चंद्रयाची कमान
चंद्रयाची कमान
चंद्रयान -2 ची कमान महिलांच्या हातात होती. ही फार गर्वाची गोष्ट आहे. चंद्रयान - 2 चे सफलता पूर्ण अभियान पूर्ण झाले आहे. महिलांचे स्वप्न पूर्णत्वाच्या जवळ आलेले आहे. आज कोणतेच स्थान नाही जिथे महिलांचे वर्चस्व नाही .
तसेच चंद्र हा महिलांच्या खूप जवळचा मनातला ग्रह आहे. आणि चंद्र हा प्रेमाचा प्रतिक पण आहे. महिला चंद्राला मनोमनी पूजतात कोणी महिला चंद्राला मित्र, भाऊ, मामा, प्रियकर,पुत्र,मानतात.चंद्र हा महिलांचा लड़का व ईश्वरीय मान्यतेचा घटक असून महिलांच्या दिलावर विशेष राज्य करीत असतो. आणि चंद्रापासून खूप काही शिकण्या सारख आहे.
तसेच प्रसिद्ध संत,महंत,महात्मे,साधु,आणि साहित्यिक मंडळी खाता-पीता,उठता-बसता,जागेपणी झोपलेल्या अवस्थेत चंद्राची भक्ति,आराधना,पूजा व कवन मोठ्या कोड कवतूकाने गातात. चंद्राची शांति व शीतलतेची दखल घेवून आणि असंख्य उदाहरणे देवून समाजात जनजागृति करीत असतात आणि चंद्राला श्रेष्ठ मानतात.
15 जुलैला हरिकोटा इथून चंद्रयान पाठवण्यात आले हे मिशन पूर्णतया सफल झाल्याची ग्वाही इसरोने दिली आहे.जन समुदाय हर्ष व्यक्त करीत आहे.ही उपलब्धि दोन महिलांच्या कामगिरी मुळे व इसरो वैज्ञानिकांच्या अथक परिश्रमाने पूर्णत्वाला प्राप्त झालेली आहे.सर्वांना आनंद होवून समाधान लाभले आहे. आणि सर्व व्यवस्थित असल्याची माहिती मिळाली आहे चंद्रयान तेज गतिने कदम दर कदम पुढे वाटचाल करीत आहे.
चंद्रयान-2 ची सफल प्रत्यक्षिक पहिल्यांदाच भारतीय महिलांच्या सानिध्यात सफल झाले आहे.कार्य इतके भव्य दिव्य होते तरीही सक्षम महिलांच्या हातात पूर्ण जिम्मेदारी दिली ती त्यांनी सफलतापूर्वक जवाबदारीने पार पाडली.आणि पृथ्वीवरच्या महिलांच्या माना गर्वाने ताठ झाल्यात.त्या भाग्यवान महिलांचे नाव मुथैया वनिता आणि रितु करिधाल श्रीवास्तव आहे. या दोन महिलांच्या हातात जिम्मेदारी दिली होती. ही गोष्ट मोठ्या अभिमानाने सांगावीशी वाटते.
चंद्रयान -2 चे सफलता देशाला प्रगतीचे द्योतक असून भारताचा मान-सन्मान वाढविणारा आहे. दोन महिलांनी आपली बुद्धीची चमक दाखवून नेतृत्व केले आणि स्त्री शक्तीचे रूप दाखविले हे जिवंत उदाहरण आपल्यासमोर आज आपल्याच भारतीय स्त्रियांनी मांडले पुरुषांच्या बरोबरीने कार्य करून आपला झेंडा फडकविला आत्मविश्वासाच्या बुलंदी वर यशाचा झेंडा रोविला आहे.
महिलांना पायातील जोडे चप्पल समजणारी संस्कृती आ वासून बघतच राहिली. या नवनिर्मात्री महिलानी अजून काही पाने सुवर्णक्षरात इतिहासात जोडली आहे.
बेंगलोरला इसरो केंद्रावर अनेक महिला कार्यरत आहेत या कन्यका दिसणाऱ्या महिलानी शाबासकीची थाप घेण्यासारखे कार्य केले आहे.तसेच जगाच्या पाठीवर अनेक महिलांनी अनेक मोठमोठी कार्य केली आहेत. त्यां मुळातच शक्तिदाईनी असतात.अनेक महिलांनी प्राचीन काळात विभिन्न क्षेत्रात कार्य केलेच होते.त्या प्रसिद्धीच्या झोतात अमर झाल्यात.भारत देशाचे नाव उज्वल करणाऱ्या खास महिलाचा वेलू यापुढेही सातत्याने गगनात झेपावत राहणारच आहे.
मुथैया यू.आर राव, सैटेलाइट सेंटर एक इलेक्ट्रॉनिक्स सिस्टम इंजीनियर आहे.त्या डिजिटल सिग्नल प्रोसेसिंग मधे माहिर आहेत.त्यांनी उपग्रह संचारावर कित्येक आलेख लिहिले आहेत. उष्णकटिबंधीयमधे जल चक्र आणि ऊर्जा विनिमय अभ्यास करण्यासाठी इंडो-फ्रेंच उपग्रह ,मेघा-ट्रॉपिकवर उप परियोजना निदेशक होवून कार्य केले आहे.
भारतीय रिमोट सेंसिंग उपग्रह कार्टोसैट 1दूसरे महासागर अनुप्रयोग उपग्रह ओशनसैट 2 परियोजना के अंतर्गत कार्य केले आहे. 2006 मधे एस्ट्रॉनॉटिकल सोसायटी ऑफ इंडिया ने सर्वश्रेष्ठ महिला वैज्ञानिक पुरस्काराने सम्मानित केले होते. सांयस जर्नल नेचर त्यांचे नाव त्या पांच वैज्ञानिकांच्या श्रेणीत ठेवले होते.
रितु करीधन रॉकेट वुमन ऑफ इंडिया डिप्टी ऑपरेशंस डायरेक्टर राहलेली पहिल्यांदाच संपर्क निदेशन मधे कार्य केले आहे.साल 2007 मधे पूर्व राष्ट्रपति एपी.जे अब्दुल कलाम सायंस अवॉर्ड मिळाला होता. रितु करीधलला लहानपणापासुनच विज्ञानात खास दिलचस्पी होती. ती मोठी हुनर बाज इंजीनियर होती. रितु करीधलला तिच्या परिवाराचा भरपूर सहयोग मिळाला म्हणुन ती म्हणते की मी आपले लक्ष्य पूर्ण करू शकले. तिला एक मुलगा व एक मुलगी आहे. घरी सर्व सदस्य तिची मेहनत आणि जिद्द पाहून तारीफ करता थकत नाही. रितुनेही अापले कर्तव्य विश्वासपुर्ण निभाविले होते.ती ऑफिस वर्कने कितीही थकली तरी आपल्या मुलांना वेळ द्यायची. मुलांना प्रेमाची अती गरज असते त्यावेळी तिने इमानदारीने आपली जिम्मेदारी सांभळली.
चंद्रयान-2 हे 15 जुलैला पहाटे दोन वाजून एक्कावन मिनटावर पाठविले होते. चंद्राच्या प्लेसवर पोहचून तिथली बारिकसारिक पुर्ण माहीती गोषवारा पाठविणार आहे.हे यान दक्षिणी ध्रुवाच्या जवळ उतरून त्या थंडगार आंधारलेल्या भागात चित्र व माहिती घेणार आहे.तिथे नविन काही गोष्टींचा शोध घेणार आहे.तिथे पाण्याचा पण शोध घेतला जाणार असून पुर्ण वातावरणाचा ठाव घेणार आहे.त्या वातावरणात आजतागायत कोणत्याच देशाचे यान गेलेले नाही. त्यावर अभ्यास करणार आहे.
हा भारत देशाचा पहिला अभ्यासू जिज्ञासू यान आहे
चांद्रयान-२ चे वजन काय तर म्हणतात ३.८ टन इतके वजन आहे.
याच्या आधीही अनेकांनी प्रयत्न केले होते.आणि कोणीच हिम्मत केलेली नाही.परंतू आपल्या भारताने हिम्मत दाखविली .ही गोष्ट सर्वाना माहित आहे.
चंद्रयान-2 हे सर्वात शक्तिशाली महत्वाकांक्षी रॉकेट आहे. हे यानाला चंद्राच्या कक्षेत घेवून जाईल यात ऑर्बिटर आहे, एक 'विक्रम' नावाचा लैंडर आणि एक 'प्रज्ञान' रोवर आहे. प्रथमच भारत चंद्राच्या जमीनिवर उतरेल, ही दूरदर्शिता ठेवून काही वेगळे करण्याचा प्रयत्न केलेला आहे. करोड़ोची लागत लावून बनविलेले आहे.ही नेतृत्व करणारी साधारण वैज्ञानिक नाही ती बुद्धिमान व्यक्तित्वाचे धनी यांनी मिळून मिसळून या कार्याला यशस्वी करण्यासाठी अथक मेहनत करून
चंद्रयान-2 हे 14 ऑगष्टला चंद्राच्या दिशेने प्रवास सुरू करेल. यानंतर 6 सप्टेंबरपर्यंत चंद्रावर उतरणार आहे.
इसरो के प्रमुख के.शिवन त्यांनी या ऐतिहासिक कामगिरी बद्दल विश्वास जाहिर केला आहे.
ही गोष्ट खूप आनंद देणारी खुप खुशीची आहे. मानव जातीचे कल्याण करण्याकरिता लाभदायी उत्थान प्रगती करणारे कार्य आहे. या प्रवासाने आपल्याला नवीन दिशा मिळू शकते इथे आपल्याला जीवन, पाणी, ऑक्सीजन मिळाल्यास भरपूर लाभ घेता येणार आहे.आणि शुभेच्छा
जाहिर करते.