दिवाळीभेट
दिवाळीभेट
नवऱ्याने सासूसाठी दिवाळी भेट (आवश्यक) म्हणून जरा महागडा स्वेटर घेतला म्हणून सुलू जाम भडकली . 'महातारीला घरबसल्या कशाला हवा एवढा महाग स्वेटर!' असे म्हणून ती फणकाऱ्याने साडयांच्या दालनात निघून गेली.
तिथेच सुलूला तिची वहिनी भेटली. वहिनीदेखील तिच्या सासूसाठी खरेदी करत होती. वहिनीने आई(सासू)साठी दोन काठपदराच्या साडया, हातमोजे, पायमोजे, स्वेटर, मफलर, शॉल आणि उबदार रजाई अशी रग्गड खरेदी केली होती.
आनंद झाल्याचा दाखवत सुलू घाई-घाईने तिथून दुसऱ्या दालनात गेली.
