंबेडकरच ज्ञानाच्या जोरावर पेनाच्या टोकावर देश ऊचलू शकतात🙏 जगात सर्वात प्रभावी प्रबळ शक्तिमान हत्यार ज्ञान आहे🙏 इथल्या जुलमी व्यवस्थेवर घाव घालायला व समाज जागृती करायला ज्ञान हेच उपयुक्त आहे🙏 हे जगाला पटवून दिले.गुलामाला तो गुलाम असल्याची जाणिव करून द्या म्हणजे तो बंड करून ऊठेल.🙏 शिक्षण हे वाघिणिचे दुध आहे अशा सारखे कितीक प्रेरणा दायी विचार मांडले🙏.महिलांना दुययम लेखणे अतिशय खटकत असे त्यासाठी त्यांनी हिंदू कोड बील तयार केले.🙏 कामगारांचे कामाचे अवाजवि तास कमी करून आठ तासांवर आणले त्यांना पी,एफ,पेन्शन भत्ता सुरू करण्याची तरतूद केली🙏 समस्त महिला मग ती सवर्ण असो वा शूद्र सारयांचा सारासार विचार करून मॅटेरनिटी लीव,कामाचे तास गरोदर पणातील पगारी सुट्ट्या समान संधी या साठी प्रस्थापित सनातानी लोकांशी वाद केले🙏 इतकच नाही मंत्री पदाचा त्याग केला🙏. असा नेता कुठे झालाय का जगात?जाती व्यवस्थेचा आघात शाळेत बालवयात झाले🙏.ते अगदी परदेशातून कित्येक डिग्र्या घेऊन बडोदा संस्थानात उच्च पदाची नोकरी लागली तरिही सुरूच राहीले🙏.जरा बरे कपडे पाहुन बैलगाडीवानाने गाडीत बसवले पंरतु महाराच पोर कळल्यावर त्या क्षणी गाडीतून ऊतरून दिले रात्र भर चालत वडिलांना भेटायला सातारयाला गेले.🙏गायकवाडांच्या दरबारी सवर्ण शिपायी फाइल लांबून टेबलावर फेकत पाणी चहा दुरूनच ठेवत असत.😌आंबेडकर जहाल टिका करत प्रसंगी खड्ड्यात गेली तुमची संस्कृती तुमचा देश असे संतापुन म्हणत आक्रमक होत व्यवस्थेला भांडत🙏 पो एच डी झाले म्हणून जात बदलत नाही अशा प्रकारची बोलणी लोक सुनवत.😌😌😌😌😌तरीही व्यथित झालेले आंबेडकर हारले नाहीत .👍त्यांची कुवत इथल्या बेकार लोकांना कधीच समजली नाही पंरतु इंग्रज सरकारला समजली होती🙏 पहिल्या गोलमेज परीषदेला त्यांनी देशाचे प्रतिनिधी म्हणून आंबेडकर यांना बोलवले व भारतीय व्यवस्था व समाजापासून वेगळ करण्याचा प्रयत्न केला 🙏तेव्हा भीमराव स्पष्ट पणे,परखड पणे बोलले आमची घरातली भांडण घरात त्याचा फायदा तुम्ही घेऊ नका मी इथे समस्त भारताचा प्रतिनिधी म्हणून आलोय देशाचा विचार करणार 🙏जेव्हा जेव्हा देशाचा विचार आला तेव्हा योग्य ती बाजू ऊचलून धरली.🙏 ब्रिटिश सरकारने अस्पृषयांचे हितसंबंध जपावे यासाठी बेचाळीस च्या लढ्यात असहकार पुकारून ब्रिटिशांची बाजू घेतली.🙏सरळ गांधीजींना विरोध केला व्हाईसराॅय कौन्सिल मध्ये त्यांना मजूर मंत्री पदांवर घेतले.🙏तर हा समान नागरी कायदा,हिंदू कोड बील,तयार करणारा व प्रज्ञा शील करूणा या बुदधाच्या शिकवणिचा धमम पेरणारा महान नेत्याला इथल्या बिनडोक लोकांनी देशद्रोही ठरविले.🙏🙏🙏🙏आंबेडकर ऐका मुलाखतीत म्हणतात निवडणूक प्रक्रियेतुन चांगले लोक तयार होत नसतील तर निवडणूकांना महत्व नाही बदल घडविण्यासाठी 👍निवडणूक आहे हे लोकांमध्ये रूजले पाहीजे 👍लोकांना उमेदवार निवडायच स्वतंत्र आहे तरीही एखाद्या पक्षाने बैलाला मतदान करायच अहावन व सोबत आमिश दिल तर?तो बैल नककी कोणाच प्रतिनिधित्व करतोय याचा विचार करतात का?इथली समाजव्यवस्थाच विसंगत आहे 😌विशमतेवर आधारीत आहे जोपर्यंत इथ जातींचा पाया मजबूत आहे तोपर्यंत व्यवस्था भककम ऊभी रहाणारच नाही 😌भारत हे राष्ट् होणार नाही.14 एप्रिल 1891 महु जन्मलेल्या भीमराव रामजी आंबेडकर यांनी 1891मधे मॅट्रीक परीक्षा पास केली.😐बडोदा नरेश सयाजीराजे गायकवाड यांची फेलोशिप मिळवुन मुंबई विशवविदयालयातून बी.ए. पास केले. (संस्कृत भाषा शिकायला विरोध केलयाने पारशी भाषा घेऊन )😐पुन्हा सयाजी नरेश यांच्याच सहकार्याने 1915साली अमेरीकेतील कोलंबिया विश्वविद्यालयातून एम .ए .केले 1916साली अमेरीकेतच पी. एच. डी .चे शिक्षण असा हा साडेआठ वर्षांचा अभ्यासक्रम,दिवसाचे अठरा वीस तास अभ्यास करून अवघ्या अडीच वर्षात पुर्ण केला.👍👍 लंडन विद्यापीठातून बी .एस. सी. प्राप्त करणारे सर्वोच्च गुणवत्ता असलेले आजवरचे ते एकमेव भारतीय विद्यार्थी ठरले 👍👍.लंडन विद्यापीठात त्यांच्या स्मरणार्थ पुतळा ऊभा करून त्यांच्या नावे आभयासिका, सुरू केली.😐😐भारतीय संविधानाचे उत्कृष्ट लेखन केले म्हणून अमेरीकेतील कोलंबिया विश्वविद्यालयाने त्यांना 5जुन1952साली एल.एल.डी. हि पदवी बहाल केली.👍🙏 भारतीय घटनेचे शिल्पकार, मंत्री मंडळ सदस्य, राज्यसभा सदस्य,भारताचे प्रमुख नागरीक,महान समाज सुधारक,मानवी हक्काचे आधारसतंभ, व महापराक्रमी पुरूष अशा विविध स्वरुपाचे विश्लेशन असलेले मानपत्र देऊन गौरविले आहे.🙏👍👍असे हे अद्वितीय अतुलनीय व्यकतीमत्वाने जगाला आपले प्रभावी विचार दिले.विशेषता दलीत दुबळ्या शोषितांना अवाहन केले तुम्ही शिका✍✊👍 संघटीत व्हा🤝👍✊ संघर्ष करा💪. 👍आकाशातील ग्रह तारे आपले भविष्य नाही ठरवत आपल्या मनगटाचीच्या जोरावर ते ठरते 👍अन्याय करणारयां पेक्षा तो सहन करणारा जास्त गुन्हेगार आहे👍विश्वास स्वतावर ठेवा देवावर नाही👍धर्म माणसांसाठी आहे माणूस धर्माकर्ता नाही👍तुम्ही वाघासारखे बना म्हणजे तुमच्या वाट्याला कोणिही जाणार नाही 👍आपले दारिद्र्य वा गरीबीची लाज नका वाटू देवू लाज वाटूदया दुर्गुणांचीमंदिराच्या रांगा वाचलयात जातील तेव्हा या देशाला महाशकती बनन्या पासून कोणि रोखू शकणार 👍नाही माणसापेक्षा पुस्तकांच्या सहवास मोलाचा 👍शरीरात रकताचा शेवटचा थेंब असे पर्यंत स्वातंत्र्य लढा 👍जो मनुष्य मरणाची भीती बाळगतो तो जिवंत पणीच मेलेला असतो जो मरणाला घाबरत नाही तो कधीच मरत नाही.👍अन्याय विरूद्ध लढणयाची ताकद आपलयात यायला हवे त्यासाठी शिक्षण सभिमान स्वावलंबन व एकाकी चालण्याची ताकद हवी 👍जी माणस पायाने चालतात ती अंतर कापतात जी डोकयाने व बुद्धीने चालतात तीच आपल धयेय गाठतात. असे कीतीतरी मोलाचे प्रेरणादायी बहुमोल विचार डाॅकटर भीमराव रामजी आंबेडकर यांनी जगाला दिले....अशा या प्रज्ञा सुर्य ज्ञानी महामानवाच्या अखंड ज्ञानतेजाचा एक एक किरण समेटायला ऊभा जन्म कमी पडेल.🙏🙏🙏🙏🙏🙏संदर्भ - डाॅ. भीमराव रामजी आंबेडकर समग्र वाड्मय. मा. उत्तम कांबळे सर.मा. मा.प्रतिमा परदेशी.
