स्त्री
स्त्री


स्वर्गाची वाट ती
ममतेची मुर्ती ती
सुर्याची पहिली किरण ती
संस्काराचा खजिना ती
स्वर्गीच्या देवा उघड दाराचा धोपाटा
बघू दे माझ्या आईचं कुर्बानीचा मुखवटा
स्वर्गीच्या देवा तू जातीचा कुंभार
घडितो मोडितो जळो तुझा व्यापार
स्वर्गीच्या देवा घेऊ नये तुझे नाव
माझ्या गं माईचा मुखवटा तू मला आई दिलास
मातेच्या प्रेमाची महती काय सांगावी ? दिवस रात्र कमी पडेल भल्या पहाटे उठून दळण दळताना आईची आठवण येते मला. दळण दळणाऱ्या या स्त्रीच्या मनाचे सामर्थ्य किती आहे पहा एका हाताने जाते ओढते, दुसऱ्या हाताने जात्याला घास भरवते.
आणि एका क्षणात मनाने स्वर्गाच्या दारावर मूल जन्माला घालण्यासाठी दरवाज्यावर थाप देण्यासाठी पोहचते. माझी आई मला दाखऊ, तू मला सृष्टीचा निर्माता तू आहेस हे तू मला ते माहीत करून
दिलंस नाही, माझ्या आईच्या चेहऱ्यात मला तू दिसतोस.
आईच्या प्रत्येक सभासद कुर्बानी असतात आहे संस्कार ममता माया प्रेम सर्व देतो प्रत्येक मुलाने तिच्या आईचे रिस्पेक्ट करावी आई हाउसवाइफ असले म्हणून काय झाले. मुलाच्या सुखासाठी ते सर्वकाही कुरबान करते. मुलाला जन्म देण्यासाठी ते स्वतःचे स्वप्न स्वतःचे अस्तित्व ती मिठुन टाकते. आईनं शिकल्यामुळे मुले तिचे पावला पावलाल अपमान करतात. ज्या स्त्रीने जन्म दिला लहानाचं मोठं केलं. आयुष्य पूर्ण व्हाहून टाकलं
त्या स्त्रीला मान द्यावा सन्मान द्यावा . चार भिंतीला घर करणाऱ्या स्त्रीला सन्मानाने वागवा.
देव माणसाला जन्माला घालतो. मृत्युच्या दाढेत उभा टाकून मुलाला जन्म देऊन ती मुलाला घडवते करते. त्या मुलाला खूप मेहनतीने ओढवते.
त्या आईला त्या स्त्रीला मोकळा श्वास आणि जगू द्या!!!