Shobha Wagle

Abstract Horror Thriller

2  

Shobha Wagle

Abstract Horror Thriller

भयपट आणि मी

भयपट आणि मी

2 mins
78


अगदी लहानपणाची गोष्ट. गावात कुणी मरण पावले तर मला खूप भिती वाटायची. ज्या घरात मृत्यू झाला त्या घरा समोरून एकटं जायला मी कधी धजावले नाही. पुर्वी गावात विजेची सोय नव्हती. त्यामुळे संध्याकाळी अंधुकशा प्रकाशात अथवा चंद्रप्रकाशात झाडाच्या फांद्यांच्या हलण्यामुळे वेगवेगळ्या आकृती दिसायच्या आणि खूप घाबरगुंडी व्हायची. मोठाल्या घरात रात्री लामण दिव्याच्या प्रकाशात वावरणे, भयानक! तसेच चालतांना आपल्याच पायांच्या आवाजाने मागून कुणी येतयं हे समजून धडपडत धावायचे व घामाघूम व्हायचे.

भूता खेतांच्या गोष्टीतली भूते, ही दिवसा ढवळ्या दिसायची म्हणून घाबरणारी मी, नंतर थोडी धीट झाले.

शिक्षणाकरता मुंबई शहरात आले आणि विजेच्या लख्ख प्रकाशाने भिती जरा कमी झाली.

कॉलेजमध्ये शिकत असतांना मैत्रिणीच्या संगतीने सिनेमाची गोडी लागली. अगोदर बघत होतेच पण ते साधे सरळ चित्रपट. एकदा लेक्चर बंक करून मेटिनी शो बघायला गेलो. सिनेमा होता "वह कौन थी?" साधना व मनोजकुमार, राज खोसला निर्मित. या सिनेमात एक एक सीन एवढा भयानक होता, बापरे! अगोदरच मी घाबरट व त्यातून अशी थरारक मुव्ही. अक्षरशः मी थेटरमध्ये ओरडत होते. मी डोळे झाकत होते आणि अधेमधे हळू हळू डोळे उघडून बघतही होते, ते ही मैत्रिणीचा हात घट्ट पकडूनच!! माझ्या ओरडण्याने बाकीचे प्रेक्षक ओरडले "कौन बच्ची आयी है रे थेटर में?" "बाहर जाओ।" माझ्या मैत्रिणीने मला सावरले. संपूर्ण सिनेमा माझ्या मैत्रिणीने बघितला आणि मी मात्र अर्धवटच. नंतर बऱ्याच दिवसांनी भीती गेल्यावर तोच चित्रपट पुन्हा बघितला व खरा खुरा आनंद घेतला.

त्या नंतर माझी भिती कमी होत गेली आणि मला भयपट खूप आवडू लागले. मैत्रिणिच्या आग्रहाखातर मी मेटिनी शो बरेच बघितले जसे "मेरा साया", 'बीस साल बाद", " गुमनाम" भूत बंगला" तसेच इंग्रजी मुव्ही The Mare move, Ghost ship, Bata वगैरे. इंग्रजी हॉरर मुव्ही जरा जास्तच भयानक, त्या मानाने आपले मराठी जरा कमीच. "खतरनाक" मजेशीर आहे "रेगे" मात्र भारदस्त आहे. 

भयपट पाहणारे प्रेक्षक पुर्वीचे व आजचे यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. आजच्या तंत्रज्ञानामुळे अजब थरारक दृष्ये सहज दाखवता येतात. पुर्वीच्या निर्मात्यांचे कौतुक करावे तितके थोडेच. त्याकाळचे भयपट पाहिल्यावर आजच्या युगातल्यां प्रेक्षकांनाही त्यांचे कौतुक आणि अभिमान वाटेल.


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract