एक प्रिय शिक्षक
एक प्रिय शिक्षक
आज एका शिस्तशिरोमणीचा अस्त झाला. अन डोळ्याच्या कडा आपोआप ओल्या झाल्या. झरझर करत भुतकाळ मागे सरकला आणि बरच काही डोळ्यात एखाद्या चित्रपटा प्रमाणे दिसु लागल. आज तो आत्मा कुठेही असेल पण तृप्त नक्कीच असेल. माझ्या सारखे हजारो ज्यांना घडवण्यासाठी त्याचा वाटा खुप मोलाचा आहे. आज आम्ही महात्मा गांधी अध्यापक विद्यालयाचे जे विद्यार्थी आहोत आणि आमच्यात जो काही नैतिक मुल्यांचा ठसा आहे त्याचे सर्वस्वी श्रेय जाते ते ढेंगळे सराना. मनुष्य गेला कि राहतात आठवणी आणि त्या आठवणींचा ठेवा. गेलेल्या व्यक्ती विषयी सर्व भरभरून बोलतात अन आपल उसन प्रेम व्यक्त करतात. पण आम्ही त्यातले नाही. आज आम्ही सर्व शेकडो हजारो किलोमीटर दुर आहोत परंतु आमच्या हृदयातील व्यथा शांत होत नाही. आम्हाला आठवतो तो काळ जो कि आमच्या आयुष्यातील टर्निग पोइंट ठरला. आज प्रत्येक हुद्यावर आमचे छात्रशिक्षक आहेत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. हि किमया केली आमच्या महात्मा गांधी अध्यापक विद्यालयाच्या गुरूनी आयुक्त ते शिक्षक अशा जवळपास सर्वच नोकऱ्या आमच्या कॉलेजचे विद्यार्थी करतात. त्यांच्या ह्या यशाचे रहस्य म्हणजे नैतिक मुल्यांची केलेली जपवणुक.
२००७ साली आम्ही मोठ्या प्रयत्नाने डी एड ला महात्मा गांधी अध्यापक विद्यालय अरण्येश्वर पुणे येथे प्रवेश घेतला. नवीन शहर नवीन जागा सगळ अनोळखी पण एक सुटाबुटातील एक शिक्षक आमच्या समोर आला अन वातावरण हलक करत म्हणाला थोडे दिवस वाटत वेगळ नंतर सवय झाली कि तुम्ही मज्जाच करणार. हॉस्टेल चे रेक्टर आणि शारीरिक शिक्षण आणि शिस्त या वेगळया विषयाचे शिक्षक श्री. ढेंगळे सर.
तुम्हाला लगेच हॉस्टेल मिळणार नाही तुम्हाला वाट पहावी लागेल अशा कड्क शब्दात त्यांनी आम्हाला सांगितल. अन लगेच तुम्हाला तात्पुरते राहण्यासाठी रुम कोठे आहेत हे पाहतो असा लगेच मृदु होणारा स्वभाव. बाहेर गावच्या मुलांच्या व्यथा जाणून परंतु त्या गोष्टीचा बाउ न करता आपला शिरस्ता कायम ठेवत त्यानी आम्हाला घडवल. आमच्या आंगातील आळस दुर केला.आम्हाला सकाळी उठण्याची शिस्त त्यानी लावली. ७:३० म्हणजे वेळ. उशीर झाला तर गेटच्या बाहेर फिरत बसा .आत प्रवेश नाही मग प्राचार्य असो वा पालक वर्ग. सरांसाठी शिस्तीला प्राधान्य प्रथम. आम्ही विचार करायचो कि सर इतक्या सकाळी कस काय लवकर येतात. अन आताच्या युगात येवढी वेळ कोणी पाळत का ? आवघड मनुष्य आहे बुवा असेच सर्वांचे म्हणणे असायचे. प्रसंगी विद्यार्थी, प्राध्यापक, प्राचार्य यांच्याशी त्यांचे वाद व्ह्यायचे परंतु त्यांनी आपली शिस्त कधीच सोडली नाही. कॉलेजचा गणवेश सर्वांचा सारखाच हवा टाय आणि शुज सुद्धा हवे. दिलेल्या दिवसा प्रमाणे सुविचार अन बोधकथा सर्व काही परिपाठ ठरलेला. मैदान सफाई, वृक्षारोपण, खेळ, क्षेत्रभेट, सहल, विज्ञान प्रदर्शन अशा बाबतीत आम्हाला पदोपदी त्यांच्या शिस्तप्रियतेचा अनुभव यायचा त्यामुळे सरांना आपण बोलायला संधी द्यायची नाही अशीच खुनगाठ मी तरी मनाशी बांधलेली होती.
दोन अडिच वर्षांत खुप काही गोष्टी आम्ही सरांकडुन शिकलो. त्यांचा सहवास म्हणजे शिस्तीचे मूर्तीमंत उदाहरण होत. इतके काही प्रसंग डोळ्यात साठवत आहेत कि अश्रू बनून ते हळुहळु बाहेर पडत आहे. पाठ घेताना सरानी तयार केलेले वेळापत्रक मला आठवते एकदम सूक्ष्म नियोजन कि ज्याचा मी एक भाग राहिलो होतो. हे एकदम परफेक्ट कस काय होत हा मला तेव्हा पडलेला प्रश्न .सरांच एका शब्दात उत्तर 'अनुभव फलके अनुभव' खरच ८० शिक्षकांचे पाठ एका पाठोपाठ परंतु कोठेही गडबड नाही गोंधळ नाही. कस नियोजित बांधकामा सारख मला खुप कौतुक वाटे. सरांसोबत आम्ही हरीहरेश्वर ,दिवेअगार रायगड अशी कोकण ची तीन दिवसीय सहल खुप एंजोय केली त्यावेळी खुप जास्त सहवास सरांचा लाभला. हसत खेळत मस्ती मजा करत कॉलेजचे दिवस कसे संपले कळले नाही.
मी गरीब घरची परिस्थिती बेताची. घरी गेलो तर पुन्हा इकडे आंतरवासितेसाठी पाठवणार नाही म्हणून पुण्यातील एका शाळेत जोइन झालो राहायची सोय नव्हती म्हणून पुन्हा जुनियर सोबत होस्टेल मध्ये राहु लागलो. दिवसभर शाळा संध्याकाळी मॉलमध्ये काम अन फक्त रात्री झोपायला हॉस्टेल. कॉलेज संपले होते तरी मी हॉस्टेलला राहतच होतो. एक महिना कसा तरी निभावला आणि दुसऱ्या महिण्यात रेक्टर असणारे आमचे ढेंगळे सरानी मला बोलावून घेतल. काय प्रोब्लेम आहे तु का राहतोस इथे ? मी माझी सर्व अडचण सांगितली त्यानी मला मोटारसायकलवर बसायला सांगितले अन तडक त्यांच्या एका मित्राच्या घरी घेउन गेले. अरण्यश्वर सहकार कॉलनीत त्यांनी मला आणखी चार लोकांनी शेर केलेली रुम पाहून दिली. भाड्याचे सर्व मित्राला सांगितले गरजु पोरगा आहे संभाळून घे. मेस दाखवली अन लगेच दत्तवाडीला घेऊन गेले तेथे दुसऱ्या एका मित्राला सांगितले हा तुम्हाला नवीन शिक्षक १ ली ते ८ वी चे क्लास घेइल किती पैसे द्याल. संध्याकाळी तीन तसाचे ८००० रुपये असे ठरवून सरानी मला पुन्हा रुमवर सोडले. जाताना सर्व काही सांगत होते. संगत चांगली हवी शिक्षकासोबत राहत जा. कामाच्या शोधात राहा अन अभ्यास देखील चालु ठेव.
एवढ्या सगळ्या फिराफिरित सरानी मला संघर्ष कसा असतो आणि का करावा लागतो याचे मर्म सांगितले. सहामाहीचा आंतरवासिता काळ सरांच्या कृपेने निघून गेला सरानी सर्व माझ्यासाठी केले अन मी सरांचा त्याबद्दल कायम आयुष्यभर ऋणी झालो. ऱाहण्यापासून, जेवण, कमायीचा सोर्स क्लास शोधण्यापर्यंत सरानी खुप मदत केली. मधेच कॉलेजला गेलो तर विचारपुस व्हायची काही लागतय का ? काही प्रोब्लेम आहे का ? माझ्या सख्या नातेवाईकानी कधी येवढी काळजी माझी घेतली नाही तेवढी काळजी सरानी माझी घेतली. माझ्या साठी तेच माझा विठ्ठल होते. कॉलेज आता पूर्ण झाले कागदपत्रे द्यायच्या वेळेस माझी अडवणूक करण्यात आली हॉस्टेलचे पैसे दिले नाही म्हणून मी तारणहार हक्काचे ढेंगळे सरांकडे गेलो. कोणताही मागचा पुढचा विचार न करता सरानी पावत्या हातात दिल्या अन जा म्हणाले. मी म्हणालो सर माझ्याकडे पैसे नाही ,सर कडक आवाजात मी मागितले. मी सरांचे पायच धरले. किती करेल हा माणूस माझ्यासाठी फक्त २५००/- रुपयात मी दोन वर्ष तेथे राहिलो. अस काय जानवल सराना माझ्याकडे पाहून की ते सर्वतोपरी मला मदत करत होते. माझी कधीही विचारायची हिम्मत झाली नाही. कारण माझे डोळे सर अचुक वाचत अन बरोबर प्रश्न विचारत होते अनुभव. नक्कीच माझी जगण्याची धडपड पाहून मला त्यांनी आश्रय दिला होता. अशा कितीतरी मुलांना त्यानी आपल्या परिने मदत केली असेल त्यानाच माहिती. परंतु सामान्य कुटुंबातुन आलेले आमचे सर याना सर्वसामान्य कुटुंबातील मुलांची नक्कीच काळजी होती हे मात्र नक्की. त्यांच्या कठोर आणि वज्र स्वभावात देखील वात्सल्य भाव होता हे ही तितकेच खरे. जगाच्या पाठीवर कोणी आपला सापडला तर तो आपला होण्यासाठी मन जुळावी लागतात तसच आमच्या सरानी मुलांची मन अचुक ओळखली होती अन त्यामुळे मुलांना शिस्तप्रिय ,कठोर आणि वक्तशीर असलेले ढेंगळे सर खुप आवडायचे. आज बाका प्रसंग आम्हाला अंकुश लावणारा शिस्तीची कठोरता समजावणारा आज आमच्यात नाही. परंतु मनाने आमच्या हृदयात तो अखंड तेवत राहिल त्यांनी दिलेल्या संस्कारातुन. आज त्यांचीच शिस्त आहे कि जी आम्हाला अपप्रवृत्तींपासुन आम्हाला दुर ठेवते आपल्या कर्माला अधिक महत्त्व प्राप्त करून देते. हिच शिस्त जिवनात बानवली तर जिवनात काया पालट होतो हे देखील तितकेच सत्य. सर तुमचे संस्कार आम्हाला नेहमी चांगल जीवन जगण्यासाठी प्रेरित करीत राहतील. आमच्या वाट्याला जे काही आपले सहवासाचे दिवस आले त्याच गोड आठवणी उराशी बाळगून आपल्याला जड अंतकरणाने निरोप देतो. आमच भाग्य थोर आम्हाला आपल्या सारखे गुरूजन लाभले नाहीतर हे हात आज कुठेतरी शेतात राबले असते कुठे ह्या हांतांच्या नशीबी खडुच भाग्य, कुठे येवढा सन्मान आणि यश किर्ती मिळाली असती आपल्या गुरूकृपेने सगळ मिळाल .. इच्छा राहिली ती स्नेहाचा आश्रृबांध आपल्या खांद्यावर रिता करण्याचा आपल्याला... भेटण्याची इच्छा राहून गेली सर ही खंत आयुष्यभर मनाला खात राहील... थोडीजरी पुसटशी कल्पना जरी आपल्या अजारपणाची असती तर ही पावल आपल्या रोखाने आली असती काही नाही आपल्या ऋणातून कधीही उतराई नाही होणार हा शब्द दिला असता अन आपल्या सेवेतील काही क्षण स्मरले असते.... एवढे बाकी राहिले... बाकी आपले संस्कार सदैव सोबत राहतील आपली आठवण मनात नित्य राहील सर.... आम्हाला आपली कमी खुप जानवेल ..... काय बोलाव मी आज निशब्द.... भावपूर्ण श्रध्दांजली सर आपण पुन्हा याल गुरूच्या रुपाने आणि आम्ही वाट पाहू सदैव आमच्या गुरूची.
