Sujit Falke

Classics Fantasy Inspirational

3  

Sujit Falke

Classics Fantasy Inspirational

माझ्या स्वप्नातील भारत

माझ्या स्वप्नातील भारत

6 mins
202


माझ्या स्वप्नातील भारत


भारत, सृष्टीरचिता ब्रम्हदेवास ब्रम्हमुहूर्तावर पडलेल एक सुंदर दिव्य स्वप्न.एक असा भुलोक जिथे स्वर्गाचेही सौंदर्य लाजेल, कल्पतरुला ही हेवा वाटेल आणि कामधेनुलाही विसर पडेल असा अलौकिक, अदभुत आणि सर्वांगसुंदर भुलोक. इंद्र ,शशी , सुर्य , वरुण, अग्नी अशा तमाम देवतांना हवाहवासा वाटणारा भारत. मानवी सहसबंधांचा सोहळा, जिव्हाळ्याच्या नात्यातील ओलावा, कुटुंबप्रमाद पध्दतीचा मूर्तीमंत देखावा,ज्ञानाचा महासागर, भक्तीचा सार, चैतन्याचा अलोट समुद्र म्हणजे भारत.इतिहासाच्या खुणा, शौर्याच्या कथा, पराक्रमाच्या गाथा, भुरुपांच्या जथा, महात्म्याची भुमी, संतांची भुमी, कर्मवीर नरवीर नरश्रेष्टांची भुमी. आकाशानेही जिच्याकडे दान मागव अशी भुमी. जिच्या कणाकणात रंध्रा रंध्रात स्वाभिमान, अभिमान आणि ज्वाज्वल्य मातृभक्ती काठोकाठ भरलेली आहे अशी ही भुमी. वर्णन करताना ग्रंथ संपदा वेद पुराणे स्तब्ध होतात ती ही भुमी. प्रत्येक जीव या भुलोकीच्या स्वर्गावर जन्मासाठी आसुसलेला राहतो ती ही भुमी. तत्वज्ञान आणि गूढ ब्रम्हज्ञान यांची उकल करून देणारी जगजेत्ती भुमी. या भारत भुमीची तुलना करताच येणार नाही. ना इहलोकी ना परलोकी. भाग्यवान जीव तोच जो या ऋषीतुल्य भुमीवर जन्मला. ज्या भूमीची माती भाळी लावली तर क्षणात आत्मबोध व्हावा जिच्या नुसत्या पदस्पर्शाने अंतकरणात दिव्यत्वाची प्रचिती यावी.अशी अपार शक्तिशाली, सामर्थ्यशाली, गौरवशाली, भाग्यशाली भुमी म्हणजे भारत भुमी.

     भारतभुमीला एक वैभवशाली परंपरा चालत आलेली आहे ती म्हणजे होणारा बदल तीन जलदगतीने स्वीकारला आहे. अनेक क्रांती आणि आक्रमणे तीने लिलया पेललेली आहे. आज असा भारत जगापुढे येतोय जो खुप वेगळा आहे. ज्याची महती दुरदुर पर्यंत पसरलेली आहे. जुन्या काळी जसे विद्येचे माहेर घर भारत होता तस आता भारत हाच जगापुढील एकमेव पर्याय आहे. सर्वच देशाना भारत आदर्श वाटतो. खुप साऱ्या गोष्टी जगाने भारताकडून स्विकारल्या आहेत ज्या की काळाची गरज आहे. आध्यात्मिक शक्ती, योगशक्ती याची उज्ज्वल परंपराच भारताने बहाल केली. सर्व देशानी एक मताने भारत देशाला आपला आदर्श म्हणून स्विकारले आहे. असा देश जिथे कशाचीही कमतरता नाही. ज्या काही गोष्टी आहेत त्या परिपूर्ण आहेत आणि देशाच्या विकासाला सहाय्यभुत आहेत. डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या स्वप्नातील भारत आज आस्तित्वात आहे. ना सीमावाद ,ना प्रांतवाद ,ना भेदभाव, ना जातीयता, ना गरिबी, ना बेरोजगारी काही काही नाही. एका नुतन नवरी सारखी ही भुमी सजली आहे . खुप काही बदल झाला आहे या भारतात. नदीजोड प्रकल्पाने या भुमीचा एक एक कोपरा जलमय झाला आहे. येथील बळीराजा मालाची आयात निर्यात स्वतःच्या जहाजाने विमानाने करतोय यातच सर्व काही आल. शेतीचे तंत्रज्ञान इतके प्रगत की देशाचे भरणपोषण होऊन माल निर्यात होतो. शेतकरी सुखी तर देश सुखी असच काहिस घडलय. वीज पाणी रस्ते यांचे इतके समृद्ध जाळे देशात आहे की सर्वत्र सुख समृद्धी नांदत आहे. जात काय असते या नवीन पिढीला माहिती सुद्धा नाही अन जुनी पिढी त्यांना स्मरून सुद्धा करून देत नाही.

धर्म एकच भारतीय अन जातही एकच भारतीय. सर्वत्र समता आणि समानता. शिक्षणाची गंगा घराघरात, गावागावांत, खेडोपाडी अशी वाहते की एकही मुल त्यापासून वंचित नाही. शैक्षणिक क्रांती पाहण्यासाठी जगभरातील देश आपल्या देशाला भेट देतात. शैक्षणिक तंत्रज्ञान इतके प्रगत की मुले शाळेत न येताच घरी डिजिटल बोर्डवर व्हर्च्युअल क्लासरुम पाहून शिकत आहे. जगातील सर्वोत्तम शैक्षणिक तंत्रज्ञान भारताने विकसित केले आहे. पर्यटनस्थळांचा पंचतारंकीत विकास भारताने केला आहे. स्वच्छता, व्यवस्थापन आणि नियोजन याचा सर्वोत्तम नमुना भारतीय पर्यटनस्थळ विकास आहे. जागतिक वारसास्थळांचाही खुप सुंदर पध्दतीने विकास केला आहे. स्रीमुक्तीदाता म्हणून भारताकडे पाहिले जाते. भारतातील प्रत्येक क्षेत्रात भारतीय महिलानी उत्तुंग भरारी घेतली आहे. ज्ञान विज्ञान तंत्रज्ञान यात भारतीय महिलानी महिरथ प्राप्त केली आहे. भारतीय सांस्कृतिक परंपरा आणि संस्कार याची बीज आमच्या भारतीय महिलानी जोपासली आणि वाढवली देखील. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून नव्हे तर त्यांच्या पुढे जावून महिला जगात बहुमान विळवत आहे. पुरुषांना देखील याचा सार्थ अभिमान आहे. भारतीय तत्वज्ञान आणि मुल्यांची जपवणुक करण्यासाठी देशातील तरुण सरसावले आहेत आणि त्यांनी देशाचा दैदिप्यमान इतिहास तत्वज्ञान देशापुढे सार्थपणे मांडला आहे.

   राजकारण कोणत्याही देशाच्या विकासाचा कणा बनले आहे. ज्या देशातील राजकारणी धोरणी, निष्ठावान आणि दुरदृष्टीचे आहेत त्यांनी त्या देशाच्या विकासाला गती प्रदान केली आहे. भारतातील राजकारणाने ही देखील असेच अध्यक्षीय पध्दतीचा भारताने स्वीकार केला आहे. त्यामुळे पक्ष आणि नेता ही जत्रा संपली आणि राजकारण फक्त विकासाच्या मुद्द्यावर होऊ लागले. येवढे शुद्ध राजकारण की वैरभाव संपून एक निकोप स्पर्धा वाढू लागली आहे. येथील राजकारणी ना वेतन ना भत्ते घेतात फक्त जनतेच्या सेवेत चोवीसतास कार्यरत राहतात. ऱाजकारणात झालेला हा बदल म्हणजे नवभारताची नांदी आहे. निर्मळ हेतु आणि निर्मळ नीती यांचा सुरेख मेळ म्हणजे भारतीय राजकारण. महिला वर्गाचा वाढता सहभाग म्हणजे नवचैतन्य निर्माण करणारा आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान यांची प्रगती पाहता इतर देशाना आपण आंतराळ सफर घडवून देतो. आकाशगंगेच्या प्रत्येक ग्रह आणि तारे यांची सखोल माहिती आणि त्यावरील वास्तव्य याची माहिती आपल्या भारतीय शास्त्रज्ञाकडे आहे. भारतीय अंतराळ प्रयोगशाळा ही अंतराळातील कृत्रिम गावच म्हणाव लागेल याठिकाणचे सर्व प्रकारचे प्रयोग आणि शोध जगाला मार्गदर्शक आणि वेधक ठरत आहे. मानवी जगाला पुरक आणि पोषक असे सर्व तंत्रज्ञान भारतीय शास्त्रज्ञ तयार करतात आणि निर्मळ मनाने इतर देशाना पुरवतात. हेतु एकच सकल मानव जातीचा विकास व्हावा. निसर्गाला कोणत्याही प्रकारची हानी न पोहचवता विकसित केलेले हे तंत्रज्ञान म्हणजे निसर्गपुरक ,निसर्गपुजक, निसर्गसहाय्यक भारतीय उज्ज्वल परंपरेचा समृद्ध वारसा. निसर्ग, विज्ञान यांचा सुंदर ताळमेळ राखण्यात भारतीय लोक यशस्वी झाले आहेत. व्यावसायिक विकास करण्यासाठी तंत्रज्ञानाचा खुबीने वापर भारतातील लोकांनी केला आहे. प्रत्येक व्यावसायात झालेली प्रगती थक्क करणारी आहे. शेती तंत्रज्ञान, सूक्ष्मजल व्यवस्थापन, सेंद्रिय खतांचा वापर, जमीनीचा पोषक पोत, फलबागांचे सूक्ष्म व्यवस्थापन, निसर्गाची नाळ जोडून वाढवलेले उत्पादन, प्रत्येक विभागानुसार पिकांची केलेली प्रतवारी त्यामुळे प्रत्येक पिकाला मिळणारा हमीभाव असे अनेक बदल शेती व्यावसायात आमच्या बळीराजाने केले आहेत. आजचा बळीराजा सुशिक्षित आणि विद्याविभूषित आहे त्यामुळे होणारी प्रगती देखील सर्वोत्तम अशीच आहे. दुग्धव्यवसाय तर देशाच्या लौकिकात भर घालत आहे. मासेमारी, पशुपालन, लघुव्यावसाय, मोठे व्यावसाय यांनी भारताला समृद्ध आणि परिपूर्ण केले आहे. येथील नवतरुण सदैव उत्साही आणि कार्यतत्पर आहे. प्रत्येकाच्या हाताला काम आणि कामाच्या बदल्यात दाम ही व्याख्या भारताने जगाला शिकवली. तरुणांची उर्जा , सौरउर्जा आणि वाया जाणारे नद्यांचे पाणी ह्या तीनही गोष्टी भारताने उत्तम रीतीने वापरात आणले. नवतरुणाची ऊर्जा देशाच्या हिताला कामी आली या सारखे दुसरे भाग्य ते काय ? पुर्नवापर, टाकाऊ पासुन टिकाऊ बनविण्याचा वसा भारताने जगला दिला. खुप सुंदर आहे देश माझा. ज्या धरेच्या कणाकणाला अभिमान व्हावा असाच आहे देश माझा. आध्यात्मा बरोबर तंत्रज्ञान याची सुरेश सांगड म्हणजे भारत. पुन्हा एकदा गुरुकुलात असे राम ,कृष्ण,भरत, अशोक असे नरश्रेष्ठ निर्माण होतील असा भारत. कल्पना, सुनीता, लता, इंदिरा घडतील असा भारत. सर्वोत्तमा मध्ये सर्वोत्तम असेल असा भारत. आदर्शाचाही आदर्श असेल असा भारत.आदर्श जीवन पध्दती शिकवेल असा भारत. यम, नियम,संयम, योग, शांती, नीती, शिष्टाचार शिकवेल असा भारत. जीवन व्यापनाचा हेतु शिकवेल आणि मनुष्य देहाचा हेतु साध्य करेल असा भारत. निसर्ग आणि मानव यातील खोल दरी दुर करून एकमेकांच्या सोबतीने दाही दिशांना प्रगती करेल असा भारत. आधुनिकीकरणात संस्कारांची आणि परंपरेची बाजु भक्कमपणे समजावून सांगेल असा भारत. सण, उत्सव ,सोहळे गुण्यागोविंदाने सजरा करेल आणि एक मानवी संबंधांची उंची वाढवेल असा भारत. कुटुंब पध्दती आदर्श नमुना असेल असा भारत. असाच असेल भारत जो नेतृत्व करेल जगाचे शांतीसाठी, जो नेतृत्व करेल जगाचे सदृढ स्वास्थ्य आणि आरोग्यासाठी, जो असेल शांतीदुत जगासाठी. जो चालवेल वारसा वसुदेव कुटुंबकम याचा. या पृथ्वीलाही हवा हवासा वाटणारा एक जगमगता तारा म्हणजे भारत. असा हा दिव्य भारत श्रेष्ठ भारत आदर्श भारत माझा भारत माझा अभिमान.शेवटी माझ्या भारताची महती सांगणारे वसंत बापटांचे गीत

आपसुकच ओठावर येते .....


चल करी वंदन नवयुवका

गगनी विलसे नवा रवी

तुजसी न बंधन कधी पथिका

दिसली तुजला दिशा नवी

प्राण आता झंकारुनी

तारुण्याच्या सामर्थ्याला

कारुण्याची साथ दे

या भुमीला आकाशाचे

आशीर्वाद लाभावे

पौरुषाला विक्रमाचे

वैभवाचे हात दे

ही प्रार्थना ही कामना ही अर्चना हिच भावना ...


जयतु जयतु परम मंगला भारत महाशक्ती



Rate this content
Log in

Similar marathi story from Classics