The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW
The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW

Supriya Jadhav

Others

3  

Supriya Jadhav

Others

संसाराची जबाबदारी दोघांची

संसाराची जबाबदारी दोघांची

2 mins
634


"अवनी आज सकाळपासून बघतेय तुला तू खूप उदास आहेस,एनी प्रॉब्लेम?.. अवनी ची मैत्रिण मुग्धा लंच ब्रेकच्या वेळी तिला विचारत होती. अवनी बोलली, "हो गं आहे जरा प्रॉब्लेम. त्यावर मुग्धा बोलली, "काय प्रॉब्लेम आहे तो सांगून टाक, कदाचित त्यावर काहीतरी सोलूशन निघेल. तसेही आज येथे आपण दोघीच आहोत." अगं अवी आणि माझ्यात आज खटका उडाला, हल्ली आमच्यात खुप खटके उडू लागलेत. अवी खुप ऐतोबा झालाय. घरातली, बाहेरची ही सगळी कामे मलाच करावी लागतात. किराणा सामान आणणे, भाजीपाला आणणे, दुधबील देणे, अगदी इस्त्रीला कपडेसुध्दा मलाच द्यावी लागतात. पुरती हैराण होऊन गेलेय मी." मुग्धा बोलली, " तूच लाडावून ठेवला असशील त्याला, त्याचेच परिणाम दिसताहेत बहुतेक आता." " हो गं याला मीच जबाबदार आहे.आमचा प्रेमविवाह. विवाहानंतर प्रेम अधिकच फुलत गेलं. या काळात मी त्याचे खुप लाड, कोडकौतुक केले, तेच आता माझ्या अंगाशी आले आहे. त्याला सकाळी उठल्यावर बेड टी सुध्दा बेडवर नेऊन द्यायचे. तो इतका लाडोबा झाला की आॉफिसला निघताना सॉक्स, रुमाल, कपडे त्याला मीच काढून द्यायचे. दोन वर्षं लग्नाला झाली. सुरवातीला किराणा तरी भरून द्यायचा, नंतर त्यात ही टाळाटाळ करू लागला. त्याच्याबरोबर मीही नोकरी करते. सगळ आवरून आॉफिसला येताना माझी खुप दमछाक होतेय गं, त्याला बोलले आता तुझी काम तुच करत जा, माझी तारांबळ उडतेय, तर बोलतो कसा, माझी कामाची सवय तुच मोडलीस. मग आमचे खटके उडतात. प्रेमाच्या त्या मंथरलेल्या सुरवातीच्या दिवसांत मी त्यांचे लाड केले, आता त्याला वठणीवर कसं आणू?."


मुग्धा तिची कैफियत ऐकत होती, ती बोलली, "यात चुक तुझीच आहे. तु जे काही बेड टी वगैरे लाड केलेस ते अतिलाड झालेत. आधुनिक काळात आई वडीलसुध्दा मुलांना स्वावलंबनाच्या सवयी लावतात, पण तु तर त्याच सगळं लहान मुलासारखे केलेस आणि आता तो पुर्णपणे परावलंबी झालाय. संसार दोघांचा आहे, दोघांनी ही सांसारिक जबाबदाऱ्या वाटून घ्यायला हव्यात. पुर्वीचा काळ आणि आत्ताचा काळ यात खुप फरक आहे. पती पत्नी दोघांनीही एकमेकांचा विचार केला पाहिजे. एकमेकांचे सुखदु:ख वाटून घेतले पाहिजे.


नवरा-बायकोच्या नात्यात घरातले सगळे व्यवहार, बॅंकांचे व्यवहार, सगळ्या बारीक सारीक गोष्टी, मुलांचे संगोपन ही दोघांनी मिळून करायला हवे. संसार दोघांचा असतो, एकावरच सगळ्या गोष्टींचा ताण यायला नको. तू ही नोकरी करतेस, दमून घरी जातेस, या सगळ्यात तुझी दमछाक होते हे तुझ्या नवऱ्याला समजावून सांग. आता तुम्ही दोघेच आहात नंतर एखादं मुलं होईल तेव्हा काय करणार?...त्याला विश्वासात घेऊन सगळं समजावून सांग. लाडावलेल्या नवऱ्याला लवकरच ताळ्यावर आण. मुग्धाशी बोलून अवनीला खुप हलकं हलकं वाटलं. आळसावलेल्या नवऱ्याला ताळ्यावर आणण्याचा तिने निश्चय केला. 'संसार दोघांचाही असतो. दोघांनी ही तो सावरायचा असतो, पसारा झालाच तर दोघांनीही तो आवरायला असतो.


Rate this content
Log in