सर्वोत्तम ध्यानसाधना
सर्वोत्तम ध्यानसाधना
ध्यानधारणा (मेडिटेशन) करताना आलेले अनुभव आणि काही अनुभवी मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनातुन वेचलेले काही अमृतकण जे आपल्यालाही अमरत्व प्रदान करतील. मनाला जागृक करून आपले खरे अस्तित्व सांगण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. सर्वांना या विचारांचा फायदा व्हावा हिच प्रामाणिक इच्छा.
१)पिरॅमीड मेडिटेशन ( पिरॅमिड आकाराच्या वास्तु मधील ध्यान) खुप प्रभावी परिणामकारक असते आणि प्रत्येकाने आपल्यात अद्भुत बदल घडवायचा असेल तर ते केले पाहिजे.
२)पिरॅमिड मेडिटेशनने असाध्य आजार बरे होतात. हैदराबाद बॅंग्लोर येथे हे पिरॅमिड आहेत.
३)आपले विचार हेच आपले अस्तित्व.
४)आपले मन म्हणजेच आपल व्यक्तित्व.
५)मनोविजय चित्तविजय मिळवणे खुप गरजेचे.
६)लिहताना व्यक्त् होताना हृदयातील भावना येतात. तसे लाखो विचार मनात घोळत असतात त्यामुळे चांगले वेचण्यासाठी लिखाण आवश्यक आहे.
७)जिवनात परिस्थिती कशीही असु दे तुमच्या चित्तात संतोष असेल तर तुम्ही यशस्वी होतात.
८)आपणच आपले वास्तव बनवत असतो.जगत असतो.हे सर्व विचारांमुळेच होते.
९) आपली बिलिफ सिस्टीम ( एखादा विषय, घटना, घटक यांच्या विषयी आपली धारणा )तुम्ही स्वतः तोडली तर तुम्ही जग जिंकला तुम्हाला इतर कशाचीही आवश्यकता नाही.
१०) जिवनात सगळ्यात धोकादायक काही असेल ते नातेसंबंध ते तुमचे जिवन उध्वस्त करतात.
११)we have to mantain santosh.
12)Thankfullness is the most important part of our happy life.
13) आपले जिवनात सगळ्यात जास्त चॅलेंज व्यक्ती निर्माण करतात. बाकी पैसा वस्तु ठिकाण गौण आहेत.
१४) जो स्वतः आशिर्वादीत करु शकतो परमेश्वर त्यालाच आशीर्वादीत करतात.
१५)स्वतः आशीर्वादीत करणे म्हणजे आपल्यातील असणाऱ्या क्षमता कौशल्य गुण यांचा प्रत्यक्षदर्शी विकास वाढ करणे.
१६)आपले मन ओळखायला शिका तेच आपल्याला तेच मेनिफेस्ट करते आणि तेच पुढे घडते.
१७) आपल मन जेव्हा मजबूत बनते तेव्हा ते स्वतःला हिल करते. तुम्ही कोणत्याही गोष्टीशी सामना करु शकता.
१८) कृतज्ञता जेव्हा तुमच्या मनात हृदयात खोलवर रुजते तेव्हा आपोआप तुम्ही इतरां साठी मागायला लागता.
१९) जो स्वतः आशीर्वादीत करतो ब्रम्हांडीय शक्ती त्यालाच साहाय्य करते.
२०) प्राणी अपने प्रभूसे कैसी विधी पावु तोय
प्रभु कहे तु मन को पा ले पा जाएगा मोहे //
२१) we have to alert about mind and our thought.
22) आपल्या कक्षेतील गोष्टी आपण सर्वोत्तम करु शकतो.
२३)सर्वोत्तम कर्म आपल्या हातात आहे......
२४) *आपल्या विचारा बाबत जागृत राहणे हेच आपल्या गुढ जिवनाचे रहस्य आहे.*
२५) मेडिटेशन म्हणजे शरीर हलके करणे, विचार दुर करणे, विचार सोडून देने एकाग्र शांती प्राप्त करणे,
२६) विचार मनाचा गुणधर्म आहे. आलेले विचार आपण नष्ट करु शकत नाही फक्त आपण आपला फोकस लगाव त्याच्यापासुन दुर करु शकतो. हाच फोकस आपल्याला जितक्या लवकर हटवता आला तितके लवकर तुम्ही जिंकाल.
२७) वारंवार केलेले विचार वास्तवात येतात. करून पाहा.
२८) ANAPANSATI ,we can follow this meditation any time any where in any position.
29) संकल्प ध्यान विशिष्ट संकल्प मनात धरून केलेले ध्यान.
३०) आंतरमौन म्हणजे स्वतःशी मनोमन कोणत्याही प्रकारची व्यर्थ बडबड न करणे.
३१) Gratitude चा प्रवास जिवनात प्रवाह खुप महत्त्वाचा.
३२) कोणतीही शंका न घेता ब्रम्हडिय शक्तीकडे मागा तुम्हाला मिळेल.
33) जेव्हा आपण ग्रेटफुल होउ तेव्हा आपले प्रश्न आपोआप सुटत जातील.
34) Stop thinking start thanking.
35) आपला मेंदु विचार शुन्य होणे म्हणजे सायन्स मध्ये मेंदूची आल्फा स्थिती .. यानंतर आहे बीटा, गॅमा, डेल्टा ... डेल्टा स्थिती म्हणजे समाधी अवस्था ही प्राप्त करण्यासाठी खुप साधनेची आवश्यकता असते. अथक परिश्रमाने आपल्याला हे शक्य आहे.
36) आपण समजात वावरताना Poor observer and sharp reacter असतो यामुळे आपले विचार कधी कधी चुकतात. आपण न पाहताच न समजताच विचार करायला लागतो.
37)प्रत्येक गोष्टीचे बारकाईने निरीक्षण करा. मग तुमचे विचार बदलेले दिसतील.
38) जे उत्तम निरीक्षक असतात तेच बुद्धीवान असतात. उदा. अजित डोबाळ
39) उत्तम निरीक्षण करणारा पर्याय निवडताना योग्यच निवडतो.
40) आंतरमौन पाळणे म्हणजेच मेडिटेशन.
41) विचार रुपी पाहुण्याला थांबविण्यासाठी एकच पर्याय आनापानसती... श्वासावर पाहारेकऱ्या सारखे लक्ष ठेवा.. त्या पाहुण्यांना प्रतिसाद द्यायची गरज नाही.
42) विचार येत राहतील परंतु No Reaction.म्हणजे मेंदु आताआल्फा स्टेज कडे जायला लागला.
43)मेंदु आपल्या मनाचा अक्षरश: गुलाम आहे.
44) मेंदुने विचारांना प्रतिसाद न दिल्याने मेंदुची फ्रिव्केन्न्सी बदलते मेंदू स्थिर होतो.
45) एकदा मेंदु स्थिर झाला की मेंदुचे शावरिंग चालु होते मेंदु असे काही हार्मोन्स उत्पन्न करतो त्यामुळे आपल्या शरिराला हालके वाटते आपले आजार ठिक होतात. उदा. जो डिस्पेंजा रिपेरी मेडिटेशन करून ९० दिवसात ॲक्सिडेंट झालेला असुन सुद्धा ठिक झाला.
46) बुद्ध, नानक , संत, जिजस , बसवेश्वर हे सगळेच उत्कृष्ट शिक्षक होते ते फक्त सांगु शकतात. करणे न करणे आपल्या हातात आहे.
47) आपण ९५% सबकॉंसियस माइंड नुसार चालतो. ५% कॅंसियस मेंदू काम करतो.
48) सकारात्मक विचार जाणीव पुर्वक यावे म्हणून टास्क करा.
49) बिलिफ सिस्टीम नष्ट व्ह्याव्यात म्हणून टास्क करा.
50) जेव्हा तुम्ही नविन विचार अंगिकारता तेव्हा नवीन वास्तव तयार होत असते.
51 ) अवांतर विचार टाळण्यासाठी श्वासासोबत राहा.
52) श्वासाबाबत जागृत राहणे हेच खरे जिवंत पणाचे लक्षण आहे.
53) शांती - प्रसन्नता - स्थिरता - संतोष.... हे जीवन मार्गाचे टप्पे आहेत.
54) जिथे बुद्ध तिथे स्वर्ग , जिथे नानक महाराज तेथे स्वर्ग. व्यक्तिच्या विचारांवर सभोवतालचे वातावरण बनते. वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र हा ज्याचा त्याचा विषय आहे.
55) मना प्रती जागृत रहा.
56) साधेपणा हेच मेडिटेशन आहे.most simplicity is the meditation.
57) मनाचा शब्दावीना संवाद अनुभवा तुम्हाला नक्कीच फरक जानवेल.
58) मनाची चिंता शरीरातील प्रत्येक भागावर विपरीत परिणाम करत असते.
59) विचारांची ताकद मेडिटेशनच्या प्रयत्नाने वाढवता येतात.
६०)विचार ब्रम्हांडातील श्वाश्वत सत्य आहे.
शुभम भवतु
