बलात्कार मुक्त भारत?
बलात्कार मुक्त भारत?


ब्रम्हदेवाने स्त्रीची रचना खुप सुंदरपणे केली आहे . स्त्री ममतेचे प्रतीक, प्रेमात अहसास आहे . स्त्री सौंदर्याने रूपवान , कोणालाही मोहित करून टाकेल अशी सुंदरता स्त्रीमध्ये असते. स्त्री फक्त दुसNयांना देणं जाणते, स्त्री कधीही कोणाकडून कधीच अपेक्षा करत नाही. स्त्रीला फक्त एकच पुरुषाकडून, समाजाकडून हवं लागतं तिचा मान-सन्मान प्रत्येकाने करावा, ।स्त्रीला खुप काही सहन करावे लागते. एका वेळेस अनेक भुमिका निभवावी लागतात.
जन्म होता स्त्रीचा अनेक नात्यांचा जन्म होता. जन्म झाल्यानंतर आई-वडिलांचं काळीज ती मुलगी असते आई- वडील त्या मुलीला खुप प्रेमाने आपुलकीने आदराने वाढवतात जसजशी मुलगी मोठी व्हायला लागते तस तशी तिच्या आई-बाबाची काळजी वाढत जाते. माझी मुलगी स्वत: आयुष्य आनंदाने आणि निडरपणे जगू शकेल का ? मुलींची काळजीपोटी वडिलांना रात्रीची झोप पण येऊ देत नाही? माझी मुलगी घरा बाहेर गेली तर ती सुरक्षित असेल ना? ती सुरक्षित घरी वापस येईल ना? असे अनेक प्रश्न आई-वडिलांच्या मनात येत असतात.
मुली मनाने कोमल असतात. मुलाने जरी चुक केली तरी मुलीलाच दोष दिला जातो. कधी मुली सोबत काही वाईट कृत्य घडलं तर त्याचा दोष पण मुलीच्या माथी पडला जातो. मुलीला जज करणे सर्वांचा टाईमपास झाला आहे. कोणत्या मुली सोबत बलात्कार झाला की त्याच मुलीला जज केल जातो कपडे व्यवस्थितपणे घालता येत नाही का ? तिला अंग भरून कपडे घालता येत नाही का? केस बांधून ठेवता येत नाही? का छोटे छोटे कपडे घातले तर? मुलांची दृष्टी बदलेलच ना? खूप उशीरापर्यंत तिला बाहेर कशाला राहिले पाहिजे दिवस मावळताच घरी यायला हवं? मुलीच्या आई-वडिलांना बोललं जातं मुलींना चांगले शिकवण देता येत नाही का मुलांच्या समोर येऊ नये अंग भरून कपडे घालावे! माणसं पोरं पाहून हळू चालावे खाली मान घालून चलावे? स्वतःला जर सावरलं असतं तर तिच्यावर बलात्कार झालाच नसता ही सर्व चूक तिच्या आई-वडिलांची आहे.
दोषींच्या पिंजNयात मुलीलाच उभं केलं जात? जिच्या सोबत चुकीचे होऊन सुद्धा तीच गुन्हेगार होते का तर, समाजात स्त्रीला कमजोर समजला जातो . आताच्या काळात सुद्धा काही ठिकाणी मुलीला फक्त आणि फक्त मजबुरी,कमजोर, आबला समजलं जातं, बलात्कार झाल्यामुळे अनेक स्त्रिया,मुली त्यांच आयुष्य बरबाद होत आहे. प्रत्येक क्षणाला कितीतरी मुली बलात्कारामुळे स्वतःच आयुष्य संपवत आहेत. बलात्कार छेडछाड हे जर थांबवायचं असेल आणि आपला देश बलात्कार मुक्त करायचा असेल तर? घराती
ल प्रत्येक आईने तिच्या मुलाला हे शिकवलं पाहिजे की मुलीचे कपडे न पाहता त्या मुलीची इज्जत करायला शिकवलं पाहिजे ? मुलगी नुसती भोग वस्तू नसून ती एक जन्म देणारी आहे. राखी बांधणारी बहीण काळजी घेणारी पत्नी संसार चालवणारी एक भक्कम स्त्री आहे. मुलीला जज करण्यासाठी आपल्या मुलांना असे चांगले संस्कार दिले पाहिजे की ज्याने करून प्रत्येक मुलगा स्त्रीकडे आदराने आणि मानसन्मानाने पाहिला पाहिजे.
समाजातील प्रत्येक स्त्री-पुरुषांनी ही काळजी घेतली पाहिजे की आपल्या मुलांना आपण मुलींची इज्जत करायला मानसन्मान करायला शिकवलं पाहिजे हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे ज्या दिवशी तुम्ही तुमच्या मुलांना चांगले शिकवून देतात त्या दिवशी मुलगी किती उशिरा बाहेर काम करत असेल किंवा घरी कधी येत असेल तरी तिला भीती राहणार नाही प्रत्येक बाब मुलीला जन्म द्यायला घाबरणार नाही ज्या दिवशी प्रत्येक मुलगा मुलीची स्त्रीची इज्जत करायला शिकेल त्या दिवशी खNया अर्थाने आपला भारत देश बलात्कार मुक्त होईल. हे सर्व करण्यासाठी प्रत्येकांच्या आई-वडिलांनी मुलांना एक चांगली शिकवण देणे खूप जरुरी आहे. लहानपणापासून आपल्या मुलांना मुली विषयी आदर निर्माण करायला शिकवणे हे त्यांच्या आई वडिलांचे कर्तव्य आहे आपल्या घरात जर कोणती मुलगी असेल तर त्या घरातील सर्व मंडळींनी त्या मुलीशी आदराने प्रेमाने वागले तर घरातील छोटे मुलं त्या मुलीचा आदर करायला लागतील जी शिकवण घरातून सुरू होते ती समाजापर्यंत पोहोचते छोटीशी सुरुवात समाज घडवायला परिवर्तन आणायला मदत करते .
ज्या दिवशी तुम्ही तुमच्या मुलांना मुलीची इज्जत करायला शिकवाल मानसन्मान करायला शिकवाल !!! खNया अर्थाने तुम्ही आई-वडील आहात हे समजेल ,, घरातील प्रत्येक मंडळींनी काळजी घेतली पाहिजे की आपल्या तोंडातून मुली विषयी बोलताना चुकीचे शब्द निघणार नाहीत किंवा आपण कोणत्या मुलीशी सोशल मिडीयामधुन चुकीचे उच्चार काढणार नाही. ना याची काळजी घेणे खूप जरुरी आहे छोट्या मुलांच्या समोर आपण कोणत्या मुलीशी अपमान केला तर तेच मुलांच्या डोक्यात बसल्या जाते आणि पुढे चालून तेच रूपांतर एका बलात्कारामध्ये होईल !!
मुलींना वाचवा
मुलींना जगवा
आपला देश
बलात्कार मुक्त करा
प्रत्येकांचा एकच नारा
बलात्कार मुक्त देश माझा।