स्त्री आणि पुरुष
स्त्री आणि पुरुष


स्त्री आणि पुरुष हे दोघेही खरंतर आपल्या कुटुंबाची जबाबदारी पार पाडत असतात. यात स्त्रीने घर सांभाळावं आणि पुरुषांनी बाहेर जाऊन पैसे कमवून आणावेत अशी पूर्वापार मांडणी आपल्या समाजात झालेली दिसते.
पण आधुनिक जगातच स्त्रिया बाहेर पडून काम करू लागल्या आहेत आणि पैसे कमवू लागल्या आहेत असं एक चुकीचं चित्र उभं केलं जातं. कारण बहुजन स्त्रिया ह्या पूर्वीपासूनच काम करून आपल्या घराला आर्थिक हातभार लावत होत्याच मग त्यात आपल्या शेतात आणि परसदारी पिकलेल्या भाज्या, फळं, धान्य लोकांना घरोघर जाऊन विकणं असू दे, मोठमोठ्या श्रीमंतांच्या वाड्यांमध्ये स्वयंपाक पाणी करणं, झाड लोट, साफ सफाई, गाई गुरांची काळजी घेणं असू दे, शेतावर मजुरी करणं, आपल्या बलुत्याची कामं करणं ,,,,
कालांतराने, समाजसुधारणा झाली महिलांना प्रत्येक ठिकाणी पुरुष बरोबरच स्थान मिळाल. काही पुरुषाने स्त्रियांना बरोबरीचा हक्क दिला पण समाजात भरकटलेले विचाराचे पुरुष खूप आ
हेत स्त्रियांना चूल आणि मूल यातच खुश रहावं असं म्हणतात.
ग्रामीण भागात अशा खूप बायका आहेत. घरगुती परेशानी छेळ, भोगत आहेत ग्रामीण भागात स्त्रियांना स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप काही सहन करावा लागत आहे। स्वतःचे स्वप्न मनातच ठेवून संसार नीट चालवावे लागत आहे. ग्रामीण भागातील स्त्रियांना स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कधी आपल्या सोबत कधी आपल्या नात्या बरोबर ॲडजस्टमेंट करून स्वप्नांसाठी झगडावे लागते. ते करून सुद्धा स्वप्न पूर्ण होत नाही हमेशा स्त्रीलाही कुर्बानी द्यावी लागते आहे, समाजाचे घरच्यांची दृष्टी कधी बदलेल स्त्रीला पूर्णपणे स्वातंत्र्य कधी मिळेल.
प्रत्येक परिवाराची जबाबदारी आहे स्त्री आणि पुरुष एक सारखे आहेत दोघांनी घर चांगलं चालू शकते. स्त्री-पुरुष एकत्र येऊन काहीही करून दाखवू शकतात स्त्रीला पूर्ण स्वातंत्र्य देऊन तिच्या पाठीमागे सपोर्ट सिस्टम म्हणून प्रत्येकाने उभा राहिला पाहिजे स्त्री-पुरुष एकच आहेत हे प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे