Supriya Jadhav

Abstract Tragedy

2.5  

Supriya Jadhav

Abstract Tragedy

'भयानक प्रसंगाची आठवण'

'भयानक प्रसंगाची आठवण'

4 mins
1.0K


मला पाऊस खूप आवडतो. माझ्या पावसाच्याआनंददायी अशा आठवणी खूपआहेत. तशाच अंगावर शहारा आणणारी एक आठवणही आहे. मागील काही वर्षांपासून निसर्गाचा समतोल बिघडलाय. पावसाळ्यात माळीण सारख्या घटनांचे प्रमाण वाढलयं .प्रत्येक वर्षी मुंबई ची तुंबई होऊ लागली आहे.

पावसाचे वेळापत्रकच बदलून गेलंय. कधी तो प्रतिक्षा करायला लावतो.तर तो हवाहवासा वाटत असतानाच अतिवृष्टी करतोय, थांबायचं नावच घेत नाही. त्याचा हा धिंगाणा,धसमुसळेणा बस्स झाला आता असं म्हणायला लावतो. यावर्षी ही मागील काही आठवड्यात त्याने घातलेला धिंगान्याने चिपळूण जवळील तिवरे धरण फुटल अन प्रचंड जिवीत व वित्त हानी झाली. या घटनेन मला २५ जुलै२००५ चा चिपळूण मध्ये आलेल्या महापुराची आठवण करून दिली तेव्हा झालेली दैना, माझ्यावर ओढवलेला भयानक प्रसंगाची आठवण झाली.


२००५ साली माझे पती गुजरात, जामनगर येथील रिलायन्स कंपनी मध्ये नोकरी करत होते. मी अन माझ्या दोन मुली चिपळूण, वालोपे इथल्या आमच्या घरी राहत होतो. मी चिपळूण शहरा लगत पाच किलोमीटरवर असलेल्या वालोपे या गावात राहत होते. हे गाव मुंबईगोवा हायवेलगत आहे. माझे घर ही हायवेलगत व वालोपे रेल्वेस्टेशन पासून जवळ होते. चिपळूण शहर व वालोपे रेल्वेस्टेशन वाशिष्ठी नदीकाठावर वसलेले आहे.


तिवरे धरण फुटी नंतर आठलेला प्रसंग मी सांगतेय . २००५ची ती आषाढ पौर्णिमा होती. दडी मारलेल्या पावसाने या दिवसापासून मुसळधार कोसळायला सुरूवात केली होती. २४जुलै पासून पाऊस कोसळत होता. रात्रभर पावसाची संततधार सुरू होती. २५जुलैच्या सकाळीच वाशिष्ठी नदीच पात्र ओसंडून वाहत होतं. शहरात, तसेच नदीकाठावरील गावात पाणी दोन फुटावर होते. तसे ते प्रत्येक वर्षी भरायचे, अन ओसरायचे. लोकांना त्याची सवय होती.पणयावेळी मात्र विपरीत घडत होते, याचा अंदाज ही लोकांना आला नाही. पण संततधार कोसळणाऱ्या पावसाने ढगफुटीसारखे रुप घेतले.


चिपळूण शहराच्या पूर्व दिशेला असलेले कोळकेवाडी धरण ओव्हर फ्लो व्हायला लागले. धोक्याची घंटा घणघणू लागली होती. तिथल्या अधिकाऱ्यांना लोकांना पूर्वसुचना द्यायला ही उसंत मिळाली नाही. परिस्थिती हाताबाहेर गेलेली पाहून दुपारी चार वाजता धरणाचे दरवाजे काही फुटावर ऊंच करावे लागले. पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग होऊ लागल्यामुळे अचानक चार वाजता पाण्याच्या लोंढ्याने नदीकाठावरील गावे सती, खेर्डी, चिपळूण, माप या गावात प्रवेश केला .अचानक आलेल्या पुराच्या पाण्याने सर्वत्र हाहाकार माजला.प्रचंड घबराट पसरली. जो,तो आपला जीव वाचवण्यासाठी धडपडू लागला. बरेच जण पाण्यात अडकले होते. गावातून रेल्वेस्टेशनवर यायला मधला पूल होता त्या पुलावरून धावतच त्या गावातील लोकांनी वालोपे गावात धाव घेतली. मंदिरात,शाळेत,घरात लोकांनी आसरा घेतला.


तसे पाहता मी सुरक्षित भागात राहत होते. तिथून पाच मिनीटांच्या अंतरावर वालोपे रेल्वेस्टेशन वाशिष्ठी नदीच्या काठावर होते. आमच्या बिल्डींगपासून वाहणारा मोठा ओढा या नदीला जाऊन मिळाला होता. त्यामुळे ओढ्यावाटे घुसलेले नदीचे पाणी आमच्या इमारतीच्या मागे काही अंतरावर असलेल्या केळकरांच्या बंगल्यामागे आले होते.


तसे पाहता आम्हाला ही धोक्याची घंटा होती. त्यातच कामथे धरणाला ही गळती सुरू झाली होती. हे धरण फुटू शकते अशी अफवा वाऱ्याच्या वेगाने पसरली. वालोपे ही या धरणाच्या टप्यात येत होते. अघटीत घडलं तर आम्ही खूप मोठ्या संकटात सापडणार होतो. आमच्या परिसरातील लोक,ज्यांचं गाव सुरक्षित ठिकाणी होतं, तिकडे निघाले. आमचे शेजारी काणे काका ही त्यांच्या आयनी मेटे या गावी निघाले. आम्हाला सोबत चला म्हणाले पण मी माझ्या घरीच राहण्याचे ठरवले.


आमच्या इमारतीत सहा कुटुंब त्यातील चार कुटुंब होती ती तिथेच राहीली. सगळे खूप चिंतेत होते. माझे घर तळ मजल्याला होते. मला जास्त भीती होती. शेजारचे काका त्यांच्या गावी गेलेले होते. आमच्या फ्लोअरला मी एकटीच राहीले. माझ्या मुलींच्या शाळेला सुट्टी देण्यात आली होती. मी अन माझ्या दोन मुली घरी होतो. पतींना किंवा माहेरी संपर्क साधता येत नव्हता. फोन,लाईट सगळंच बंद झालं होते.


वरचे शेजारी कानल यांच्या घरी आमच्या कुटुंबाचे मित्र सदानंद कुलकर्णी यांचा फोन रात्री आठ वाजता आला. वहिनीची काळजी घ्या. कानल वहिनींकडे आज रात्री रहा ,त्यांच्या स्वरात आमच्या बद्दल काळजी होती. ते ऐकून माझे डोळे अश्रूंनी भरले.


मी माझ्याच घरी थांबण्याचा धाडसी निर्णय घेतला. गणपती बाप्पवर माझी खूप श्रध्दा होती. आमच्या रक्षणाचं त्यालाच साकडं घातलं. आम्ही खिचडी खाल्ली. मुलींना भिती वाटू नये म्हणून मी न घाबरता सकारात्मक बोलत त्यांना धीर देत होते. १०वाजता तुम्ही शांत झोपा मी जागीच रहाते. असं सांगून त्यांना झोपवलं. माझ्या चिमुकल्या माझ्यावर ठाम विश्वास ठेऊन झोपी गेल्या. मनात मी सुरक्षिततेसाठी काय करता येईल हे योजत होते.


 मेणबत्ती अन निरांजनाच्या प्रकाशात झोप येऊ नये म्हणून पुस्तक वाचत बसले. बऱ्याच वेळाने कधी नकळत डुलकी लागली ते कळलेच नाही. पहाटे पाचला खडबडून जागी झाले. अन धावतच गच्चीत गेले.सगळे आलबेल होते. माझ्या जिवात जीव आला, पण पाऊस अविरत सुरूच होता

 २६ जुलैला ही पाऊस पडतच होता. चिपळूणमध्ये सर्वत्र हाहाःकार माजला होता.


 दुपारी हळू हळू पाणी ओसरू लागले होते. लाईट,फोन अजून गायब होते.हा भयावह अनुभव अजुनही स्मरणातून जात नाही. तिवरे धरणाच्या प्रसंगाने या आठवणींना उजाळा मिळाला.ही आठवण मी माझ्या मुलींनाखूपवेळा सांगितलेय.त्याही माझ्या हिंमतीला दाद देतात. हा असा ही पाऊस अन अशा पाऊसवेळा आयुष्यभर माझ्या स्मरणात राहतील.


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract