शेवगा
शेवगा


माझं सासर च गाव जांभूळवाडी पुण्यालगतच आहे
बऱ्याचदा आम्ही वेगवेगळ्या कारणांनी गावी जात असू आणि शेतातून फेरफटका मारत असताना मिरची वांगी कोबी, कढीपत्ता मुळा अशा कितीतरी भाज्या गोळा करून आणत असू पण मला या भाज्या घेण्यात यावेळी काहीच इंटरेस्ट नव्हता कारण मला हवी होती शेवग्याची फुले ताजी ताजी पांढऱ्या तारका सारखी
आणि मी आमच्या गप्पा झाल्यानंतर माझ्या गावाकडच्या सासूबाईंना बोलले की इथे शेवग्याचे झाड आहे का कुठे
त्या मला म्हणाल्या आहे की चल तुला मी शेवगा देते तर मी त्यांना म्हणाले मला शेवगा नकोय मला शेवग्याची फुले हवीत
तर माझ्या चुलत सासुबाई म्हणाल्या अगं बाई कोण ग ते काढायचं ते तर खूप उंचावर असतं शेवग्याचा फुलोरा आता आलेला आहे वर्षातून दोनदा शेवग्याला फुलोरा येतो पण शेवग्याचा फुलांचा फुलोरा अगदी उंचावर असतो
आमच्या दोघींचं बोलणं माझ्य
ा चुलत सास ऱ्या नी ऐकलं आणि ते मला म्हणाले चल तो बघ तेथे उंच बांबू ठेवलेला आहे लांबलचक. तो घेतो मी आणि आपण सारेच जाऊ
मग काय आम्ही तिघे चौघेजण शेतात कोपऱ्यावर असणाऱ्या शेवग्याच्या झाडाकडे गेलो
आणि सासरेबुवांनी बांबूच्या साह्याने शेंड्यावरच्या फुलांचे फुलोरे आमच्याकडे दिले एवढ्या वेळेत आम्ही मिरची, कोबी ,वांगी, मुळा हे देखील जमवले आणि सासरेबुवांचा आणि सासूबाईंचा फोटोही काढला खूप छान वेळ गेला .शेतामध्ये थंड हवा होती .आणि हिरवे हिरवेगार गवत होते ते उंच उंच गवत पाहून सासरे मला म्हणाले हे बघ हे जे उंच गवत दिसते ना
याला हत्ती घास म्हणतात ते गवत आपण जनावरांना खायला देतो.
शेतातल्या मिळालेल्या सगळ्या ताज्या भाज्या पटापट आम्ही बांधा बांधणी केल्या आणि कधी एकदाची मी घरी जाते आणि या पांढऱ्याशुभ्र फुलांची भाजी करते असं मला झालं.