निकाल
निकाल


हो माझ्या मुलीचा 10 वी चा निकाल. मला फारच भीती होती निकालाची. वर्षभर तिचा आभास मी पहिला होता व
शिकवणी असतानाही मी तिचा सराव उजळणी घेत असे म्हणूनच की काय मला निकालाच्या दिवशी खूपच धडधडत होते कारण तिची स्मरणशक्ती उत्तम होती पण तिचा सरावाचा कंटाळा मला माहीत होता आणि आला तो निकालाचा दिवस
घरात सारेच नातेवाईक जमले. आजी आजोबा काका काकी आणि नणंदसुद्धा खास आल्या होत्या.
नेटवर निकाल दिसूपर्यंत सारेच कलकल करत होते. हसणे बोलणे चालू होते. मी ही हसत होते आणि नेटवर निकाल दिसला.
साऱ्यांचे चेहरे फुलले. सारेच आनंदले. मी खूप खुश होते, हसत होते, नकळत माझ्या डोळ्यात अश्रू आले. मुलगी छान गुणांनी उत्तीर्ण झाली होती. तिला पेढा भरवला देवापुढेही ठेवला. साऱ्यांना पेढे वाटले पण माझे अश्रू मी लपवले. कोणाला दिसू दिले नाही.
पण ते अश्रू आनंदाचे होते, एवढे मात्र खरे...