शेवगा
शेवगा
मन सतत सांगत होतं .शेवगा. शेवग्याची फुले शेवग्याची पाने एकदा तरी खायचे आहे बरं का.
माझ्या बालपणी मी काही काळ आजोळी राहिले होते आजोबा आजींनी घराच्या परस दारी भरपूर झाडे लावली होती त्यामध्ये गुलमोहराचे खूप मोठे झाड होते आणि शेवग्याचे पपईचेही झाड होते मला आठवते मोगऱ्या ची काही रोपे होती. ब्लॅकबेरी म्हणजे तुतीचे झाड होते त्या झाडावर तर आम्ही चढत असू आणि तुती काढत असू.
पांढऱ्या रंगाची लिलीची फुले ही होती
पांढऱ्या रंगाच्या फुलावरून आठवले शेवग्याच्या झाडाला ही पांढऱ्या रंगाची छोटी छोटी खूप फुले येत असे त्या फुलांचा गुच्छच असे पण ही फुले शेवग्याच्या अगदी शेंड्याच्या भागाला असे.
मला चांगले आठवते मी या फुलांची भाजी खाल्ली होती माझ्या आजीने खूप सुंदर चवदार अशी भाजी मला करून दिली होती
मला ही भाजी खायची खूप इच्छा झाली
पण तो योग येत नव्हता
कारण आता आजीचे ते जुने घर कधीच पाडले होते त्या जागी टोलेजंग इमारत झाली होती
आजी आजोबांना देवा घरी जाऊनही आता खूप वर्ष झाली. आता आजोळ तुटले होते मामा-मामीकडे जाणे खूप कमी झाले होते
कारण मी पण आता सासरी आले होते
माझ्या संसारात व्यस्त झाले होते.
बाजारात शेवग्याच्या शेंगा तर भरपूर असायच्या शेंगांची भाजी मी बऱ्याचदा खाल्ली आहे व करत आले आहे पण मला शेवग्याच्या फुलांची ,पानांची भाजी खायची इच्छा झाली होती आणि हा सुवर्ण योग खरच एकदा जुळून आला
