हे अनुभवावे लागले
हे अनुभवावे लागले


नोव्हेंबर 2019
का कोणास ठाऊक आज मला तुमच्यापुढे हे व्यक्त करावेसे वाटते...
माझी दिवाळी मोठ्या मजेत गेली
रांगोळी,पाहुणे रावळे अगदी मस्तच.
आणि फराळाचा गोडवा वाढवला तो आपल्या शब्दरसिकं अंकाने. वेळात वेळ काढून लेखन कविता अगदी मनासारखे चालले होते
सुट्टी संपायला एकच दिवस बाकी होता सकाळची कामे उरकून जरा दुपारी निवांत पडले आता उद्या पासून माझी व मुलांची शाळा सुरू. म्हणून आराम करावा वाटले
पण पाच वाजता अंग गरम वाटले ताप भयानक वाढला.
समोर क्लीनीक आहे डॉक्टरांनी औषध दिले व रक्त तपासायला सांगितले.
उद्या शाळेचा सुट्टीनंतर पहिला दिवस म्हणून औषधे घेऊन शाळेत गेले, कसा बसा दिवस ढकलला कारण शाळा सुटेपर्यंत पुन्हा ताप चढला.
घरी आले रक्त तपासले डेंगू निघाला.
आता पर्यंत ठीक होते.
पण आता पुढच्या यातना सांगणे कठीण आहे.
ऍडमिट , दिवसाला पाच पाच सलाईन त्यातून इंजेक्शन्स...
हात सुजले उजवा हात तर बधीर होत असे... डोके भयानक दुखत असे
9/11/2019 ते 16/11/2019 मी दवाखान्यात होते
पण या आजाराने मला घरच्यांनी जी साथ दिली ती मला शब्दात व्यक्त करता येणार नाही
माझी वयस्कर सासू तिची धडपड. डबे आणणे अगदी माझा हात सुजला होत
ा म्हणून तिने मला घास ही भरवला
सासू माझी सत्तरी तली पण जुनं हाड अगदी मजबूत
तरण्यांना लाजवेल असे बळ प्रेमळ तेवढीच कडक साऱ्यांचे प्रेम दिसून आले आजारपणात खरवस पपई व पानांचा ताजा रस देणं हे काम आमचे हे कटाक्षाने करत होते
मुली ही धडपडत होत्या माझ्या साठी दवाखान्यात नातेवाईकांची वर्दळ सुरू झाली
नर्स तर मला म्हणाली जास्त गर्दी करू नका. नातेवाईकांना सांगा ताई.
त्यांना काय म्हणू अहो हे घरचेच आहेत अजून तर कोणालाही सांगितले नाही तरी बहीण ,भाऊ ,वडील, अत्या ,दीर जाव नणंद त्यांची मुले माझी मुले पुतणे.. शाळेतला स्टाफ येऊन भेटून गेला यात लेखन, वाचन थोडे मागे पडले.
पण या आजाराने वेदने बरोबर इतरांचे प्रेम नव्याने केवळ दाखवून दिले नाही तर त्याची लकाकी किती तेजस्वी आहे हे कळले
आम्ही बायका उगाच कुढत बसतो.. मी किती राबते माझ्यासाठी कोणी काही करत नाही. कुटूंबात घट्ट नातं असतं ते वेळप्रसंगी अस दिसत. प्रेम असतं मला या आजारामुळे कळले.
आता माझी काहीच तक्रार नाही त्यांनी मला नको आणू दे साडी नको आणू दे गजरा पण सारे माझ्यावर प्रेम करतात हेच खरे आहे.
पण त्यासाठी मला आजारी पडावे लागले, हे ही तितकेच खरे आहे अणि तो आजाराचा अनुभव भयानक हो.
असो .