STORYMIRROR

Author Sangieta Devkar

Abstract Tragedy

3  

Author Sangieta Devkar

Abstract Tragedy

अनपेक्षित

अनपेक्षित

3 mins
174

स्नेहा ने डोळे उघडले,तिला ग्लानी सारखे वाटत होते.आपण कुठे आहोत काही ही समजत नव्हते.डोकं जड झाले होते.हळू हळू तिला जाग आली ,ती एका कॉट वर झोपलेली होती.आणि बाजूला लोकांच्या बोलण्याचा आवाज येत होता.तिने पाहिले,ती एका अंधाऱ्या दिसणाऱ्या खोलीत होती .तिथे आजूबाजूला जुने भंगार सामान पडलेले होते.ती उठून बसली.

तिथे बाजूला चार जण दारू पित बसले होते.त्यातला एक जण म्हणाला,अरे ती बघ आपली शिकार शुध्दीवर आली वाटत.

कोण ,तुम्ही आणि मला का इथे आणले आहे.स्नेहा घाबरून त्यांना विचारत होती.

ते चार ही मवाली गुंड होते,तिच्या जवळ आले," कशाला म्हणजे,मजा करायला आणली तुला इथे.एक जण म्हणाला.

सोडा मला,मी कोणाची तरी बायको आहे.मला तुम्ही अस बांधून नाही ठेवू शकत.

बायको...मग नवरा कुठे आहे तुझा..तो तर पळाला नामर्द सारखा.दुसरा एक जण हसत म्हणाला.

मला सोडा नाहीतर मी ओरडेन.स्नेहा घाबरत म्हणाली.

ओरड,इथे तुझा आवाज ऐकणारा कोणी नाही..ओरड.एक गुंड म्हणाला.मग एका ने स्नेहा चे हात बांधले,एकाने तिच्या तोंडात बोळा कोंबला.स्नेहा च्या अंगावरची साडी काढून फेकून दिली आणि एक एक करत ते चार नराधम तिच्या वर तुटून पडले.तिच्यावर अत्याचार केला.स्नेहा काहीच करू शकत नव्हती.मुक पणे अश्रू ढाळत राहिली ती.


तिला आठवले तीन दिवसां पूर्वी तिच्या लग्नाचा पहिला वाढदिवस होता .मुकेश आणि तिने बाहेर फिरायला जायचा प्लॅन केला होता. संध्याकाळी मुकेश ऑफिस वरून आला तेव्हा स्नेहा छान नटून तयार झाली होती.ते दोघे मग शॉपिंग ला गेले.रात्री डिनर करून जुहू बीच वर फिरायला गेले. एकमेकांचा हात हातात घेवून ये समुद्र किनारी बसले होते.आज त्यांची पहिली ॲनिवर्सरी होती.गप्पा मारत भविष्याची स्वप्ने रंगवत होती.अचानक एका बाईक वरून दोन गुंड तिथे आले आणि स्नेहाची छेड काढू लागले.मुकेश त्यांना प्रतिकार करत होता पण शेवटी ते मवाली होते.मुकेश चा प्रतिकार कमी पडत होता .थोड्या वेळात एक कार तिथे आली आणि स्नेहा ला त्यांनी जबरदस्ती कार मध्ये घालून पळून गेले.मुकेश हताश पने जाणाऱ्या कार कडे बघत राहिला.


मुकेश ची आठवण येताच स्नेहा जास्तच रडू लागली.त्या दिवशी रात्री त्या चार लोकांनी पुन्हा स्नेहा वर अत्याचार केले आणि तिला कार मधून घेवून जावून एका सूनसान रस्त्यावर सोडून दिले.

स्नेहा कशी बशी आपल्या घरा पर्यंत पोहचली.तिने दाराची बेल वाजवली.मुकेश आपल्याला बघून आनंदी होईल.कधी एकदा त्याला बघते अस स्नेहा ला झाले होते.दार उघडले समोर मुकेश उभा होता..त्याने स्नेहा कडे बघितले. अस्ताव्यस्त झालेली साडी,केस विसकटलेले अशा अवस्थेत स्नेहा उभी होती.

अहो,स्नेहा ने त्याला आवाज दिला.तसे मुकेश म्हणाला,हे बघ स्नेहा..मी तुला या अवस्थेत घरात नाही घेवू शकत.

काय बोलत आहात तुम्ही..अहो मी बायको आहे तुमची.

आत ये.बाहेर तमाशा नको मुकेश ने स्नेहाला आत घेतले.

हे बघ स्नेहा,तुला त्या गुंडांनी पळवून नेले चार दिवस तू त्याच्या ताब्यात होतीस .त्यांनी तुझ्यावर जबरदस्ती केलीच असणार..मला आता तुझ्या शी कसलाच संबंध नाही ठेवता येणार.

स्नेहा ला हा एक अनपेक्षित धक्का होता,अहो आपण एक वर्ष एकत्र घालवली त्या गुंडांनी मला नेले मग तुम्ही गप्प का बसलात ? का नाही पोलिसांची मदत घेतली..

स्नेहा मला माझी इज्जत अब्रु अशी वेशीवर नाही टांगायची म्हणून मी कंप्लेंट नाही केली. पण आता तुला मी माझी बायको मानत नाही.तेव्हा तू आता निघून जा .सोसायटीत कोणी तुला बघू नये असे मला वाटते.

अहो,तुम्ही असे कसे बोलत आहात,आपल लग्न झालंय.

आता ते मोडले अस समज.मुकेश ने तिला घरा बाहेर काढले.

आपल्याला कोणी बघू नये म्हणून स्नेहा पटकन तिथून बाहेर पडली.तिला स्वप्नात ही नव्हते वाटले की मुकेश असा वागेल तिच्याशी.. नवरा होता तो तिचा.त्यानेच तिला हाकलून दिले.यात तिची काय चुक होती? मग नवरा म्हणून त्याने तिला वाचवण्याचा प्रयत्न का नाही केला? स्नेहा रडत रडत विचार करत होती.आता अशा परिस्थितीत ती कुठे जाणार? एकटी आई होती तिला ती ही सहा महिन्या पूर्वी तिला सोडून गेली होती.निराश मनाने वाट मिळेल तिकडे स्नेहा निघाली होती.

मुकेश ने तिला अनपेक्षित असा मोठा धक्का तिला दिला होता.


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract