म्हणून संसार देखणा होतो
म्हणून संसार देखणा होतो


स्त्री थकत नाही , हरत नाही ...
हरली , तरी रडत बसत नाही ..,
ती धडपडते, मार्ग शोधते...
स्त्री ...
सतत कार्यमग्न असते...एखाद्या मुंगीसारखी,,सतत कशाचा तरी साठा करत असते...
मुंगीसारखीच,,,शिस्तबद्ध ...आखीव मार्गावरुन चालत राहते,...
स्त्री ..
जगण्यासाठी तिला व्यसनांचा आधार लागत नाही .,,तिच्यातील जिविगिषु वृत्ती हेच तिचं व्यसन....
ती जगते.....गर्भाशयात मारली गेली नसेल, तर नक्कीच जगते....!
स्त्री ..
धारण करते, पोषण करते...
जगते , तशीच जगवते...
ती मोडत नाही , ती थकत नाही ....
अतीव दुःखानेही , ती कोलमडत नाही
....
स्त्री ...
जन्मतःच लढवय्यी असते...
xx आणि xy गुणसूत्रांच्या गोंधळात, ती सहसा पडत नाही ..,कारण, तिला पक्कं माहिती असतं....तो एका क्षणाचा अपघात असतो केवळ,...!
स्त्री ..
तत्त्वज्ञान जगते,..!
जगण्याची कला ती उपजतच जाणते....
स्विकार , अनुकंपा ,क्षमा ही जगण्याची सूत्रच असतात मुळी तिची ....
आपलं अस्तित्व टिकवून, आपल्यावर अवलंबून असणाऱ्या सर्वांना ती जगवते....
ही तपस्या तीच करु शकते....
स्त्री ...
धात्री असते....म्हणूनच , चिवट आणि संयमी असते....!
ती स्वार्थी असूच शकत नाही ....!