Rutuja Thakur

Abstract Inspirational Others

3  

Rutuja Thakur

Abstract Inspirational Others

अनघा - भाग दुसरा

अनघा - भाग दुसरा

2 mins
193


घरात तयारी सुरू झाली पाहुणे येणार म्हणून, मी आपली विचारातच की आता काय होईल माझं पुढे... काय करू काही कळेनाच, तेवढ्यात आई आली माझ्या खोलीत.

आई- अगं अनघा, हे बघ ही साडी मी खास तुझ्यासाठी ठेवलेली, की तुला बघायला येतील तेव्हा तू ही साडी घालशील. कशी आहे साडी??? आवडली का तुला??? 

अनघा- हो, छान आहे.

आई- चल मग तू पटापट तयारी कर, ते लोक निघालेत म्हणे, येतील च थोड्या वेळात. तुला काही मदत लागली तर मला हाक मार हं.......

बिचारी अनघा अस्वस्थ होती, तशीच लागली तयारी करायला. तयारी करून विचार करत बसली होती आपल्या खोलीत तेवढ्यात पाहुणे मंडळी आले. अनघा गाडीचा आवाज ऐकुन अजूनच घाबरली तिला काही सुचेनासे झाले. आतून पार तिचा थरकाप होत होता. पाहुणे घरात आले, चहा पाणी झालं, बराच वेळ सगळ्यांच्या गप्पा झाल्या.

आता ती वेळ आली होती, अनघाला बाहेर जाण्याची. अनघाची आई अनघाला घ्यायला आली. अनघा खूपच घाबरलेली. कारण तिच्यासाठी हे सगळं नवीनच होतं. आई सोबत अनघा बाहेर गेली आणि समोर असलेल्या खुर्चीवर बसली. तेवढ्यात अनघाच्या वडिलांनी पाहुणे मंडळींना अनघाला काय विचारायचे ते विचारा म्हणून सांगितले.

अनघा आपली खाली मान घालून थरथर करतच होती. तेवढ्यात एक एक करून सगळ्यांनी प्रश्न विचारले, मुलानेही एक दोन प्रश्न विचारले. अनघाने योग्य पद्धतीने सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. बोलून झाल्यावर अनघा आत गेली. तितक्यात पाहुणे मंडळीनी आम्हाला अनघा पसंत आहे म्हणून सांगितले. अनघाच्या आई वडिलांना खूप आनंद झाला, कारण त्यांना आधीच मुलगा बघत्या क्षणीच आवडला होता. आता प्रश्न होता तो अनघाचा होकार देण्याचा. आई वडिलांनी आत जाऊन अनघाशी बोलणे केले, आणि समजावले ही, मुलगा चांगला आहे आणि घरचे ही सुसंस्कृत आहेत. तुला काय वाटतं????

अनघा बोलली, तुम्हाला जे योग्य वाटत असेल ते करा मी तुमच्या मताशी सहमत असेल. कारण आता अनघाला ही कळून चुकलं होतं की घरच्यांना स्थळ आवडलय म्हणून.... ती उत्तर देण्याच्या मनःस्थितीत नव्हतीच कारण आतून ती पूर्ण गोंधळलेली होती. पण तिने आई वडिलांवर विश्वास ठेवत निर्णय त्यांच्यावर सोपवला.

अनघाच्या बाबांनी बाहेर येऊन आमचा ही होकार आहे म्हणून सांगितलं...,

मग सगळं बोलणं झालं, देण्या- घेण्याच्या गोष्टी झाल्या, आणि शेवटी लग्नाची तारीख ठरवली गेली.

आता मात्र अनघा ने स्वतःच्या मनाची तयारी करून घेतली होती लग्नासाठी. घरात आनंदाचे वातावरण पसरले होते. लग्नाची तयारी जोराने सुरू झाली. आणि बघता बघता तो दिवस उजाडला.... अनघाचा लग्नाचा दिवस.

लग्नाच्या दिवसापर्यंत अनघा मुलाशी बोलली देखील नव्हती. मग अनघाच्या आई वडिलांनी अगदी जोरात अनघाचं लग्न लाऊन दिलं. आई वडिलांचा आशीर्वाद घेऊन, अनघा तिच्या सासरी गेली.........


सासरी तर गेली, पण अनघाच्या मनात अजूनही खूप द्वंद्व होते. कारण अजून ती मुलाशी बोलली नव्हती, मुळात त्याचा स्वभाव कसा असेल, सासरचे लोक कशे असतील, तिथे मी माहेरी वावरत होती तशी वावरू शकेल का????? असे खूप प्रश्न तिला पडत होते.... सासरी गेल्यानंतर अनघाचे काय होते, ती सासरी रमते की नाही??? तिच्या पुढील शिक्षणाचे काय होते??? 


हे आपण पुढील भागात बघू...!!!!


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract