Author Sangieta Devkar

Abstract Inspirational

2.6  

Author Sangieta Devkar

Abstract Inspirational

असा राजा पुन्हा होणे नाही

असा राजा पुन्हा होणे नाही

2 mins
428


केवळ महाराष्ट्र किंवा भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगभरात शिवाजी महाराजांचे नाव आदराने घेतले जाते. ज्यांच्या साहस कथा, विचार, तत्त्वज्ञान आजही सर्वांना प्रेरणा देतात, 


शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करताना सुमारे ४०० गड आपल्या अधिपत्याखाली आणले होते. काही गड त्यांनी स्वतः बांधले, तर काही किल्ले लढाया करून जिंकले. महाराजांचा एक एक गड-किल्ला म्हणजे स्थापत्यशास्त्र, व्यवस्थापन आणि गनिमी काव्याचे प्रतिकच आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज एक हुशार आणि प्रचंड बुद्धिमत्ता असणारे लढवय्यें होते.त्या काळी हिंदू स्त्रिया वर मुघलांशी अन्वित अत्याचार केले.हिंदू स्त्री दिसली की तिला अक्षरशः मुघल सैनिक पळवून नेत असत.मुघलांच्या साम्राज्यात स्त्रिया सुरक्षित नव्हत्या ही बाब जेव्हा शिवाजी राजेंना समजली तसे त्यांचे रक्त खवळले.मुघल साम्राज्याचा खातमा राजेंनी केला.प्रत्येक स्त्रीला संरक्षन दिले. राजेंच्या काळात स्त्रिया सुरक्षित आणि सुखी होत्या राजेंनी बऱ्याच लोकांना रोजगार ही उपलब्ध करून दिला होता.


महाराष्ट्राच्या किनार पट्टीवर १६७१ मध्ये मीठ शेती केली जायची. परंतु इंग्रज, डच, पोर्तुगीज यांनी तेथील शेती मोडीत काढण्यासाठी गोवा प्रांतातून मीठ आणून त्याची स्वस्तात विक्री सुरू केली. हे लक्षात आल्यावर महाराजांनी आयात मिठावर कर लावला. त्यामुळे आयात मीठ महाग झाले व आपल्या शेतकऱ्यांच्या मिठाची मागणी वाढली. म्हणूनच छत्रपतींना 'जाणता राजा' म्हणतात.


छत्रपती शिवाजी महाराज अतिशय चारित्र्यसंपन्न होते. जगाच्या इतिहासात हा एकमेव राजा आहे, ज्याच्या दरबारी कधी स्त्री किंवा नर्तकी नाचली नाही. महाराजांनी स्वतःसाठी मोठे महाल बांधले नाहीत. सत्तेचा वापर स्वतःच्या किंवा कुटुंबाच्या फायद्यासाठी केला नाही. शिवाजी महाराज नेहमी 'रयतेच स्वराज्य' असाच शब्द वापरत.


आज ची समाजाची स्थिती पाहता इथे बालिका आणि महिला सुद्धा सुरक्षित नाही आहेत.आज ही स्त्री वर अत्याचार होत आहेत.हुंडा बळी,स्त्री भ्रूण हत्या, बलात्कार, खून,अशा अत्याचाराच्या बळी स्त्रिया मुली पडत आहेत.नुसते शिव जयंती साजरी करून किंवा राजें सारखी दाढी ठेवून,कानात भीकबाळी घालून कोणी छत्रपती शिवाजी महाराज होऊ शकत नाही,त्या साठी तसे गुण अंगी असावे लागतात.

छत्रपती शिवाजी महाराज एकच होते आणि असा राजा पुन्हा जन्माला येणे नाही .


"प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंतस... सिहांसनाधीश्वर... योगीराज... श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय!"


(समाप्त)


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract