Rutuja Thakur

Horror Crime

3.7  

Rutuja Thakur

Horror Crime

होस्टेल- एक रहस्य...!!!

होस्टेल- एक रहस्य...!!!

9 mins
1.1K


शालिनीने नुकतीच १२ विची परीक्षा उरकली होती, आणि त्यात ती पास देखील झाली होती. पुढील शिक्षणासाठी तिला अकोल्यात जावे लागणार होते.

कारण, ती ज्या गावात राहत होती, त्या गावात फक्त १२ वी पर्यंतचे शिक्षण होते, आणि शालिनी चे स्वप्न होते डॉक्टर होण्याचे.

तिची खूप इच्छा होती, अकोल्यात जाऊन शिकण्याची. पण शालिनीची आई शालीनीला शिक्षणासाठी बाहेर पाठवण्यास नकार देत होती. घरात सगळ्यांनी तिच्या आईला समजावून पाहिले, पण शालिनी घर सोडून कधी कुठेच गेलेली नव्हती,आणि महत्वाचे म्हणजे अकोल्यात ओळखीचं असं कोणी नव्हतं, शालीनिला हॉस्टेल मध्ये राहावे लागणार होते. म्हणून आईची इच्छा नव्हती.

शालिनी ने आईला सांगितले, की आई मला जाऊदे, मी हॉस्टेल मध्ये अगदी व्यवस्थित राहील, आणि तुला रोज फोन देखील करत जाईल. तब्येतीची काळजी घेईल.

मला पुढे शिकून डॉक्टर व्हायचे आहे, हीच वेळ आहे माझं स्वप्न पूर्ण करण्याची.

आईने खूप वेळानंतर विचार करून शालीनी ला होकार दिला. शालीनी खूप आनंदी झाली. आणि तिने पटकन जाण्याची तयारी सुरू केली.

दुसऱ्या दिवशी पहाटेच शालीनी चे वडील शालीनी ला घेऊन अकोल्याला निघाले, शालीनी नें आईचा नमस्कार केला, आई खूप रडत होती, कारण शालीनी कधीच तिच्यापासून दूर गेलेली नव्हती.

जणू शालीनी लग्न करून सासरीच जात आहे, असे आई रडत होती, शालिनीला ही रडू आले. डोळे पुसत ती गाडीत बसली. आईने तुपाचे लाडू, दशम्या, खूप काही शालीनी सोबत बांधून दिले होते.

काही तासात शालीनी आणि तिचे वडील अकोल्यात पोहोचले. सगळ्यात आधी त्यांनी कॉलेजला जाऊन शालीनी चं एडमिशन केलं, आणि मग कॉलेज जवळपास कुठे हॉस्टेल मिळतंय का शोधू लागले....,

काही वेळाने शालीनी ची नजर मुक्तहस्त हॉस्टेल कडे गेली, तिने तिचा वडिलांना ते हॉस्टेल बघण्यास सांगितले.

दोन्हीही त्या हॉस्टेल कडे जाऊ लागले, की एक काळी मांजर त्यांच्या समोरून आडवी गेली.

शालीनीचे वडील तिथेच थांबले..., शालिनीने विचारले, बाबा काय झालं का थांबले, तिचे बाबा उत्तरले अगं मांजर आडवी जाणं अशुभ असतं ५ मिं थांबून मग जायचं, शालीनीला हसू आले आणि ती वडिलांचा हात खेचून पुढे घेऊन गेली की बाबा असं काहीही नसतं.

हॉस्टेलला गेल्यानंतर ते तिथल्या रेक्टर ला भेटले, शिवानीच्या वडिलांनी रेक्टर ला शिवानीचे हॉस्टेल मध्ये एडमिशन घ्यायचे आहे असे सांगितले. रेक्टर बोलली सगळ्या रूम फुल आहेत, ती कोपर्यातली रूम सोडून.

शिवानी पळतच ती रूम बघण्यास गेली, तिच्यामागे तिचे वडील ही गेले, शालिनी जशी रूमच्या दाराजवळ आली, तिथेच चक्कर येऊन खाली कोसळली. शालीनी चे वडील खूप घाबरले, तीच्या तोंडावर त्यांनी पाणी शिंपडले. तीच्या वडिलांना तो रूम काही आवडेना, थोड्या वेळाने शालिनी शुद्धीवर आली, तिला कळलेच नाही की अचानक तिला चक्कर कसे आले.

शालीनी चे वडील तिला म्हणाले, की मला हे हॉस्टेल काही बरे दिसत नाही, एकदम सुन्न आहे, त्यात तू चक्कर येऊन पडली, चल आपण दुसरी हॉस्टेल बघू.......,

शालीनी ने हट्टच केला की ती त्याच हॉस्टेल ला राहणार, शालिनी च्या वडिलांनी रेक्टर ला विचारले, की अजून दुसरी रूम आहे का, रेक्टर ने स्पष्ट नकार दिला, ती एकच खोली शिल्लक आहे म्हणून सांगितले, रेक्टर ने शालिनी च्या वडिलांना काळजी करू नका मी आहे लक्ष द्यायला म्हणून सांगितले.

हॉस्टेल ला तिचे एडमिशन करून झाल्यानंतर शालिनी चे वडील परत गावी जाण्यास निघाले. आणि शालिनीला म्हणाले, काहीही वाटलं तर फोन करून कळव म्हणून.

वडील गेल्यानंतर शालिनी तिची बॅग घेऊन आत खोलीत गेली, तीच्या खोलीत तिने तिचा सामान लावला, आणि पलंगावर झोपी गेली, थोड्याच वेळात तिला जाग आली, उठून तिने बाथरूम चा दार उघडण्याचा प्रयत्न केला पण दार आतून बंद होते. ती परत जाऊन पलंगावर बसली, थोड्यावेळात बाथरूम मधून एक मुलगी बाहेर निघाली, प्रियांका म्हणजेच शालिनी ची खोलीतली सोबती.

तिला पाहून शालिनी ला बरे वाटले की कोणीतरी आहे आपल्या सोबत आपण एकटे नाही म्हणून.

शालीनी ने तिला नाव विचारले असता तिने प्रियांका सांगितले, शालिनी फ्रेश होण्यासाठी गेली.

रात्री जेवणानंतर शालिनी ने आईला फोन केला, आईशी बोलून शालिनी ला खूप बरे वाटले. शालीनी ने आईला मी एकटी नसून प्रियांका आहे सोबत म्हणून सांगितले. आईला ही बरे वाटले ऐकून.

बोलून झाल्यावर शालिनी आत येऊन झोपी गेली. रात्री अचानक झोपेत असताना शालिनी ला जोरजोरात रडण्याचा आवाज ऐकू आला, ती अतिशय घाबरून उठली, बघितला तर प्रियांका बाजूला झोपलेली होती. तिला वाटलं की झोपेत स्वप्न बघितले, ती पुन्हा झोपू गेली.

दुसऱ्या दिवशी शालिनी आणि प्रियांका कॉलेज मध्ये गेल्या, कॉलेजचा पहिला दिवस होता त्यांचा. प्रियांका खूप शांत स्वभावाची होती ती शालिनी शी फारशी बोलत नव्हती, कॉलेज उरकून त्या पुन्हा हॉस्टेल ला आल्या. शालिनी ने प्रियांका ला तीच्या गावाबद्दल सांगितले, दोघांच्या छान गप्पा झाल्या.

त्यादिवशी पुन्हा रात्री शालिनी ला जोरजोरात रडण्याचा आवाज ऐकू आला, ती घाबरून उठली. बघते तर बाजूला प्रियांका झोपली होती. तिने प्रियांका ला उठवून घडलेला प्रकार सांगितला, प्रियांका तिला म्हणाली की तू स्वप्न बघितले असेल झोप तसं काही नाही.

असे सारखे शालिनी ला स्वप्न पडू लागले.

काही दिवसात कॉलेज ची परीक्षा येणार होती, शालिनी खूप खुश होती. की परीक्षा संपल्यानंतर घरी जाणार म्हणून.

पेपर सुरु झालेत, शालिनी ला पेपर व्यवस्थित जात होते, पण ती रात्रीची स्वप्न काही तिचा पीछा च सोडेना. तिला आता भीती वाटू लागली. उद्या शालिनी चा शेवटचा पेपर होता, त्यामुळे ती रात्री लवकर झोपी गेली होती. पण त्या रात्री जे घडले ते अतिशय भयानक होते......,

शालिनी झोपेत असताना तिला आवाज ऐकू आला, शालिनी ये शालिनी.........,

तिने आवाज ऐकुन न ऐकल्यासारखे केले, परत एक आवाज आला- शालिनी ये शालिनी उठ......,

दचकून शालिनी जागी झाली, आणि रूम ची लाईट लावली, बघते तर बाजूला प्रियांका ही नव्हती, तिने प्रियांका ला आवाज दिले, सगळीकडे शोधले पण प्रियांका कुठेच दिसेना,

तिला रडण्याचा आवाज येऊ लागला, आवाज जिथून येत होता त्या दिशेने शालिनी जाऊ लागली, शालिनी चे हातपाय अगदी गळून गेलेले, कारण ह्याआधी असे तिने कधीच अनुभवले नव्हते, ती अतिशय घामेघाम झालेली. ती पुढे पुढे जात होती, हॉस्टेल च्या बाथरूम जवळ येऊन ती पोहोचली अता आवाज अतिशय जोरात येऊ लागला.

शालिनी ची दार उघडण्याची हिम्मत च होते नव्हती. पण कसतरी तिने दार उघडले. आत बघते तर एक मुलगी उलट्या दिशेने उभी राहून रडत होती, शालिनी विचारात पडली की कोण आहे ही मुलगी आणि अशी रडते का आहे??????

हाच रडण्याचा आवाज मला रोज ऐकू येत होता, वेगवेगळ्या प्रश्नांनी शालिनी ला घेरून ठेवले होते.....,

शालीनी हळूच पुढे गेली त्या मुलीला हात लावणार तोच तिने फक्त मान शालीनिकडे वळवली, बाकी शरीर सुलटेच होते, हे बघून शालिनी जोरात ओरडली आणि भूत भूत म्हणून ओरडू लागली, तसाच बाथरूम चे दार आतून बंद झाले. तिचा आवाज बाहेर कोणालाच ऐकू जाईना.

शालिनी झटक्यात खाली कोसळली, आणि जोरजोरात ओरडू लागली, तोच ती मुलगी शालिनीला म्हणाली अग ये शालिनी ओरडू नकोस इकडे वर बघ माझ्याकडे......!!!!

तू मला चांगली ओळखते तुझी मैत्रीण ना मी....,

मग घाबरते कशाला, बघ इकडे.

शालीनी ला तो आवाज ओळखीचा वाटला, तिने हळूच वर बघितले, तर ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून तिची रूम पार्टनर प्रियांका च होती, हे बघून तर शालिनी अजूनच घाबरली. तिला काहीच सुचेनासे झाले, ती जोरजोरात दार आपटू लागली, आणि रडू लागली, प्रियांका ही मुलगी नसून एक भूत आहे आणि मी इतक्या दिवस तिच्यासोबत राहत होती??????

प्रियांका चे भूत शालिनी ला म्हटले, शालिनी मी तुला सोडून कोणालाच दिसत नाही, मला जाऊन आज ३ वर्षे झाली, जिथे तू राहतेस त्याच रूम मध्ये मीही राहत होती, १ वर्षाआधी ह्याच रूम मध्ये माझी हत्या करण्यात आलेली, ज्यांनी मला मारलं त्यांनी मी आत्महत्या केलीय असं सांगितलं आणि सगळे पुरावे नष्ट केलेत, मी तेव्हापासून प्रतिशोध हवा म्हणून भटकते आहे, त्यात आता तू मला भेटलीस, हे बघ मी तुला काहीही करणार नाही फक्त मला तू न्याय मिळवून द्यावा हीच माझी इच्छा आहे, शालिनी ने तिला विचारले कोणी तुझी हत्या केली होती आणि का???????

प्रियांका बोलली, माझे अर्णव म्हणजेच माझा प्रियकर तसं आम्ही २ वर्षांपासून सोबत होतो.

माझे अर्णव वर जिवापाड प्रेम होते, लग्न करण्याचे स्वप्न बघितले होते मी.

पण जेव्हा मला कळाले, की अर्णव ची आई शिला म्हणजेच आपली रेक्टर आहे तेव्हा पायाखालून माझ्या जमीनच सरकली. कारण मला माहिती होते रेक्टर स्वभावाने खूप कडक आहे, तिला माहित पडल्यास ती आम्हाला कधीही एक होऊ देणार नाही, मी हे अर्णव सोबत बोलली देखील होती. अर्णव बोलला की नको विचार करू वेळ आल्यावर बघू म्हणून......!!!!!

घरची मी एकुलती एक होती, आणि माझे वडील व्यवसायाने डॉक्टर होते.

कॉलेज संपल्यानंतर घरी जाण्याची वेळ आलेली, तेव्हा मी अर्णव ला बोलली की तू आत्ता आईला आपल्याबद्दल सांग म्हणून...... अर्णव ला मी सारखे फोन करत होती पण तो माझे फोन कट करत होता मला काहीच कळेना, की तो असे का करतो आहे ते....,

नंतर मी हिम्मत केली आणि रेक्टर जवळ गेली आणि तिला सगळे सांगितले, रेक्टर हसून मला बोलली स्वप्न बघ अर्णव शी लग्न करण्याचे.

तो तुझ्यावर प्रेम करत नाही मला सगळे माहित आहे, अर्णव ने सगळे सांगितले आहे मला आधीच. हे ऐकुन मला धक्काच बसला, मी तशीच निघाले आणि अर्णव च्या घरी गेले, आणि त्याला जाऊन जाब विचारला.....!!!!!

