सुमित बारी

Action Fantasy Children

5.0  

सुमित बारी

Action Fantasy Children

बालवीर भाग - ३

बालवीर भाग - ३

2 mins
217


     बालवीर व चिट्टी चुंबकीय आकाशगंगेत जातात व तेथे शौर्य ने दिलेल्या खोजू यंत्राच्या मदतीने ऍव्हेंजर्सला शोधू लागतात. लवकरच त्या यंत्राच्या मदतीने ऍव्हेंजर्स त्यांना सापडतात. बालवीर व चिट्टी यांनी त्यांना घडलेली सर्व हकीकत सांगितली. यावर ऍव्हेंजर्स म्हणाले की आम्ही तेथे येऊ शकत नाही कारण आम्ही येथील संकटाला तोंड देत आहोत, बालवीर व चिट्टी त्यांना विचारतात की कोणते संकट तर ते सांगतात की जसे एक आकाशगंगेत संकट येते त्याच प्रकारे प्रत्येक आकाशगंगेत छोटे असो व मोठे संकट येत असते. प्रत्येक आकाशगंगा ही अन्य आकाशगंगेशी जुळलेली असते. पण मात्र आम्ही तुम्हाला थॅनोसच्या शक्त्यांचें गुपित सांगू शकतो. हे वाक्य ऐकताच बालवीर व चिट्टी यांची चिंता थोडी कमी झाली. बालवीर म्हणाला की ते गुपित आम्हाला लवकर सांगा जेणेकरून आम्ही थॅनोसचा अंत लवकर करू शकू. ऍव्हेंजर्स सांगतात की थॅनोसच्या शक्त्या हातावर असलेले पाच इंफिनिटी स्टोन मध्ये आहे. त्याच्यावर वार करण्याआधी ते इंफिनिटी स्टोन त्याच्या हातातून वेगळे करणे आवश्यक आहे त्याशिवाय त्याचा अंत करणे शक्य नाही. ऍव्हेंजर्सचा धन्यवाद मानून बालवीर व चिट्टी आकाशयंत्राच्या मदतीने आपल्या आकाशगंगेत परतले.


         बालवीर व चिट्टी ऍव्हेंजर्सने जे सांगितले ते शौर्य व बालपरीला सांगतात. शौर्य व बालपरी यावर चर्चा करून एक योजना तयार करतात व त्या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी बालवीरला बोलवून घेतात. आता त्यांची योजना त्यांच्या सर्व सेने पर्यंत पोहचली असते. त्यांची योजना अशी होती की ते थॅनोसचे लक्ष दुसरीकडे वेधून पंचमहाभूतांनी म्हणजेच हवा,पाणी आग,धरती व आकाश यांच्या मदतीने त्याचे इंफीनिटी स्टोन काढून त्याला पराजित करायचे. ठरल्याप्रमाणे सर्व सेना तयार होती. चिट्टीने देखील आपली सेना वाढवून घेतली. आता ते थॅनोस ला पराजित करण्यासाठी पुर्णतः तयार होते. त्यांनी योजनेप्रमाणे थॅनोसचे लक्ष दुसरीकडे वेधले पण थॅनोस पण काही कमी नाही होता, तो सर्वीकडे लक्ष ठेऊन युद्ध लढत होता. बालपरी व चिट्टी यांनी एका बाजूकडून पूर्ण सेना घेऊन हल्ला केला व त्यामुळे थॅनोसचे लक्ष पूर्णपणे त्यांच्याकडे लागले.


          बालवीर व शौर्य यांनी पंचमहाभूतांमधून हवेचा वापर करून थॅनोसचा पहिला इंफिनिटी स्टोन काढला, तसा थॅनोस कमजोर पडला, पण त्याला हे सहन झाले नाही. तो पुन्हा जोशाने व रागाने युद्ध लढायला लागला. आता थॅनोस आधीपेक्षा जास्त भयंकरपणे लढत होता. तो सगळीकडे लक्ष देऊन खूप रागाने लढत होता पण बालवीर व शौर्य यांनी अदृश्य होऊन त्याचा दुसरा इंफिनिटी स्टोन अग्नी या पवित्र शक्तीचा वापर करून काढला. जवळ जवळ त्यांना एक महिना लागला होता दुसरा स्टोन काढायला. थॅनोसचे हातातून जसे जसे इंफिनिटी स्टोन कमी होऊ लागले तसा तो कमजोर होत होता पण जोशाने लढत होता. अश्याप्रकारे थॅनोसचे पाचही इंफिनिटी स्टोन बालवीर व शौर्य यांनी पांचमहाभूतांच्या मदतीने काढून त्याला शक्तीहीन करतात व पुन्हा एकदा त्याचा अंत करतात. थॅनोसचा अंत झाला आहे हे त्या वैज्ञानिकाला समजताच तो तेथे येतो व बालवीर व पऱ्यांना धमकी देतो की मी तुम्हाला सोडणार नाही व तेथून रागानेच पऱ्या व बालवीर यांनी त्यास पकडण्याच्या आतच तो तेथून पळून जातो...


Rate this content
Log in

Similar marathi story from Action