Seema Pansare

Others

5.0  

Seema Pansare

Others

सामाजिक विषय

सामाजिक विषय

2 mins
1.0K


एक नाही अनेक गळफास.

सामाजिक विषय हे शब्द नुसते उच्च्चारले तरी विचारांचा वणवा मनात पेटतो हा हा म्हणता अनेक सामाजिक समस्या डोळ्याभोवती पिंगा घालू लागतात


जग जितके आधुनिक झाले तेव्हढ्याच समस्याही  निर्माण झाल्या आहेत

आपल्या आजू बाजूला गाव परिसरात अनेक सामाजिक विषय वर डोकावत आहेत,

 गावात कुठे ओला  तर कुठे सुखा दुष्काळ,  पिकावर कीड समस्या त्यातून होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या नि त्यांच पोरकं होणार कुटुंब.

 ही एक भंयकर सामाजिक समस्या आहेंच शिवाय शहर आणि गाव दोन्ही कडे स्त्री व मुलींची सुरक्षिततेची भयाण समस्या आहेच. किती कायदे किती सुरक्षा साधने अँप निर्माण झाली पण या सामाजिक विषयाला चाप बसला नाही.

 चोरी, मुलांचे अपहरण -खंडणी मागणे हे तर समाजात आहेच याची कीड कधी जाणार कोणास ठाऊक? 


हे कमी होते म्हणून की काय आता एक नवीन समस्या समाजात हात पाय फैलावत आहे ती लोकांना पालकांना भुरळ घालत आहे ती म्हणजे शाळा संस्था व क्लास

 भरमसाठ फी घेऊन अक्षरशः पालकांना लुटत आहे


सामाजिक समस्येचा आणखी एक विषय म्हणजे

शहरात- गावात फैलावणारी घाण त्यामुळे होणारे

रोग .शहर वस्ती वाढत आहे जागेच्या समस्या निर्माण होत आहे  त्याला कारण शेतीतील समस्या बेरोजगारी महागडे शिक्षण न मिळाल्याने दुष्ट प्रवृत्तीकडे वळणे गुंड गिरी

हाणामारी .रस्त्यावर गर्दी त्यातून होणारे अपघात किती? अहो यादी संपतच नाही. आधुनिक युगातील इंटरनेट फ्रॉड.  सायबर क्राईम , डेटा हॅकिंग  या सामाजिक समस्या सर्व सामान्य माणसाला हैराण करून सोडत आहे.

याचा अंत कधी होणार कोणीच सांगू शकत नाही. या समस्या उराशी धोंडा घेउनच सामान्यजन  जीवनाची खडतर वाटचाल करत आहे. तो सूर्योदय केव्हा होणार ज्या दिवशी हर एक शेतकरी हर एक स्री व विद्यार्थी या मोकळ्या हवेत मनसोक्त शुद्ध हवेत श्वास घेईल???



Rate this content
Log in