Sujit Falke

Abstract Fantasy Inspirational

3  

Sujit Falke

Abstract Fantasy Inspirational

डिजिटल इंडिया फोर न्यु इंडिया

डिजिटल इंडिया फोर न्यु इंडिया

4 mins
133


             बलसागर भारत होवो विश्वात शोभुनी राहो, असा हा बलशाली भारत नक्कीच अखंड विश्वाचा कोहिनूर हीरा आहे. आमचा आधुनिक भारत आज नवीन नवीन विक्रम करतो आहे. ज्याने गुलामगिरीच्या बेड्या क्रांतीच्या मशालीने नेस्तनाबूत केल्या आज तोच भारत जगाला शांती आणि सुंदर जीवनाचे सुवर्ण स्वप्न दाखवत आहे. देदीप्यमान इतिहास असणारा भारत आधुनिक काळात जगाशी स्पर्धेत मागे नाही हेही चंद्रयान ३ मोहीम यशस्वी करून आपण सिध्द केले आहे. शांतीच्या नव्या सिमा आम्ही जगाला सांगितल्या. योगाभ्यासाची एक अलौकिक देणगी आम्ही जगाला दिली. साधे सरळ आम्ही भारतीय जगाला 'वसुदेव कुटुंबकमचा' संदेश देण्यात नेहमी पुढाकार घेतो. जयतु जयतु भारत महाशक्ती असेच आपसूक शब्द माझ्या भारत देशाच्या गौरवात उद्गारले जातात हे काही उगीच नाही.

                काळ संगत बदल ही विकासाची नांदी असते. तुम्ही विकासाचे नवनवीन आयाम जेव्हा स्विकारता तेव्हा तुमचा विकास जलद गतीने घडत जातो. याच विकासाची कास धरून भारताने आधुनिकतेकडे वाटचाल केली आहे. आणि आज पहा प्रत्येक क्षेत्रात आपण आपले तंत्रज्ञान पणाला लावून विकसित होऊ पाहत आहोत. वाहतूक आणि दळणवळण हे तर आधुनिक युगात खुपच सुकर झाल आहे. संदेशवहनासाठी समाजमाध्यमे खुप मोलाची भूमिका बजावताना दिसतात. डिजिटल भारताने स्विकारलेले डिजिटल चलन पध्दती, डिजिटल पेमेंट, डिजिटल शेती उतारे आणखी काय काय भारताला नक्कीच प्रभावित करीत आहे. डिजिटल बॅंकिंगने तर भारतात आर्थिक क्रांती घडवून आणली आहे. आज प्रत्येक नागरिक डिजिटल तंत्रज्ञानाचा पर्याय वापरून आपले आर्थिक व्यावहार करतो. यामुळे चलनाची छपाईची बचत अन त्याचा व्यावसायिक व्यावहारिक वापर करताना भारतीय नागरिक दिसत आहे. नेट बॅंकिंग, भिम ॲप, ऑनलाईन व्यावहार अशा किती तरी नवीन संकल्पना भारतीयानी लवकर आत्मसाथ केल्या आहेत.आज लहान सहान व्यावहारासाठी सुद्धा डिजिटल पेमेंट केले जाते. साधा चहा जरी घेतला तरी देखील लोक डिजिटल पेमेंट वापरुन आपला व्यावहार पूर्ण करतात. डिजिटल इंडिया ही भारत सरकारने एक संपूर्ण देशाला डिजिटल देशात रुपांतर करण्यासाठी १ जुलै २०१५ रोजी भारत सरकारने सुरू केलेली मोहीम आहे. सरकारी विभाग आणि आघाडीच्या कंपन्या (राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर) एकत्रित करून भारतीय समाजाला डिजिटल सशक्त बनवण्याचा हा एक उपक्रम आहे.या देशाचे डिजिटलायझेशन करण्याचा मुख्य हेतू भारतातील नागरिकांपर्यंत सर्व सरकारी सेवा सहज पोहोचवणे हा आहे.

                खरच तंत्रज्ञानात अशिक्षित आमचा भारतीय समाज खरच किती पुढारला आहे ? आज प्रत्येक क्षेत्रात भारताने तंत्रिकदृष्ट्या प्रगती केलेली आहे. शेती, पशुपालन, दुग्धव्यावसाय,मत्स्यपालन, व्यावसाय, शिक्षण, रोजगार, संदेशवहन, बॅंकिंग, कंपनी काम, कारखानदारी, सरकारी कामे अशा प्रत्येक क्षेत्रात डिजिटल भारत झळकतो आणि आपल्याला आपल्याच प्रगतीचा सार्थ अभिमान वाटतो.शेती भारताचा पारंपरिक व्यावसाय परंतु आज आधुनिकतेची कास धरत आमचा शेतकरी सर्व काही तांत्रिक पध्दतीने करत आहे.शासनाच्या विविध योजना त्यांची माहिती घेउन आपल्या शेतीची प्रगती करत आहे. बाजारभाव , हवामान, खरेदीविक्री, बियाणे खरेदी विक्री अशा शेतीच्या सर्वच बाबतीत शेतकरी तंत्रज्ञानाचे सहाय्य घेत आहे.

             डिजिटल इंडिया मोहिमेचा एक प्रमुख घटक म्हणजे सरकारी सेवा आणि इतर आवश्यक सेवा डिजिटल पद्धतीने पोहोचवणे. डिजिटल इंडिया मोहिमेअंतर्गत भारत सरकारच्या अनेक सेवा डिजिटल करण्यात आल्या. या योजनेअंतर्गत सर्व मंत्रालये जोडली जातील आणि सर्व विभाग आरोग्य सेवा, बँकिंग, शिक्षण, शिष्यवृत्ती, गॅस सिलिंडर, पाणी आणि वीज बिल आणि न्यायिक सेवा यासारख्या मूलभूत सेवा लोकांपर्यंत पोहोचू शकतील. लोकांचे दैनंदिन आर्थिक व्यवहारही डिजिटल मोडमध्ये रूपांतरित झाले. व्यवहारांमध्ये पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी आणि भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी सर्व पैशांचे व्यवहार ऑनलाइन केले जात आहेत.भारतातील लोकांच्या पूर्ण सहभागासाठी त्यांच्याकडे जी योग्यता असणे आवश्यक आहे त्याला डिजिटल साक्षरता म्हणतात. डिजिटल उपकरणे प्रभावीपणे वापरण्यासाठी आवश्यक मूलभूत वर्तन, ज्ञान आणि कौशल्ये अनिवार्य आहेत. डेस्कटॉप पीसी, लॅपटॉप, टॅब्लेट आणि स्मार्टफोन ही डिजिटल उपकरणे आहेत जी संवाद साधण्यासाठी, व्यक्त करण्यासाठी, सहयोग करण्यासाठी आणि समर्थन करण्यासाठी वापरली जातात. डिजिटल साक्षरतेच्या मिशनमध्ये सहा कोटी ग्रामीण कुटुंबांचा समावेश करण्यात आला आहे. सन २०१५ पासुन सुरु झालेली ही डिजिटल क्रांतीने आपल्याला खुप काही प्राप्त करून दिले आहे. आज बॅंक व्यावहारासाठी तुम्हाला तासनतास रांगेत उभे रहावे लागत नाही. आज तुम्हाला एखाद्या संदेशासाठी कोणाच्या पत्राची किंवा तारेची वाट पहावी लागत नाही. आज शिक्षणासाठी महागड्या कॉलेज किंवा खाजगी शिकवण्या न लावता घरी बसुन पाहिजे तो अभ्यास करु शकता. कधी काळी एखाद्या शहरा पुरती असणारी नेटवर्क सुविधा आज गावोगावी उपलब्ध आहे. आज बेरोजगारांसाठी नवे नवे डिजिटल विभाग संधी उपलब्ध करून देत आहे. आज तुम्हाला हवी असणारी गोष्ट चुटकी सरसी तुम्ही घर बसल्या ऑनलाईन बोलावु शकता. वैद्यकीय सुविधा तुम्ही घरी बसल्या मागवु शकता. ऑनलाईन डॉक्टर तुम्हाला चोवीसतास उपलब्ध आहे. एखादा व्यवहार पूर्ण करण्यासाठी तुम्हाला बॅंकेची आवश्यकता नाही. डिजिटल पेमेंट करून व्यावहार केला जातो. पाणी, वीज, गॅस यांची बील तुम्ही घरी बसुन भरु शकता. जागतिक स्तरावरील बातम्या देश विदेशाच्या बातम्या तुम्ही तुमच्या टेलिव्हिजनवर पाहु शकता. असे अनेक बदल आपल्या जीवनात डिजिटल भारतामुळे झाले आहे.


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract