अनोळखी व्यक्ती
अनोळखी व्यक्ती


जनगणनेची होती ड्युटी. रात्रीच झाले रुजू बुथवर. रात्र होती काढायची कशी बशी खूप भीती वाटत होती.
माझ्या बरोबर दोघी होत्या पण माझ्या पेक्षा वयाने लहानच त्यांना माझाच आधार वाटत होता. केंद्र प्रमुखांनी सांगितले या परिसरात तुमचे कोणी नातेवाईक असतील तर रात्री तिथं रहा व सकाळी लवकर या. आम्ही सारे वेगवेगळ्या उपनगरातून आलेलो पण इथे कोणी नव्हते आमचे मी जरा शेजारी असलेल्या आरोग्य केंद्रात विचारले तिथे एक मॅडम होत्या त्या म्हणाल्या माझे इथे जवळ घर आहे तुम्ही तिघी येणार असाल तर चालेल मला मी करते तुमची सोय राहण्याची. बाई चांगल्या वाटल्या , तिघींना विचार करून तिथं राहायचे ठरवले. व रात्री आम्ही त्या नर्सबाईकडे आधाराला राहिलो.
बाई अनोळखी होत्या पण अगदीं आपलेपणाने त्यांनी आमची सोय केली.खूप आधार वाटला.
बाईंची फॅमिली आत होती मुलगा पती पण ते अजिबात समोर आले नाहीत आम्हाला अवघडल्या सारखे होऊ नये म्हणून.