" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Abstract Action

3.5  

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Abstract Action

धर्मांतराची मुळीच आवश्यकता नाही

धर्मांतराची मुळीच आवश्यकता नाही

2 mins
134


धर्मांतराचा मुद्दा घेऊन मातंग समाजाची दिशाभूल करणारे सर्व ते कोणी विचारवंत नाहीत तर तो केवळ त्यांचा स्वार्थ नि स्वार्थच होय. ही या दलालांची शुद्ध दलाली होय. आज जे लोक धर्म नि धर्मांतरावर बोलत आहेत तो केवळ मातंग समाजाची दिशाभूल करण्याचा कुटील डाव आहे, शुध्द दलाली होय, एक कूटनिती आहे. या दलालांना ना धर्म कळतो ना धर्मांतर. हे सर्व दलाल आहेत यांना ओळखले पाहिजे... आपण आपला समाज या दलालांपासून वाचवला पाहिजे, टिकवला पाहिजे.. आपणाला धर्मांतराच्या खाईत घालणारे कसाई हे काही कोणी, येशू ख्रिस्त, गुरू नानक, वर्धमान महावीर, गौतम बुद्ध, बाबासाहेब नाहीत...


मातंग समाजाच्या धर्मांतराची कूटनीती आखणारे बेईमान, दलाल, कसाई जे कोणी आहेत त्यांनी मातंग समाजाच्या उन्नतीसाठी, प्रगती, परिवर्तन, समाजाच्या न्याय, हक्कासाठी, उद्योजकता, तरुणांसाठी, शिक्षणासाठी, अन्याय निवारण करण्यासाठी, दारिद्र्य निर्मूलनासाठी काय केले आहे? मातंग समाजाच्या उन्नतीसाठी आपले योगदान काय आहे ते त्यांनी दाखवून द्यायचे.. मातंग समाज संघटित करून, तो टिकला पाहिजे, त्यांच्या अस्तित्वाचा मार्ग काय यासाठी तुम्ही काय प्रयत्न केले? मातंग समाजाच्या अस्तित्वाची जाणीव असणाऱ्यांनी या समाजाच्या उन्नतीसाठी, संघटनासाठी, शैक्षणिक, औद्योगिक, अशी कोणती भूमिका, कामगिरी केली किंवा योजना आखली ते सांगावे.. संबंध ना धर्माचा... शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, हाच मूलमंत्र आहे..


धर्मांतरावर बोलणाऱ्यांनी मागील वीस वर्षांत ज्यांनी धर्मांतर केले, करून घेतले त्यांना कुठे वाऱ्यावर सोडून दिले? त्यांचे अस्तित्वच उरले नाही हे का ते सांगावे. अस्तित्वासाठी धर्मांतर नाही. धर्मांतरावर बोलणारे कोणी हे धर्म संस्थापक नव्हेत. ही दलाली, कुटील डाव ओळखून वेळीच सावध होणे हेच शहाणपणाचे, अस्तित्वाचे पाऊल आहे.


धर्मांतर हा डाव आहे अस्तित्व संपविण्याचा. आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी धर्मांतराचा पुळका असणाऱ्यांना आपल्या अस्तित्वासाठी आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी, गरीबी, बेकारी, निर्मूलनासाठी, उद्योग, नोकरी, शिक्षणासाठी मदत मागा. मातंग समाजाच्या अस्तित्वासाठी त्याग, नि योगदान हवे धर्मांतर नको. धर्मांतर केले ते ना घर का ना घाट का... अशी अवस्था होऊन रस्त्यावर उतरले आहेत. धर्मांतर केले त्यांचे अस्तित्वच चिंतेचा विषय बनला आहे. अगोदर त्यांना न्याय देऊन त्यांचे अस्तित्व निर्माण करावे. मातंगांचे अस्तित्व टिकवण्यासाठी धर्म, धर्मांतराची गरजच नाही. नियोजन, संघटन, शिक्षण, नि उपाययोजना हवी..


जय लहुजी!

जय अण्णा!


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract