संकट
संकट


संकटे आली आणि गेली पण मी कधी घाबरले नाही. पण हे संकट फार वेगळे होते. त्याला झाली आता 12 वर्षे
राज वर्षाचा होता आम्ही सारे कोकणात सुट्टीत गेलो होतो. आमचे कुटुंब दिवेआगर येथे रूम घेऊन राहणार होतो.
गाडी कोकणात जाई पर्यंत सूर्यास्त होण्याची वेळ झाली. सारे पटपट सागर किनारी पळाले जे ते जोशात होते.
मी पण मात्र माझा मुलगा राज माझ्या हाताशी होता. सूर्यास्त समुद्र किनारीच झाला व सारे जण रूम वर निघाले. परतीची अरुंद वाट संपली आणि छोटा गावाचा रस्ता लागला आता उजवीकडे जायचे की डावीकडे मी गोंधळले. अंधारही झाला होता सारे भिजले असल्याने पुढे निघून गेले.
मी मात्र राजला घेतल्याने मागे पडले
कोकण अनोळखी ठिकाण, रात्र झालेली,रात्र किड्यांचा किर्र किर्र आवाज,अंग भिजलेले छातीशी लहानगे बाळ
छाती खुप धडधडू लागली. हे राज ने कदाचित ओळखले आणि तो काहीतरी जणू मला विचारू लागला.
काय करावे सुचत नव्हते मोबाईल जवळ नव्हता फोननंबर ही कोणाचा आठवेना
पण धाडस करू न एका दुकानात गेले त्यांना सांगितले.
दुकानदार म्हणाला,
ताई काळजी करू नको तुम्ही जिथे उतरला आहात ते हॉटेल मी शोधतो. नाही सापडले तर पुण्याच्या गाडीत बसवून देतो
देवच धाऊन आला त्याच्या रुपात.
तासाभरात त्याने आमची गाडी शोधून काढली. माझा जीव भांड्यात पडला
माझ्या कुटुंबाची तो पर्यन्त पाचावर धारण बसली होती.
त्यांच्याही जीवात जीव आला.
हा बाका प्रसंग मी कधीच विसरू शकत नाही
तो कोकणी दादा त्याला अनेक धन्यवाद