Sarika Jinturkar

Abstract

4.4  

Sarika Jinturkar

Abstract

भेटीच्या स्मरणीय आठवणी

भेटीच्या स्मरणीय आठवणी

4 mins
409


"भेट"या शब्दाची खरंच प्रगल्भ व्याप्ती आहे.. खरं तर मानवी जीवन आपल्याला परमेश्वराकडून मिळालेली एक अमूल्य अशी भेटच तर आहे..

आपल्या आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती काहीतरी कारणास्तव आपल्याला भेटते, आपल्याला भेटलेल्या प्रत्येक व्यक्ती कडून काहीतरी शिकणं अपेक्षित असतं.. आणि विधात्याने जाणीपूर्वक लिहिलेलं आपल्या आयुष्यातील ते एक पान असतं असं मला वाटतं.... 

 

आपल्याला मिळालेल सुंदर आयुष्य परमेश्वराने दिलेली एक अनमोल भेट तसेच परमेश्वराकडून मिळालं, जीवनाची गोडी वाढवणारं अनमोल अशी भेट म्हणजे आई-बाबा... आईप्रमाणेच आपल्या आयुष्यात बाबांचं प्रेम एवढं अमूल्य आहे बाबाला चार शब्दात मांडणे तर कठीणच आहे... त्याचप्रमाणे कुटुंब हे प्रत्येक मानवाच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे तो आपल्या कुटुंबाशी एका रेशमी बंधाने बांधलेला असतो हेच रेशमी बंध असतात जिव्हाळा आपुलकी आणि प्रेमाचे हेच आपल्याला मिळालेली एक सुंदर अशी भेट... भेटीच्या स्मरणीय आठवणी सांगायच्या झाल्या तर...


शिक्षण पूर्ण झाल्यावर बरेच दिवसानंतर बालपणीच्या, शाळेतल्या, मैत्रिणींना भेटले आमच्या मैत्रीतील चमक आजदेखील तेवढीच भासली  

प्रत्येकीचा चेहरा खूप बोलका होता मनात मात्र मैत्रीचा सोहळा वेगळाच होता जणू हिरव्यागार मैत्रीचा बगिचा बर्‍याच दिवसांनी फिरायला मला भेटले 

सुख-दुःख एकमेकांची सांगून मग सगळेच जोरजोराने हसले. आयुष्याच्या वळणावर खूप दिवसांनी मैत्रीचे गाव भेटले सोनेरी क्षण असे मी त्यांना मग नाव ठेवले... अशा त्या विलक्षण क्षणांची, भेटीची आठवण येत राहणार प्रत्येक क्षण हृदयावर माझ्या राज्य करत राहणार. लग्न ठरतांना त्याची माझी झालेली पहिली भेट 


भेट झाली परिचय नव्हता आमचा एकमेकांशी 

भेट होती काही क्षणांची जुळलेली होती

नाती जन्मोजन्मीची दोघांच्या मनाची नव्याने ओळख झाली

मग अनोखी भाषा होती प्रीतीची श्वासांना झाली

जाणीव नव्याने जाणवले मला स्पंदने माझ्या हृदयाची

आज पुन्हा त्या भेटीची स्मरणीय आठवण झाली 

मनाने माझ्या पुन्हा एकदा उंच झेप घेतली

पुन्हा तोच अल्लड वारा साद घालीत होता

त्या सप्तपदीतील शपथीच्या साथीस होता सुगंध फुलांचा

आठवण झाली आज त्या सोनेरी क्षणांची

अनमोल अश्या जीवनात मिळालेल्या जीवलगाच्या भेटीची....


रोजची सांजवेळ ...रोजचाच निसर्गाचा खेळ...पहाता भुरळ पडते मनास... 

क्षितिजावर पसरलेले असता सुवर्ण तपकिरी ते झुंबर  

पसरुनी दोन्ही हात सूर्यास कवेत घेतात जेव्हा अंबर

सांजवेळी पाखरांची सुरू झालेली मग नभी  

परतण्या घरी लगबग 

आसुरली पिल्लांच्या भेटीसाठी...

पहावी माया ही पाखरांची टिपावा वाटे रोजच

नयनांनी हा रम्य संध्या सोहळा

नभही सावळे उतरतात भेटाया धरेला

कोण कोणास मिळे कळे ना कुणाला...

धरणी ही कूस बदलते भेटण्यास रजनीला... 

स्मरणीय भेट अस म्हणावं लागेल ना याला....


प्रत्यक्ष भेट न होता अप्रत्यक्षपणे भेट अशी ही आपुलकीच्या जिव्हाळ्या असणारया व्यक्तींशी... थोडी गप्पांची, थोडी मस्तीची.. काही व्यक्त संवादांची काही अव्यक्त भावनांची... रोजच्या गोष्टी... गप्पांची.... स्मरणीय तर असते...


 सासरचे घर घरातला थाट

 पण हळूहळू का होईना ओढ लावते

 जीवाला माहेरची वाट  

आठवण झाली आज माहेरी गेल्यानंतर

 खूप दिवसांनी भेट झाली सगळ्यांची अगदी खास

सगळ्यांच्या भेटीची आस जी मला तिथे घेऊन गेली 

पाहता सगळ्यांना स्मित हास्य जडले माझ्या गाली 

झाडे फुलांनी अशी मनमोहक बहरली 

मनी माझ्या जशी प्रेम गीत मोहरली

 वाटल तेव्हा धन-दौलत पैसा अडका हे नाही अनमोल रे या पेक्षा श्रेष्ठ आई-वडिलांचे प्रेम.. भेट ही उबदार जणू

पक्षी स्वच्छंद पुन्हा क्षितिजावरी  

वात्सल्य बघता स्वर्ग वाटे जणू भूतलावरी  

अशाच या भेटीच्या क्षणाला विनामूल्य मोजांव 

त्या मोजलेल्या वेळेत काही आठवणी साठवाव्यात

 त्या साठवलेल्या आठवणीला मनात रुजवावं 

 त्या रुजलेल्या मनातल्या आठवणीला एकांती नव्याने आठवावं म्हणूनच भेटावं...

 भेटीला स्मरणीय आठवण करून आपल्या हृदयात कायमरूपी साठवावं....  


 शाळेत रूजू झाले असतांना...

 नेहमीच ती वाट होती 

सभोवतालची गर्दी तीच होती अन् त्या वाटेत भेट झाली... जिवलग काही मैत्रिणीची...आमची

 झालेली भेट त्यातून ओळख मग आठवणी...

 पाण्यासाठी कासावीस जसा तृषार्थ 


तशी माती व्याकुळ पावसा प्रित्यर्थ

त्या परी मन हे साद घाली भेट व्हावी नेहमीच कृतार्थ

कारण भेट निराळीच होती आमची जी योगायोगाने घडून आली होती..

वाटतं नेहमीच असावा असा सहवास.. जिथे मन मोकळी करता येईल...खूप काही नवीन शिकता येईल... भेट क्षणांची असो वा खूप वेळेची नेहमी स्मरणात राहील दुःख दूर होऊन आपलेपणाचा भास होईल मनावरील सार ओझ विसरून पुन्हा नव्याने जगता येईल....

 ..... खरच आपुलकीच्या व्यक्तीची नकळत अशी घ्यावी भेट की ती काळजाला भिडावी थेट  

ती वाटावी सगळ्यांपेक्षा विशेष 

असावा त्यात आपुलकी जिव्हाळा आणि समोरचा पण म्हणेल वाव द्याट्स ग्रेट... अशी भेट मी तर घेतलीच आप्त जणांची....तुम्ही पण कदाचित घेतली असेल...सर्रप्राइज देऊन....काही निराळीच मज्जा, व होणारा आनंद काही औरच...


तसेच कधी विसावलेल्या नजरेत असते ओढ नव्या सुंदर स्वप्नांची भेट घडते कधी स्वप्नात, इच्छा होते जेव्हा खुप दिवसांपासून न भेटलेल्या व्यक्तीला एकदा भेटण्याची न घडलेली भेट मग स्वप्नात घडते खर्‍याखुर्‍या भेटीची ओढ मग मनात जडते...स्वप्नात पण भेट ही होते ...

पण..

गाठीभेटी आता दुर्मिळ होत चालल्या आहे म्हणून आज स्वतःलाच भेटायचं मी ठरवलं हरवलेली मी स्वतःचा शोध घ्यायला मग निघाले...

 कवितेतल्या शब्दांचा अर्थ जुळवण्यात पुन्हा हरवून गेले  


आठवली आज कविता मी पहिल्यांदा केलेली तुटक्या-फुटक्या शब्दातून फुले 

गुलाबाची जणू मनी उधळलेली  

 कवितेने माझीच माझ्याशी भेट घालून दिली 

मनात कवितेच्या ओळी बहरत होत्या 

सुख-दुःख वेदना अनुभव ह्या मांडत होत्या  


भेट अशीच अनमोल ठरत गेली

 अनोळखी पण ओळखीची 

अनेक अशा कवितेतून व्यक्त होतांना

 दाद मिळाली अनेकांची शब्दांना 

 मन अगदी प्रफुल्लित झालं

थोडं का होईना पण जीवनाचं कुठेतरी सार्थ झालयाच समाधान वाटलं ...☺️


म्हणूनच सांगावसं वाटतं सुंदरता नसली तरी चालेल सोज्वळता असली पाहिजे सुगंधापरी सव॔त्र दरवळता आलं पाहिजे. नाते कुठलेही असो त्यात आपुलकीचं बंधन असायला पाहिजे... भेट होत नसली तरी चालेल स्नेहमय गोड संवाद हा असायलाच पाहिजे हीच तर खरी स्मरणीय आठवण ठरेल ...आयुष्यातली कुठलीही भेट जीवनातला विलक्षण आनंद, ओठांवर अलगद येणार हसू बनून राहील अशीच असली पाहिजे....😊 


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract