सुमित संदीप बारी

Action Fantasy Inspirational

5.0  

सुमित संदीप बारी

Action Fantasy Inspirational

बालवीर : भाग - ४ (अंतिम भाग)

बालवीर : भाग - ४ (अंतिम भाग)

3 mins
581


     थॅनोसचा अंत झाल्यानंतर तो दृष्ट वैज्ञानिक खुप खवळलेला होता. तो दिवसेंदिवस ताकतवर होत चालला होता. परंतु बालवीर व पऱ्यांना त्या दुष्ट वैज्ञानिकाचा काहीच पत्ता लागत नव्हता. बालवीरसुद्धा ज्ञान साधनेने त्याच्या शकत्यांना वाढवत होता व चिट्टीदेखील स्वतःला अपडेट करत होता. 


     एक दिवशी तो वैज्ञानिक अंतराळात आला व पऱ्यांना ललकारू लागला. जेव्हा तो थॅनोसला जिवंत करायला ब्रम्हकवचाच्या बाहेर आला होता तेव्हापासून तो पृथ्वीच्या बाहेरच राहून गेला होता. पऱ्या व बालवीर वैज्ञानिकाचा आवाज ऐकताच लगेचच तेथे पोहचले व पोहचताच तेथे त्यांनी त्या दुष्ट वैज्ञानिकावर व त्या दुष्ट वैज्ञानिकाने बालवीर व पऱ्यांवर हल्ला करायला सुवात केली. आता अंतराळात जणू एक महायुद्धच चालले होते. कधी बालवीर व पऱ्या त्या दुष्ट वैज्ञानिकाला मात देत होत तर कधी तो दुष्ट वैज्ञानिक त्याच्या आधुनिक यंत्र व जादूच्या शकत्यांनी बालवीर व पऱ्यांना मात देत होता. त्या दुष्ट वैज्ञानिकाच्या आधुनिक यंत्रांना समजून घेण्यासाठी व त्या यंत्रांवर मात करण्यासाठी बालवीरने चिट्टीला तेथे बोलावून घेतले.  


     चिट्टी त्या वैज्ञानिकाच्या तंत्रज्ञानाचा अभ्यास करून बालवीर व पऱ्यांना त्या वैज्ञानिकावर कसा हल्ला करावा हे सांगत होता. चिट्टीने सांगितल्याप्रमाणे बालवीर व पऱ्या त्या वैज्ञानिकावर हल्ला करत होते, तसतसे त्याचे यंत्र निकामी होत होते. तो कमजोर पडणार तेव्हढ्यातच तो त्याचे नवीन व आधीपेक्षा अधिक घातक असे यंत्र आणत असे, त्या यंत्राचा अभ्यास करायला चिट्टीला अधिक वेळ लागायचा. तेव्हढ्यात तो वैज्ञानिक बालवीर व पऱ्यांवर भारी पडायचा. त्या दुष्ट वैज्ञानिकाच्या घातक प्रहारामुळे बालवीर बेशुद्ध पडतो. बालपरी व बाकी पऱ्या बालवीरला एका सुरक्षित ठिकाणी घेऊन जातात. 


     इकडे त्या दुष्ट वैज्ञानिकाशी चिट्टी आपल्या सेनेसोबत लढत होता. चिट्टी लढत असतांना तो वैज्ञानिक चिट्टीच्या सी.पी.यु. वर घातक हल्ला करतो. त्याच्यामुळे चिट्टी बंद पडतो. चिट्टी बंद पडल्यामुळे त्याच्या सेनेवर कोणाचेही नियंत्रण राहत नाही. परंतु चिट्टीने त्याच्या सेनेमध्ये असा प्रोग्रॅम केलेला असतो की, काही वेळ त्यांना चिट्टीकडून काहीही सूचना मिळाली नाही तर चिट्टीला घेऊन तेथून विरलोकला लगेच निघून जायचे. बालवीर काही काळानंतर बरा होतो. चिट्टीलासुद्धा आविष्कार परी पुन्हा ऍक्टिव्हेट करते. चिट्टी व बालवीर पुन्हा विरलोकमधून त्या वैज्ञानिकाशी लढायला निघणारच असतात, तेवढ्यात आविष्कार परी त्यांना विचारते की कोणाशी लढायला चाललेत? बालवीर सांगतो की " आविष्कार परी तुम्ही हे काय विचारत आहात, तुम्हाला तर सगळं माहीत आहे ना." आविष्कार परी हसते आणि त्यांना सांगते की "तो वैज्ञानिक तेथे राहिलाच नाही तर..." बालवीर विचारतो, " हे कसं शक्य आहे?" आविष्कार परी त्यांना सांगते की " मी एक यंत्र तयार केले आहे, ज्याने आपल्याला मागील काळात जाता येते व तेथील घटना पाहण्या बरोबरच बदलवता देखील येते." मग आविष्कार परी बालवीर व चिट्टीला ते यंत्र दाखवते त्या यंत्राचा वापर कसा करावा हे देखील सांगते. 


     बालवीर व चिट्टी अंतराळात जाऊन त्या वैज्ञानिकाला खडकावून सांगतात की तुला माहीत देखील नाही की तुझा केव्हाच अंत झाला आहे. वैज्ञानिक बालवीर हे काय बोलला हे समजण्यास असमर्थ राहतो, तो त्याचे ब्रम्हकवच तोडण्याचे काम चालूच ठेवतो. बालवीर व चिट्टी त्या यंत्राच्या मदतीने त्या वेळेत जातात, जेव्हा ते कालचा अंत करून उत्सव साजरा करत असतात, पऱ्या चिट्टीला पाहून आश्चर्यचकित होतात, बालवीर पऱ्यांना सांगतो की सर्व हकीकत थोडक्यात सांगतो. तो पऱ्यांना सांगतो की हा वेळ उत्सव साजरा करण्याचा नाही आहे. बालवीर, चिट्टी व पऱ्या वीरलोकच्या कैदखान्याजवळ जातात, तो वैज्ञानिक पळून जाण्याच्याच तयारीत असतो. वैज्ञानिक कैदखान्याच्या प्रवेशद्वाराच्या बाहेर येताच क्षणाचाही विलंब न करता सर्वजण त्या वैज्ञानिकवर प्राणघातक हल्ला करून त्याचा अंत करतात. त्याचा अंत झाल्याने सर्वकाही पुन्हा एकदा सुरळीत चालू झाले...

      

अश्याप्रकारे पुन्हा एकदा वाईट शक्तींवर चांगल्या शक्तींचा विजय होतो...


Rate this content
Log in

Similar marathi story from Action