बौद्ध धम्म व वर्तमान स्थीती
बौद्ध धम्म व वर्तमान स्थीती
बौद्धधम्म धर्म तथागत बुद्धाची अतुलनीय तत्त्वज्ञानाची भेट आहे. परंपरेतून निर्माण झालेला एक धम्म गौतम बुद्धाने समाज कल्याणाकरिता स्थापन केला होता. प्रज्ञाशील,करूणा या तत्त्वांची शिकवण दिली. या वृक्षाला असंख्य डहाळ्या फुटून महावृक्षात रूपांतर झाले. आजतागायत बौद्धधर्म कमी झालेला नाही.
भगवान बुद्ध हे बुद्धीचे प्रतीक आहे. बुद्ध म्हणजे ज्ञान आणि हे ज्ञान प्रत्येक व्यक्तीला मिळायला हवे. प्रत्येक व्यक्तीने ठरवायचे आहे की आपण काय करायला हवं आणि काय नको चांगलं काय आहे आणि वाईट काय आहे. हे समजून तुम्ही जे ही कार्य कराल त्यात ज्ञान असेल कित्येक याच्यावर अभ्यास केलेला सर्वांनी हाच निष्कर्ष काढला आहे. की, जे चांगले आहे त्याचा प्रसार आणि प्रसार करावा. आजची वस्तुस्थिती अशी आहे की सुखसोयींकडे वाढणाऱ्या वस्तू मानवाला आकर्षित करतात. आणि त्यात त्यांना धन्यता वाटत असते. प्रत्येक व्यक्तीला कोणत्यातरी धर्माचा अहंभाव झालेला आहे तो त्यातच गुरफटला आहे. बुद्धांनी असं कधीच म्हटलेलं नाही की जबरदस्तीने तुम्ही हा धर्म कोणताही धर्म स्वीकार करावा. जे ज्ञानवर्धक आहे त्याला तुम्ही महत्त्व द्या. ते तुम्हाला पटलं पाहिजे तुमचं मन काय म्हणतं, त्याच्यावर सर्व अवलंबून आहे.
आज धावपळीचे युग आहे. सर्व शिक्षित असल्यामुळे त्यांना कधी पूजापाठ करायला वेळच मिळत नाही. त्यामुळे धर्माचा अर्थच कळेनासा झाला आहे. प्रत्येक धर्म हे वेगवेगळ्या पद्धतीने मानवकल्याणाकरिता रचलेले आहेत. त्यावर फक्त आपण मीमांसा करून चांगलं शिक्षण घेतले, की ज्ञान वाढून त्याची तरक्की होत असते.
खऱ्या अर्थाने बुद्धीचा प्रयोग केल्यास बुद्धाचा अर्थ आपल्याला कळेल. जो सुज्ञ आहे तोच बुद्ध आहे. ज्याने आपल्या स्वतःच्या इंद्रियांवर, मनावर मात केली आहे तोच खरा बुद्ध आहे. आदिकालीन समाज अनेक जाती-जमातीतील लोकांना योग्य मार्गदर्शनाची कमी होती. ती त्यांना बौद्ध धर्मात मिळाली तो त्यांनी आनंदाने स्वीकारला. धर्माच्या प्रचारासाठी बुद्धांनी प्रसारक तयार केले त्यांना भिक्षू असे म्हणत. या बौद्ध भिक्षूंनी बौद्ध धर्माचा संदेश सर्व जगभर नेऊन पोहोचवला. परदेशात त्या धर्माचा प्रसार झाला. बुद्धीष्ट समाज जागृत केला. लोकांना धर्माचे खरे स्वरूप सांगितले. अखेरपर्यंत लोकांना उपदेश करीत राहिले.
त्याकाळी समाजात अनेक जाती- पोटजाती निर्माण झाल्या होत्या. भेदभाव उच्च-नीच,बेशुमार पशुहत्या या सर्वांचं वर्चस्व खूप वाढले होते. यामुळे समाजातील एकता नष्ट झाली होती. इ.स.पू. ६ व्या शतकात बौद्ध धर्माची स्थापना झाली. बौद्ध धर्म हा स्वातंत्र्य, समता, बंधुता, करूणा, मैत्री आणि प्रेम या मानवी मूल्याची जपणूक कशी करावी हे भगवान बुद्धांनी पटवून दिले.
भगवान बुद्धासारखे महापुरूषांनी आपल्या व्यवहारात आणून संपुर्ण जगाला बोध दिला. बुद्धाचा आदर्श व विचार लोकहितासाठी अमुल्य देणी ठरली. त्यांचे पंचशील तत्व आणि अष्टांगिक मार्ग, सम्यक कर्म आचरणात आणले, असता मानवाचा विकास नक्कीच होतो आणि सु:ख दु:खाच्या मार्गात ही सहज मोक्ष मिळतो.
तसेच भगवान बुद्धाचा अंतकाळ जवळ आलेला पाहून त्यांचे शिष्य फार दुःखी झाले तेव्हा त्यांची समजूत घालताना भगवान बुद्ध शांतपणे म्हणाले "अरे दुःख कशाचे करताय, ज्याने त्याने आपला उद्धार स्वतः करून घेतला पाहिजे. सत्य हाच खरा धर्म आहे. हा धर्म तुम्ही कधीही सोडू नका जनांच्या हितासाठी आणि सुखासाठी सर्वत्र संचार करा" भगवान बुद्धाने हा संदेश पूर्ण जगाला दिला होता. भगवान बुद्ध म्हणतात, ‘‘मानवी जीवन हे दु:खमय वेदनादायक आहे."आशा,तृष्णा,लोभ,मोह, इच्छा, आसक्ती यातून दु:खाची निर्मिती होत असते. म्हणून, आपल्या वासनेवर नियंत्रण ठेवले पाहिजे. शांतीने जगण्यासाठी सदाचाराचा मार्ग अवलंबला पाहिजे. बौद्ध अनुयायींनी उत्तम कर्म योग्य कृत्ये असली पाहिजे. सन्मार्गाने चालण्याचा प्रयत्न करायला पाहिजे .
या सर्व गोष्टींचा विचार करून कृतित उतरतील तोच खरा बुद्धिष्ट आहे. बौद्ध तत्त्वांच्या शिकवणुकीचा मानवाने जीवनात अंगीकार केला तर मानव नक्कीच दुःखमुक्त होऊन आदर्श जीवन जगू शकतो.बुद्धांनी हजारोच्या संख्येत उपदेश करूनी जनकल्याण केले होते.
सम्राट अशोकासारख्या शिष्यांनी जगाला दाखवून दिले की, बुद्धाच्या विचाराने कायापालट होऊ शकतो. तो त्यांनी करून ही दाखविला. कलिंगच्य युद्धानंतर सम्राट अशोकाने लढाई बंद केली. धम्माचा प्रचार करून आपल्या प्रजेला सावरले. बौद्धाचे विचार त्यांनी आत्मसात करून त्यावर प्रचार प्रसारही केला. वागण्या-बोलण्यात बदल करून त्यांनी प्रजेच्या हितासाठी धम्माचे अनेक प्रयोग केले. त्यांनी धर्म जरी स्वीकार केला नाही तरी त्यावर अनुकरण करून प्रजेच्या हितासाठी शस्त्रांचा त्याग करून मोठ्या प्रमाणात त्यांनी अहिंसा रोखण्यासाठी उपयोग केला.
"भगवान बुद्धांनी स्त्रियांना समान हक्क दिला"त्यांना कधी कमजोर समजले नाही त्यांनी स्त्रियांवर विश्वास दाखवला व पुरूषापासून दूर असण्यावर भर दिला होता. म्हणजेच पुरूषाची नाडी ओळखली होती. नंतर त्यांनी अभ्यासपूर्वक विचार करून स्त्रियांना दीक्षेचा अधिकार दिला होता. भगवान बुद्धांनी त्या काळात काही निती नियम राखून सन्मानाने भिक्षूकी होण्याचा अधिकार दिला. त्यांना समान हक्क देण्यात आला. भिक्षुनी करण्यात आले. बुद्धाच्या मनात महिलांचे खूप मोठे स्थान होते. महा बोधी बुद्धिझम संस्थेने महिलांसाठी ते "थेरी गाथा ग्रंथामध्ये" स्त्रियांबद्दल प्रशंसनीय उल्लेख केला आहे.
तसेच भगवान बुद्धांच्या शिकवणीने डॉ. भीमराव आंबेडकर यांनाही प्रगल्भ बुद्धीला बौद्धाचे विचार पटले. आंबेडकराना धर्मनिरपेक्ष समाज घडवण्याचा होता. त्यांनी नागपूरच्या संमेलनात बौद्ध धर्माचा आपल्या कार्यकर्त्यांसह स्वीकार केला.