बाई हा विनोदाचा विषय नाही
बाई हा विनोदाचा विषय नाही
आजकाल सोशल मीडिया वर कसले ही पांणचट जोक्स फॉरवर्ड होत असतात. या विनोदा मध्ये प्रामुख्याने बायका ,त्यांचे वागणे,दिसने कपड़े याचा अंतर्भाव जास्त असतो.बायको', 'प्रेयसी' किंवा 'स्त्री' या विषयावर अगणित विनोद रोजच्या रोज या सोशल मीडिया ग्रुप्सवर फिरत असतात. महिलांच्या वजनावर, त्यांच्या स्वभावावर, त्यांच्या दिसण्यावर, बोलण्यावर, पोषाखावर इतकेच काय, तर त्यांच्या असण्यावरही विविध प्रकारचे विनोद केले जातात, ते वाचले जातात आणि वाचून हसू थांबण्याच्या आतच ते पुढे किमान चार ग्रुप्सवर फॉरवर्ड केले जातात. मुळात बाई ही काही वस्तु नाही की जिच्यावर कोणी ही काही कमेंट्स पास करावेत किंवा जोक्स करावेत. पुरुष मंडळीच्या व्हाट्सएप ग्रुप वर तर स्त्री विषयक जोक्स चा भरणा जास्तच दिसून येईल. पुरुषांचे काय ते मस्त स्व: ताची करमणुक करून घेतात आणि आपण काय वाचत आहोत याची शहानिशा न करता तो जोक सेकन्दात पुढे फॉरवर्ड केला जातो.
एका अशाच विनोदा वर मी कमेंट केली की हे महिला वर जोक्स करने बरोबर नाही तेव्हा ते महाशय म्हणाले,मैडम विनोद हा विनोदा सारखा घ्यायचा आणि सोडून द्यायचा. अरे पण तुम्ही महिलांबद्दल नको ते नॉनवेज जोक्स करत असाल तर कसे काय ती गोष्ट सोडून द्यायची?. एक महाशय तर म्हणाले की काही महिलाच असे महिलां वर जोक्स करतात , कमेंट्स करतात मग तिथे ही तुम्ही पुरुषांना कसे काय जबाबददार धरता?
आपल्या कड़े ख़र तर एक महिला दुसऱ्या महिलेला मदत करायला किंवा कोणत्याही गोष्टीत साथ द्यायला पटकन तयार होत नाही ही शोकांतीकाच म्हणावी लागले. याला अपवाद ही आहेत. सोशल मीडिया वर फिरणारे जोक्स हे महिलांना अपमानजनक असे असतात. या मुळे आपण महिलांच्या भावना नकळत पणे दुखावतो हे कोणाच्या लक्षात ही येत नाही. विनोद वाचून त्यावर हसून तो पुढे ढकलण्याआधी एक क्षण विचार केला, तर विनोदी मजकुरातून अस्वस्थ करणारी भावना मनाला स्पर्श करून गेलेली असते हे लक्षात येईल. एखाद्या स्त्रीला आपण कमी लेखतोय ही भावना फॉरवर्डच्या नादात हरवून जाते.अति हुशार मंडळी म्हणतात की विनोदा तील अपमानजनक भाग सोडून फ़क्त विनोदा कड़े बघा उगाच त्याचा "इश्यू" का करता? परंतु संपूर्ण विनोदाचा गाभा ही 'बाई' असते आणि या विनोदांनी तिला कमी लेखले जाते हे आपल्या लक्षातही येत नाही.मग या बद्दल एकटया दुकटया बाई ने विरोध करने म्हणजे मूर्खपणा! तेच जर महिलाच्यां ग्रुप मध्ये एखाद्या पुरुषा वर विनोद केला तर तो उगाच नव ऱ्याला समजेल म्हणुन पटकन डिलीट केला जातो. लोक तिलाच नावे ठेवतील म्हणुन "नवरा" आणि "पुरुष" हे विनोदा च्या कैटेगीरीत येतच नसावेत. स्त्रियां वर विनोद करावेत पण त्याला ही काही मर्यादा असावी.
महिलांना आदर, समान वागणूक आणि मान देण्याची भाषा आपण करतो, तेव्हा इतक्या लहान गोष्टीतून म्हणजे एका फॉरवर्ड विनोदातून आपल्याच विचारांना आपण सहज छेदून टाकतो. स्त्री सबलीकरण, समान वागणूक या स्त्री सुलभ गोष्टी घडवून आणण्यासाठी फार मोठे पाऊल उचलण्याआधी अशा छोट्या सुधारणा आपण आपल्या परीने करायला हव्यात. मराठी चित्रपट सृष्टी तील प्रसिद्ध खलनायक निळू फुले ह्यांनी “बाई वाड्यावर या”असे म्हणत प्रचंड टाळ्या आणि प्रसिद्धी मिळवली. चित्रपट तुफान चालले .परंतु महिलांचा सन्मान,इज्जत,प्रतिष्ठा खालावते आहे याचा कोणी विचारच केला नाही.आधुनिक काळात याला वेगळे वळण मिळत गेले.माझ्या नवऱ्याची बायको,चला हवा येऊ द्या सारख्या मालिकांमधून स्त्रियांच्या बाबतीत केले जाणारे विनोद आणि कथानक तितकेच भयंकर आणि विचारात पडणारे आहेत.त्यावेळी असलेली स्त्रियांची मजबुरी आणि आताची परिस्थिती यात जमीन अस्मान चा फरक आहे परंतु तरीही आजही या सारख्या मालिकांमधून बाई वाड्यावर या म्हणत विनोद करून टाळ्या तर मिळविल्या जातात. स्त्रीचा, स्त्रीत्वाचा अपमान करत आहोत याचं भान त्यांना राहत नाही.मोठं मोठे सन्मान सोहळे,अवॉर्ड समारंभ यातूनही बाई पणाचं हे ओंगळ वाणं दर्शन होतच राहत.जणू तू फक्त उपभोग घेण्यासाठी च आहे याचं प्रत्येक मिनिटाला जाणीव करून देणार हे वातावरण आहे. बाई कशी ही असो जाड़ ,बारीक, गोरी ,काळी तरी तिच्यावर हमखास जोक्स केले जातात. मग त्या विनोदा वर अनेक कमेंटस पास करायचे. आणि मानमुराद हसुन घ्यायचे याचा अर्थ काय? बाई ही फ़क्त विनोद आणि उपभोग्य वस्तु या पलीकडे तीची काही ही किंमत नाही का? मला असे नाही म्हणयाचे की सरार्स सर्वच पुरुष बाई वर विनोद करतात याला काही पुरुष अपवाद ही आहेत.
काही ठिकाणी तर स्त्रियांच स्त्रियांच्या विनोदा वर हसत राहतात किंवा एखादी च्या स्वभाव किंवा दिसन्या वरुन विनोद करतात . त्यांना हे कसे नाही समजत की आपणच आपल्या साठी विनोदाचा विषय बनवत आहोत. त्या विनोदाचा अर्थ किंवा आशय न बघता बिंदिक्कत पणे आपण तो पुढे फॉरवर्ड करत जातो. महिलांच्यां इतर वागने जसे की फैशने बल कपड़े,किंवा हातात बांगडया न घालने,लग्न समारंभात नृत्य करणे या वरुन ही विनोद केला जातो. अरे तीच आयुष्य तिला हवे तसे जगण्याचा अधिकार आहे मग तुम्ही लोक कोण तिच्या वर जोक्स करणारे? स्त्रियांचा सन्मान करता येत नसेल ना तर तिचा अपमान करण्याचा ही हक्क तुम्हाला कोणी दिलेला नाही आहे. तिच्या वागन्या बोलण्या वरुन ती एक व्यक्ति म्हणुन कशी आहे याचे मोजमाप तुम्ही का करता? बाई म्हणजे विनोद हे जणु एक समीकरणच झाले आहे. मग ते विनोद जास्त करून अश्लीलते कड़े झुकनारेच असतात. बायको नव ऱ्याला नावाने हाक मारते किंवा तो बायको च्या ताटा खालच मांजर झाला आहे अशा विषया वर विनोद हमखास केला जातो. हा ख़र तर सार्वजनिक अपमान असतो आणि त्याबद्दल बोलताही येत नाही. 'अगं, तुझ्याबद्दल नाही, सहज फॉरवर्ड केला' या उत्तराने गोष्ट संपून जाते. एखाद्याची बाजू माहित नसताना उगा त्या गोष्टी वरुन त्याला विनोदाच रूप देण कितपत योग्य आहे? पूर्वी अभंग किंवा कीर्तन असो त्यात स्त्रियां बद्दल अपशब्द कधीच येत नसे. पण आज स्त्री च्या छोटया छोटया गोष्टी सुद्धा विनोदाचा भाग बनत आहेत. वाचक सुजान आहेत त्यांना जास्त खोलात न सांगता ही समजेल जे मला बोलायचे आहे. आजचे कीर्तन असो वा प्रवचन अन्य बाई वर विनोद करून प्रेक्षकां कडून भरपूर टाळया मिळवने बस्स इतकेच! आणि ते विनोद ऐकनारे.. त्या बद्दल न बोलेलेच बरे!
व्हाट्सएप,इंस्टाग्राम,फेसबुक ही सोशल साइट्स आपल्या उपयोगा साठी आणि मनोरंजना साठी आहेत. त्यांचा उपयोग चांगल्या गोष्टी साठी करने हे जास्त महत्वाचे आहे. उगाच नको त्या मैसेजेस आणि जोक्स फॉरवर्ड करण्या साठी नाही. नवरा असो, की बायको किंवा पुरुष आणि स्त्री असो, चारचौघांत विनोद म्हणून का होईना या नात्याचा अपमान करणे योग्य वाटत नाही. नाते कोणतेही असले, तरी त्यात आदर हवा. नाते फुलवण्यासाठी एकमेकांच्या चेहऱ्यावर हास्यलकेर उमटवण्याचे प्रयत्न व्हायला हवेत; परंतु त्याचे माध्यम हे अपमानाची चंदेरी झालर असलेले विनोद असता कामा नयेत.
मनातले 'फॉरवर्ड' विचार 'फॉरवर्डेड मेसेज'च्या नादात विसरायला नकोत इतकेच.बाई म्हणजे विनोद हे समीकरण बदलन्याची गरज आहे. हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा एक स्त्रीच अशा स्त्री विनोदा वर आक्षेप घेईल. त्या विरुद्ध आवाज उठवेल .बाकी माझ्या लेखिका मैत्रीणि सुजाण आणि हुशार आहेत. आपल्या लेखणीच्या धारदार शस्त्राने अशा विनोदांचा धूरळा करतील.
