बाप
बाप


आज बाप दिवस आहे.. बाप.. कसला कणखर शब्द वाटतो ना हा.. आणि बाप असतोही कणखर.. आपल्या परिवाराची जबाबदारी तो अगदी सहज निभावत असतो.. आणि बाप, वडील म्हंटल म्हणजे ते सुरुवातीला आपल्याला वळण लावणारे असतात.. आणि नंतर आपल्या सोबतीने चालणारा होऊन जात असतो..
बाप,वडील म्हंटल म्हणजे नेहमी वाटत राहतं त्यांचा जो रुबाब आहे तो असाच निरंतर कायम रहावा.. आणि त्यांना तसं बघण्यातही एक वेगळाच अभिमान असतो.. पण, काळाप्रमाणे त्यांचा स्वभाव बदलत गेलेला असतो.. कणखर मधून ते अगदी प्रेमळ होऊन गेलेते असतात..||१||