Untitled पोस्टमार्टम
Untitled पोस्टमार्टम
पोस्टमार्टम
पोस्टमार्टम म्हणजे शव विच्छेदन हे सर्वांनाच माहित आहे
पण आपण भंगाराचे पोस्टमार्टम ऐकले आहे का
होय भंगारचे पोस्टमार्टम
अहो खरंच आपण ज्या वस्तू टाकून देतो त्या वस्तूचे पोस्टमार्टम
कोण करतय हे पोस्टमार्टम
जाणून घ्यायचा आहे का तुम्हाला?
भंगार घेणारा? भंगार देणारा?
आणखी कोणी?
खूपच उत्सुकता लागली ना हो तुम्हाला?
सांगते सांगते तुम्हाला सांगण्यासाठीच तर हा लेखन प्रपंच आहे माझा
अहो नाही नाही म्हणता तीस वर्ष झाली की लग्नाला
एवढ्या तीस वर्षात कितीतरी भंगार पोस्टमार्टम मी पाहिले आहे माझ्या उघड्या डोळ्याने
आता भंगार म्हटले की तुम्हाला लक्षात आलेच असेल
आपण वापरून टाकून दिलेल्या कितीतरी वस्तू
नको असलेले पेपर जुन्या फायली पुठ्ठे
नको असलेले वापरून झालेले व मुलांना लहान झालेले त्यांचे कपडे मुलांचे तुटके फुटके नको असलेले शाळेचे दप्तर जुन्या चपला बूट बेल्ट तुटलेली खेळणी घरातील चिरा गेलेली भांडी जुनी इस्त्री जुने मिक्सर जुने तवे वायरी
चिरा गेलेल्या बाटल्या घरातील फिके पडलेले सजावटीचे साहित्य
यादी काही संपणार नाही
आणि हे सारे मी दरवर्षी हिंमत करून काढत असते
भंगारवाल्याला द्यायला
दरवर्षी घरातली मंडळी हे राहू दे ते नको फेकू याचा उपयोग होईल ते देव कोणाला तरी उपयोगात होईल असं म्हणून फेकू देत नाहीत आणि भंगारवाल्यालाही देऊ देत नाहीत
आणि हे सारे साहित्य मी एका बॅगमध्ये भरून दारामागे ठेवत असे
भंगारवाल्याची वाट बघत
भंगारवाला रविवारी येत असे त्याची आरोळी ऐकली की मी पायऱ्या उतरवून खाली येत असे
तोपर्यंत तो दिसेनासा झालेला असे
आता परत कुठे बॅग घेऊन वर जायचे
म्हणून ती बातम खालीच ठेवत असे
आणि मग त्याचे पोस्टमार्टम कोण करणार
अहो दुसरा तिसरा कोणी नाही आमच्या सासूबाई
प्रत्येक वस्तू विचारणार हे क फेकले ते का टाकले
ही तेलाची किटली चांगली आहे तो मिक्सर चालवून बघितलास का ही चप्पल आपण त्या कामवालीच्या मुलींना देऊन टाकू असं प्रत्येक वस्तूंचं पोस्टमार्टम त्या करणार
त्याशिवाय कोणतीही वस्तू भंगारात जाणार नाही
वर्षानुवर्षे आमच्याकडे भंगार वस्तूचं पोस्टमार्टम होत आहे
तुमच्याकडे होते का
