Author Sangieta Devkar

Abstract Romance Tragedy

3  

Author Sangieta Devkar

Abstract Romance Tragedy

अश्रूंची झाली फुले (भाग 1)

अश्रूंची झाली फुले (भाग 1)

2 mins
195


अरे बाबा काय करू मग,आवाज तुला ऐकू येत नाही आणि मी मोठ्याने बोलू शकत नाही.चारू हळू आवाजात आपल्या बॉयफ्रेंड समीर शी बोलत होती.

चारू तू बाल्कनीतून बोलतेस का?

हो समीर काय करणार मग,ताई आहे ना रूम मध्ये,तिच्या समोर कसे बोलणार?

हमम,चारू यार अस हे चोरून बोलायचे,भेटायचे किती दिवस? सांग ना आता तुझ्या घरी.

समीर,मी प्रयत्न करते आहे ,जेव्हा योग्य वेळ असेल तेव्हा बोलते ना घरी.

चारू हेच ऐकतो आहे गेली वर्ष भर. कधी कधी वाटते यू डोन्ट लव मि?

समीर ठेव आता फोन आणि बस कभी कभी करत.

चारू ..हे असे असते तुझे मनसोक्त बोलत तरी जा ना.

समीर ताई ला आपल बोलण ऐकू जाईल बास आता.उद्या बोलू.

ठीक आहे गुड नाईट.समीर ने कॉल बंद केला.

चारू रूम मध्ये आली.चारू समीर चा कॉल होता? अवंती ने विचारले.

हो ताई,तो ते आमच्या लग्ना बद्दल बोलत होता.घरी आपल्या बद्दल कधी सांगतेस अस विचारत होता.

चारू मग सांगून टाक ना बाबा ना.माझी काळजी नको करू तू.तुझं आयुष्य समोर पडले आहे तुझ्या,त्याचा विचार कर.माझं असच असणार आहे यात बदल नाही होणार.


ताई,मी समजू शकते तुझ्या भावना.पण तुलाच यात काही बदल नको आहे मग कोण कस तुला या परिस्थती मधून बाहेर काढणार सांग.

चारू म्हंटले ना मी,माझा विचार नको करू.तू तुझा निर्णय घरात सांगून टाक.

ताई इतकं सोपं आहे का ग? आई ची भूनभून तुला दिसत नाही का सतत आपल अवंती च अगोदर लग्न होऊ दे त्या शिवाय चारू च कसे करणार.

ठीक आहे चारू मी आई शी बोलते.माझ्या साठी तुला लग्ना साठी थांबायला नको.

बघ ताई ठरव तूच.पण मी म्हणते किती दिवस तू त्या भूतकाळा सोबत जगत राहणार आहेस? अग सहा वर्ष झाली अजून किती वाट पाहणार आहेस तू निषाद ची?

चारू माझी इच्छा नाही आहे लग्न करायची आणि भूतकाळ माझा आहे मी बघते.तू ही प्रेम करतेस ना समीर वर मग त्याला विसरू शकशील का? आणि दुसऱ्या मुला सोबत लग्न करशील का तू? नाही ना?

ताई आय एम सॉरी पण तुझ्या बद्दल वाईट आम्हा सगळ्यांना वाटते ग.

चारू मी आई बाबांशी बोलते उद्या ओके झोप आता.

अवंती ने ही डोळे बंद केले पण नजरें समोर निषाद च दिसु लागला.तीच पहिलं प्रेम.तीच जग.


क्रमशः..#पहिले प्रेम 


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract