" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Abstract Action Inspirational

3.7  

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Abstract Action Inspirational

अर्धे राज्य मिळवले

अर्धे राज्य मिळवले

3 mins
270


एक फार मोठा राजा होता.त्याचा प्रधान तर फारच गुणवान, इमानी व ज्ञानी होता.राणीला वाटायचं की राजाने प्रधान म्हणून आपल्या भावाची नेमणूक करावी.त्यासाठी राणीने खूप प्रयत्न केले पण राजाचा ह्या प्रधानावर खूप विश्वास त्यामुळे ह्या प्रधाना ऐवजी राणीच्या भावाची प्रधान म्हणून नेमणूक करणे खूप कठीण होते.राणीला प्रधानाचा खूप राग आला. हा प्रधान नसता तर मी माझ्या भावाला प्रधान केलं असतं.काही करून ह्या प्रधानाला काढून टाकून आपल्या भावाला प्रधान करायचं म्हणजे करायचं असं राणीनं ठरवलं नी प्रधानाला काढून टाकण्यासाठी ती रोज नवी युक्ती लढवू लागली.राजाला प्रधानाच्या विरोधात विनाकारण तक्रारी करु लागली तरीही काही इलाज चालेना.

   शेवटी राणीने युक्ती लढवली.राणी प्रधानाला म्हणाली राजकन्येला फार दिवसांपासून तलावात पोहण्याची इच्छा आहे.आज राजकन्येला घेऊन तलावावर जा.राणीचा आदेश. प्रधान राजकन्येला घेऊन तलावावर गेले.राजकन्या तलावात गेली नी दूर वर गेल्यावर बुडू लागली. वाचवा वाचवा म्हणून मोठ्या मोठ्याने ओरडू लागली. प्रधानाने ते पाहिले आणि तलावात उडी घेतली. त्याने राजकन्येला पकडले नी तलावाबाहेर आणू लागले.तेवढ्यात राणी राजाला घेऊन तेथे आली.प्रधान राजकन्येला जमिनीवर झोपवून तीच्या पोटातील पाणी बाहेर काढण्यासाठी शरीर दोन्ही हाताने दाबत होते.राणीला हेच हवं होतं. राणीनं राजाला ते दाखवले नी म्हणाली,पहा तुमचा प्रधान राजकन्येला काय करतोय. मला राजकन्येनं कितीतरी वेळेस सांगितले आहे की प्रधान राजकन्येची छेड काढतोय मी तुम्हाला ते सांगितले तरी तुमचा माझ्यावर विश्वास बसला नाही.आता काय घडतंय ते तुम्हीच सारं पाहा.प्रधानाचं ते कृत्य पाहून राजाला राग आला. राजकन्येशी प्रधानाचे ते वागणं राजाला सहन झाले नाही.राणीला तेच हवं होतं.राणीने आगीत तेल ओतले. राजाने प्रधानाच्या गालावर लगावली नी प्रधानाला काढून टाकले.रिकाम्या हाताने राज्याबाहेर हाकलून दिले. प्रधानाला काही कळेना पण राणीने बरोबर डाव साधला. प्रधान म्हणून राणीच्या भावाची नेमणूक झाली नी राणीला आनंद झाला.

   राणीने डाव बरोबर साधला पण कोणतीच चूक नसताना केवळ राणीचं ऐकून राजाने प्रधानाला काढून टाकले. प्रधानाला मात्र धक्काच बसला.आपण एवढं आयुष्यभर सेवा केली त्यांचं हे बक्षीस.शेवटी राजाला त्यांची चूक दाखवून देवू असा त्याने निश्चय केला आणि ते निघून गेले.

   राणीच्या भावाची प्रधान म्हणून नेमणूक झाल्यामुळे राणी व तिचा भाऊ दोघेही खूप खुश होते. काही दिवसांनी प्रधानाला म्हणजे राणीच्या भावाला मुलगा झाला पण दुःख एक होतं की त्याला बोलता येत नव्हते.प्रधानाच्या मुलाला बोलता येत नसल्यामुळे सर्व परेशान होते. काय करावे काही कळेना.खूप इलाज केला काही फायदा होईना, राजाने ठरवले काहीही करून मुलांला बोलायला शिकवायचे.डॉक्टरने सांगितले त्याला हसवायला हवे,तो जर हसला नक्की बोलेल.

   हसवण्यासाठी सर्व प्रयत्न सुरू झाले. काही केले तरी मुलगा काही हासत नाही.राणी राजाला म्हणते.काहीही करून मुलाला बोलता आले पाहिजे कारण मोठा झाल्यावर हाच पुढे आपल्या राज्याचा प्रधान असेल म्हणून वाटेल ते करा पण मुलाला बोलता आले पाहिजे.बोलता येण्यासाठी तो हसला पाहिजे म्हणून त्याला पहिल्यांदा हसवावं लागेल.शेवटी राजाने निश्चय केला की काही ही करुन मुलाला हसवायचे आणि राजाने घोषणा केली की,जो कोणी ह्याला हसवील त्याला अर्धे राज्य दिले जाईल.

   सर्वत्र निरोप पोहोचला,दवंडी देण्यात आली.प्रधानाच्या मुलाला जो कोणी हसवेल त्याला अर्धे राज्य दिले जाईल. सर्व हास्यसम्राट, ज्ञानी,बहुरुपी,अर्धे राज्य मिळवण्यासाठी हसवण्याच्या उद्देशाने हजर झाले.प्रत्येकाला वाटू लागले की आपण यशस्वी होणार.आपणच प्रधानाच्या मुलाला हसवणार आणि अर्धे राज्य मिळवणार.सर्व जन संपले वाटेल ते प्रयत्न प्रत्येकाने केले.जे काही करता येईल ते केलं पण प्रधानाचा मुलगा काही हासला नाही.सर्व परेशान झाले.राजा, राणी, प्रधान सर्व परेशान झाले एवढे प्रयत्न करुन,एवढी मोठी घोषणा करून कोणी हसवू शकले नाही.शेवटी एकदम मागे बसलेली एक गरीब अशी व्यक्ती पुढे आला आणि म्हणाला परवानगी असेल तर मी या मुलाला नक्की हसवेन.मला तसा विश्वास आहे.सर्वाना नवल वाटले म्हणाले हा काय हसवणार? ह्याला कसे शक्य आहे?त्याचं कोणी ऐकेना शेवटी तो म्हणाला मुलगा जर नाही हसला तर मला वाटेल ती शिक्षा द्यावी आणि त्याला संधी मिळाली.

    तो आनंदी झाला.धावतच राजाजवळ गेला.राजाचं दर्शन घेतले.मुलाला जवळ घेतले राजाजवळ बसवले.नी राजाला उभे केले.मुलगा सर्व मन लावून पहात होता.त्याने मुलांची पप्पी घेतली.आपले दोन हात एकमेकांवर घसघस घासले आणि एकदम राजाच्या तोंडावर चापट मारली.ते पाहून तो मुलगा मोठ्याने हसू लागला,हसतच राहिला.सगळ्याना आनंद झाला.सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या.फार मोठं नवल झालं.बोलल्याप्रमाणे राजाला आपलं अर्धे राज्य त्याला द्यावे लागले.ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून राजाने ज्याला काढून टाकले तो प्रधान होता.अशा प्रकारे राजाला चापट मारुन प्रधानाने अर्धे राज्य मिळवले.



Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract