फोटो
फोटो


जुने कौटुंबिक फोटो चाळताना कधी कधी फारच हसू येते.
कारण किडकिडीत ती तनु गाल खोल जणू दोन वाट्या.
आमचे हे तर स्ट्रीट लाईटचा खांब पण केसांचा दिमाख, अहो देवानंदच जसा अन आता हसू की रडू केसांचा भांग कसा पाडू ?
आणि हो ती जुनी बेलब टम स्टाईल ची पॅन्ट त्यांची नाही माझी , चक्क हातात सायकल घेऊन काढला फोटो, आणि हा गोवाच्या
उद्यानात हिरवळीवर कानाला रुमाल डोळ्यावर गॉगल ताईने काढला.
पहिल्या डोहाळजेवणाचे फोटो हाती घागर , झोपाळा, ते फुलांचे हार बाजूबंद... खूपच आनंददायी आठवणी जुने फोटो
किती ही पाहिले तरी मन भरत नाही.
सारे प्रसंग जसे च्या तसे डोळ्यासमोर उभे रहातात फोटो म्हणजे आठवणींचा खजिना विज्ञानाचा अनमोल नजराणा.