दानत
दानत


गावाला निघाले होते कार घेऊन. चार-पाच तासांचा प्रवाससकाळी लवकरच निघालो सगळे सलग गाडी चालवून कंटाळा आल्याने एका धाब्यावर गाडी थांबवली.
कंटाळा घालवण्यासाठी मस्त चहा ऑर्डर केला सोबत गरम-गरम वडापाव.
चहा- वडापाव...एकदम भारी कॉम्बिनेशन
तोडच नाहीचव आणि पोट भरणे
कम्प्लीट स्वादानंद.
काही वेळाने लक्षात आलं..एक साधारण दहा-अकरा वर्षे वयाचा मुलगा सतत रोखुन माझ्याकडे बघत होता.
कसंतरीच वाटलं त्याला जवळ बोलावून पैसे देऊ केले. नको म्हणाला..
भूक लागलीये सांगितलं त्याच्यासाठी पण दोन वडापावची ऑर्डर केली तर म्हणाला, "काहीतरी काम करतो तुमचं. मग खायला द्या.
गाडी पुसू मी? "
काही उत्तर देण्याच्या आतच पटकीनी हातातलं फडकं घेऊन गाडी पुसायला सुरुवातपण केली त्यानं.
मी मागून नको नको ओरडत होते.
पण हातानेच मला थांबा अशी खूण करून तो त्याच्या कामात मग्न झाला.
त्याच्या मनासारखी लख्ख गाडी पुसून मग आला तो. मला इकडे धाकधुक
बालकामगार कामाला लावल्याबद्दल माझा हकनाक बळी जायचा..कारण नसताना.
त्याला स्वच्छ हात धुवायला सांगून जवळ बसवलं.
म्हणलं ," चल आता खाऊन घे दोस्त"
तर म्हणाला नको नको मी पॅक करून घेतो.
बर म्हणल्यावर अजून चार द्याल का विचारल त्यानंमी अजून चार वडापाव पॅक करायला लावले.
आज काहीतरी पुण्यकर्म केलं आपण, या अविर्भावात बिल देऊन गाडीकडे जायला निघाले.सहजच धाब्याच्या बाजूच्या गल्लीत नजर गेली.तिथे तो मुलगा त्याच्यासारख्या अजून दोन-चार सवंगड्यांना वडापाव देत होता.
कमालीची गोष्ट म्हणजे त्याच्या सवंगड्यांमध्ये एक कुत्रादेखील होता आणि त्यालाही त्याचा वाटा मिळाला होता.
अरे क्या बात!
भरपूर असणाऱ्यांनी थोडसं वाटलं तरी काहीतरी मोठं दान केल्याचा फिल येतो..
लगेच गर्वाने छाती फुलते
स्वर्ग दोनच पावलं
आपल्यासाठी दार उघडच ठेवलय स्वर्गाचं
माझा मदत केल्याचा..पुण्य केल्याचा आनंद..बेट्याने क्षणात मावळून टाकला
ही खरी दानत
म्हणजे ते अजून चार वडापाव यांच्या नावाचे होते तर...
मस्त रे! रहावलंच नाही
पळत जाऊन त्याला जवळ घेतलं
चौकशी केली
बरीच माहिती मिळाली त्याच्या परिस्थितीबद्दल... शाळेबद्दल... घराबद्दल.
मी कोणत्या संस्थांकडे मदत मागू का तुझ्यासाठी.. तर नकार दिला त्यानं.
पैसे घ्यायला ही नकार दिला
त्याची मेहेनत करायची वृत्ती फुकट कसली आशा करत नव्हती.
आता त्याच्या अपंग तरीही मनानं खंबीर पालकांबद्दल आदर द्विगुणित झाला.
मीच हात जोडले.
गरजेला जमेल तशी मदत करण्याच प्रॉमिस देऊन मोबाईल नंबर दिला. म्हणलं कधीही अडचणीला फोन फिरव किंवा मेसेज कर लेका! तुझ्या फोनला नक्की रिप्लाय देईन
डोळे भरून आले होते
गाडीकडे निघाले...
आणि विंदांची कविता आठवली..
"देणार्याने देत जावे
घेणार्याने घेत जावे
घेता घेता एक दिवस
देणार्याचे हात घ्यावे."
माझ्यासमोर जिवंत ठसठशीत उदाहरण
फक्त दानत नाही,
नियत पाहिजे यार.
जबरदस्त!
लई भारी!