Manisha Awekar

Abstract Others

3  

Manisha Awekar

Abstract Others

दैव जाणिले कुणी!

दैव जाणिले कुणी!

4 mins
446


    प्राजक्ताच्या फुलांचा पांढराशुभ्र सडा बघूनच प्राजक्ता मनोमन हरखली!!जाई-जुई बहरल्यात!!सोनचाफ्याचा सुगंध दरवळतोय!!बागेत जणू स्वर्गच अवतरलाय!!

     तेवढ्यात तिचे डोळे कुणीतरी झाकले. काहीच कळेना. धड कोणाचे नावही घेता येईना. उगाच बोभाटा!!प्रकाशने मिश्किलपणे हसत तिचे डोळे सोडले.

"प्रकाश किती वेळ वाट बघतीयं मी!!किती उशीर!!एवढी कशी झोप लागते रे तुला?"

"अरे, हो हो स्वागताला एवढी सरबत्ती!!

"अगं काल यायलाच साडेबारा वाजले. झोपायला उशीर म्हणून......

"समजलं समजलं"

"ए,तुला आणि आईला नाश्त्याला बोलवायला सांगितलंय."

"सांगितलंस ना!! मग आपण निघू शकता !!"

"ए अगदी शब्दांत पकडू नकोस गं !!

"कशाला बोलावलंय? "

"कुणास ठाऊक!!"हसत हसत म्हणत प्रकाश पसारही झाला.

 

  दिवेकर आणि गोरे अगदी सख्खे जीवाभावाचे शेजारी. काही वेगळं खायला केलं की एकमेकांना दिल्यावाचून खाणार नाहीत. आज प्रकाश आल्याने काकू अगदी खूषीत! नाश्त्याला इडली सांबार, केशरी शिरा असा प्रकाशच्या आवडीचा बेत.खाणे झाल्यावर प्रकाश म्हणाला " सर्वप्रथम तुम्हांला एक चांगली बातमी देतो. मला आय आय टी बंगलोरकडून चांगल्या जाँबची आँफर आली आहे."

"कुठे रे" न राहवून प्राजक्ताने विचारले.

"अगं थांब जरा , मला पूर्ण तर बोलू दे. माझी राजस्थानी मैत्रीण सुनयना हिच्या वडिलांनी डबल अॉफर दिली आहे ती श्रीमंत बापाची एकुलती एक मुलगी आहे. ते राजस्थानी रईस आहेत. त्यांचा बिझनेस पार्टनर मला करुन घेणार आहेत, पण एका अटीवर मी त्याःच्या मुलीशी लग्न केले पाहिजे."

 "काय!!" काकू दचकल्याच!!" म्हणजे ही सौदेबाजीच म्हणायची. तुला पसंत आहे का सुनयना?

प्राजक्ताला जोरात ठसका लागला. नाकाडोळ्यांतून पाणी येऊ लागले .

"आई आत्तापर्यंत मैत्रीण म्हणूनच बोललो तिच्याशी.ती हुशार ,नृत्यनिपुण आहे.मला आवडले तिचे डोळे. तिनेच आईला घेऊन जयपूरला ये म्हणून सांगितले . तिला मराठी फारसे बोलता येत नाही. आम्ही हिंदीतूनच बोलतो."

"चला, म्हणजे काकू तुम्हाला चहा, पोहे, मुलगी पहाणे, पसंत करणे असे काही नकोच करायला. प्रकाशनेच पसंत करुन तुमच्यापर्यंत मुलगी आणलीयं "प्राजक्ताची आई हसतहसत म्हणाली.


  प्राजक्ता कोमेजली. मनात आकार घेत असलेली प्रीती पूर्णत्वाला जाईल अशी खात्री वाटत असतानाच, कोणीतरी खटकन् कात्री लावून प्रीतवेल खुडावी असे झाले. ती काहीच बोलली नाही. डिश कशी संपवावी आणि चेहरा कसा आनंदी ठेवावा ह्यासाठीच धडपड चालली होती.

 "काकू आम्हाला जवळचे असे कोणीच नाही. तुम्हीपण चला आमच्याबरोबर . अहो सोयरीक जमवताना चार जणांची मते घ्यावीत, असे पूर्वापार चालत आले आहेच की!!"


परीक्षेचे कारण सांगून प्राजक्ता तेथून सटकली. घरी येईपर्यंत डोळ्यांतून गंगा यमुना यायला सुरवात झाली. तो मैत्रीच्या नात्याने गप्पा मारत असेल, आपल्या मनात प्रेम असल्याने आपण प्रकाशचा विचार करु लागलो. तो दिसायला सुंदर, हुशार, निगर्वी आणि मुख्य म्हणजे गप्पाडदास असल्याने सुनयनाला आवडला असेल. सुनयना पण हुशार, नृत्यनिपुण आणि तिच्या वडिलांनी दिलेली धंद्यातील भागीदारी त्यामुळे प्रकाश हो म्हणाला असेल. कशी असेल सुनयना? दिसायला सुंदर, डोळे छान, केस लांब असतील का शोल्डर कट असेल? आपले लांबसडक केस प्रकाशला आवडायचे अन् त्यात तो फुले माळायचा, गप्पा मारायचा, टाळ्या द्यायचा, म्हणून त्याचे आपल्यावर प्रेम आहे, असे समजून चाललो आपण, पण त्याचे क्षितिज वेगळे असेल, हे कधी आपल्या लक्षातच आले नाही. किती मूर्ख आहोत आपण!! विचारांच्या तंद्रीत कुलूप उघडून समोर धरलेले पुस्तक उलटे आहे हे सुद्धा डोळ्यांतील पाणी पुसेपर्यंत कळले नाही. आई परत येईपर्यंत सावरायला हवे. तेवढ्यात कडी वाजलीच.


"अगं प्राजक्ता का गं इतक्या घाईघाईने आलीस? जरा प्रकाशची चेष्टा करायचीस. त्याने आम्हाला फोटो दाखवले.

अगं ते आयआयटी मधले मित्र. सहलींचे, वाढदिवसांचे फोटो दाखवले.

"हं" एवढेच बोलून प्राजक्ताने पुस्तकात तोंड घातले.


  ठरल्याप्रमाणे काकू, प्राजक्ताची आई आणि प्रकाश जयपूरला गेले. त्यांचा मोठा राजमहालच जणू!!तेथे त्यांचे जंगी स्वागत झाले. सुनयनाला दोघींशी मराठीत बोलणे जड जायला लागले. दोघींना नमस्कार करायचेही तिच्या लक्षात आले नाही. सर्वांना केशरी दूध देऊन मुलीच्या वडिलांनी बोलायला सुरवात केली. "आम्हाला प्रकाशसारखा कर्तृत्ववान सालस जावई मिळाला म्हणून खूप आनंद झाला आहे. सुनयनाला इथे नोकरी मिळेल.

आपला धंदा इथे असल्याने, प्रकाश तुमची व्यवस्था इथेच करु आपण. बिझनेस शिकून घेईपर्यंत माझे निर्णय तुला मानावे लागतील. नंतर आहे ते सगळे तुमचेच आहे."


  काकू मनात काय समजायचे ते समजल्या. एवढ्या मोठ्या प्रशस्त हवेलीत गार वारा झुळझुळत असूनही, त्यांच्या कपाळावर घर्मबिंदू उभे राहिले. त्यांना त्या टोलेजंग श्रीमंतीत गुदमरायला लागले. प्रकाश आणि सुनयना नमस्कार करुन देवाला गेले. सुनयनाला पुढचे प्लॅन्स सांगायची घाई झाली. तिची अशी बडबड प्रकाशने कधीच ऐकली नव्हती. जेव्हा आईला इथे आणायला, तिने नाराजी दाखवली, तेव्हा प्रकाशचा संयम संपला, तरीही त्याने तिला सांगायचा खूप प्रयत्न केला. वडील गेल्यावर आईने किती टक्कर देत आपल्याला शिकवले सगळे सांगितले, पण त्या मुलीच्या पालथ्या घड्यावर पाणी!! तिची संसाराची कल्पना राजा-राणीचा संसार अशीच!! आपल्याला श्रीमंतीच्या जोरावर काहीच कमी पडणार नाही असा अहंकार तिच्यामधे फोफावलेला!! 


जेवताना प्रकाश गप्पगप्पच!" आई आपण सकाळी इथून जायचे. मला घरजावई करायला बघतायत, पण तुला सोडून हा सोनेरी पिंजरा मला नकोय गं!"असे सांगतासांगता त्याचे डोळे भरुन आले.

 

  स्वच्छ नकार देऊन तिघेही सांगलीला आले. नंतर चौघांची जेवणे झाली. प्रकाश म्हणाला "आई, तू म्हणायचीस ना, नाकापेक्षा मोती जड नसावा. अगदी खरे आहे. काकू, प्राजक्ताला मी पसंत असेन तर, मी तिला मागणी घालतोय." प्राजक्ताला काही कळेचना! दैवाने किती अनपेक्षित कलाटणी दिली! ती लाजेने चूर झाली. दोन्ही काकूंच्या डोळ्यांत आनंंदाश्रू आले.


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract