अशी पाखरे येती
अशी पाखरे येती
जीवन एक अतिशय सुंदर शब्द जो ज्याला जसे जमेल तेवढया कोमलतेने या शब्दाला हाताळेल तेवढ्याच अलवारतेने ते खुलेल फुलेल अन् बहरेल...
जीवनात आपण एका रेशमी बंधने बांधलेले, जोडलेले असतो तेच रेशीम बंध असतात जिव्हाळा आपुलकी आणि प्रेमाचे.... या सर्व नात्यात सर्वात महत्त्वाच आणि मूलभूत नात ठरतं ते आई वडीलांच आपल्या पाल्याशी...
आभाळभर माया आणि निःस्वार्थ प्रेम हे इथूनच तर मिळत.....अशी पाखरे येती...ही ओळ वाचतांना... मला वाटतं की मुलं हे आई-वडिलांसाठी पाखरांप्रमाणे असतात... मुलगा असो किंवा मुलगी दोन्ही आईवडिलांची लेकरे घरट्यात खेळती छान जशी चिवचिवणारी पाखरे
माझे बाबा म्हणत होते वडील होण्या इतपत जगात कोणतच प्रचंड आनंद नाही नि कन्या झाली तर कोणतच सुख त्याहून बेधुंद नाही...असावं लागतं पुण्यवान अन् त्याही पेक्षा खूप भाग्यवान ज्या पित्याच्या हातून घडत, सर्वात श्रेष्ठ कार्य कन्यादान ... खरंच आहे.. नाही का.... आभाळाएवढं सुख काय ते मुलगी घरात असली की कळतं एक वेगळेपण किती आपल्या पण तिच प्रत्यक्ष हास्य उधळत
मूठ आवळून बोट धरते तो प्रत्येक
क्षण आई-वडिलांचा खास होतो
तिच्या इवल्याश्या मुठीत जग
जिंकल्याचा त्यांना भास होतो
इवल्या इवल्या पायात पैजण घालून छुमछुम करत
सर्व घरात ती धावते
सुंदर फ्रॉक घातला की जणू परी समान भासते
लाडीक होऊन वर लटकेच रूसते
लगेच राग सोडून बाबाला मिठी मारते
साऱ्या घरात जणू आनंद घेऊन येते घराची शोभाही वाढवते
इवल्या पावलांनी सरतात त्या वाटा
पाटीवरचे धडे गिरवताना आयुष्याचा अर्थ शिकून
पावले घेऊन चालते मग ती पुढे वाटा
थोडी कच्ची थोडी पक्की पोळी बनवते
आई चिडल्यावर बाबांच्या मागे हळूच जाऊन लपते
लाडा कौतुकात वाढते
कुटुंबातील सर्वांच्या सुखासाठी अविरतपणे झटते
शिक्षण पूर्ण झाल्यावर स्थळ आलं कुणा आप्तजणांकडून तर घोर लागतो आई-वडिलांच्या मनाला परक्याचं धन द्यावं लागे ज्याच त्याला
मुलगी सासरी जाण्याचा क्षण त्यांच्यासाठी अग्निपरीक्षा स्वतःच्या काळजापासून दुरांवण जगातली सर्वात मोठी शिक्षा... शिकावं लागतं आता तिच्या शिवाय जगणं शेवटीच असते ती दुसऱ्याच्या घरचं लेण....
बालपणापासूनची आठवण, घराच्या कानाकोपऱ्यात राहते. अंगण ती जात असताना रिकामं होते तिची आठवण तिचा होणारा दुरावा. आनंदाचा जरी हा सोहळा असला तरी मनाला कुठेतरी छळतो मुलगी सासरी जाताना आई वडिलांच मन कुठेतरी झुरत.....अशी ही लेक लाडकी बघता बघता दूरवर पाखराप्रमाणे झेपावते....
आणखी सांगायचे झाले तर.... चार दिवसांनी पंख फुटले तर (मुलेही)शिक्षण नोकरी साठी घराबाहेर झेपावतात... पंखात बळ देणारया त्या शक्ती पिठाला काही जण विसरतात ही..... दूर गेलेल्या आपल्या पाखरांना साद घालीत सांजवेळी स्मृतीची सहज पाने आई-वडील वेचतात
हरवलेली पाखरे येतील का पुन्हा भेटायला
गेलेले दिवस येतील का पुन्हा सजवायला
ऐकूण हाक परत या लवकर
मिटूनी या पंखात संपवा हे अंतर
अंतरीची ओढ जिवाला लागे
बघता-बघता अशी उडून जाई ही पाखरे..
म्हणूनच एकदा तरी वेळ काढून मागे बघा. जुन्या आठवणी ताज्या करा डोळे भरून येईल मन प्रफुल्लित होईल आणि आत्ताचा हा क्षण जगण्याची नवी उमेद देईल मग कधीही काही मागे राहणार नाही हरायचं तर आहेच एक दिवस मृत्यू कडून तोपर्यंत आयुष्याला जिंकून घ्या. आठवण भावनेचा खेळ मनावर उठलेल्या स्पंदनाचा मेळ गेलेल्या क्षणांची मागे पडलेली सावली मनसोक्त जगा..पण आपुलकीच, प्रेमाचं नातं अलगदपणे जपा. कारण दिवस जातात निघून उरतात फक्त आठवणी....🙏🙏😊