अर्णव जोरजोरात हसू लागला, अर्णव ने कधीच माझ्यावर प्रेम केले नव्हते, खरं तर त्याला माझे पैसे दिसले, प्रॉपर्टी दिसली आणि म्हणून तो प्रेमाचं नाटक करत होता, मला ऐकुन खरं खूप धक्का बसला, की ही माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठी चूक आहे, असे वाटू लागले, त्याच वेळी मी विचार केला की मी अर्णव ला इतक्या सहजरीत्या सोडणार नाही तर त्याच्या आणि त्यांच्या आई विरोधात केस करेल. आणि हे मी अर्णव ला बोलून हॉस्टेल ला परतली.

परीक्षा संपली होती म्हणून सगळ्या मुली आपापल्या घरी गेल्या होत्या मी एकटीच उरली होती हॉस्टेल ला.

मी ही घरी जाण्याची च तयारी करत होते. घरी जाऊन आई बाबांना सगळे सांगणार होते, अर्णव विरोधात केस करायला सांगणार होते, पण हे माझं फक्त स्वप्न च राहून जाईल असा विचार ही मी मनात केला नव्हता.

मी बॅग भरत असताना अर्णव आणि त्याची आई माझ्या खोलीत आले, त्याची आई बोलली केस करणार होय आमच्यावर.......,

मी काही बोलणार त्या आधीच त्यांनी मला उशी तोंडावर दाबून धरली, आणि माझा जीव गेला. त्यानंतर त्यांच्यावर यायला नको म्हणून त्यांनी मला पंख्याला लटकून दिले, आणि सगळे पुरावे नष्ट केलेत. मी आत्महत्या केली म्हणून सांगितले.

मला नाही माहित की फक्त तूच मला का दिसते आहे, पण तुझ्याकडून माझी एकच अपेक्षा आहे की तू मला न्याय मिळवून द्यावा.

शालिनी ला प्रियांका ची खूप दया वाटली, खूप वाईट वाटले, ती प्रियांका ला म्हणाली, मी तुला न्याय मिळवून देईल, पण माझ्याकडे तर काहीच पुरावे नाहीत मग मी तुझी मदत कशी काय करू???????

शालिनी बोलली पुरावा आहे माझ्याकडे- मी अर्णव च्या घरी गेलेली तेव्हा त्याच आणि माझं बोलणं मी रेकॉर्ड केले होते, त्यात त्याने स्पष्ट सांगितले की तू आमचं काही करू शकणार नाही. तो मोबाईल माझ्या कॉट मध्ये आहे, प्रियांका ने पटकन जाऊन शालिनी चा कॉट उघडला बघते, तर मोबाईल तिथे होता. तिने मोबाईल चार्ज केला आणि तो व्हिडिओ पहिला, त्या मोबाईल मध्ये त्या दोघांचे सोबतचे फोटो देखील होते.

शालिनी ने प्रियांका ला वचन दिले, की मि तुला न्याय मिळवून देईल. माझे काका वकील आहेत हे पुरावे मी त्यांना देईल बाकीचं ते करून घेतील. प्रियांका बोलली फक्त मी त्याच दिवसाची वाट बघते आहे की कधी ह्या दोघांना शिक्षा होईल आणि मी मुक्त होईल.

दोन्ही च बोलणं झाल्यानंतर शालिनी तीच्या गावी गेली, तिने घडलेला सगळा प्रकार आई वडिलांना सांगितला. दुसऱ्या दिवशी तीच्या वडिलांनी काकांना घरी बोलावले जे वकील होते ते आल्यानंतर त्यांनाही सगळं सांगितलं शालिनी ने... आणि ते पुरावे ही दाखवले.

शालिनी च्या काकांनी रेक्टर आणि त्यांच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल केला जवळपास २ महिने केस चालली.

शेवटी जे व्हायचं तेच झालं, निकाल प्रियांका कडून लागला, त्या दोन्हींना प्रियांका ची हत्या केली म्हणून आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली गेली.

शालिनीला खूप आनंद झाला, घाबरून न जाता शालिनी ने वेळेवर जे करून दाखवलं ते अतिशय योग्य आणि नावाजण्याजोगे होते. प्रियांका देखील त्यादिवशी समाधानी झाली होती, तिला ह्या सगळ्यातून मुक्ती मिळाली होती. प्रियांका चे आई वडील खूप आनंदात होते त्यादिवशी.

त्या दिवसापासून प्रियांका च्या आई वडिलांनी शालिनी ला आपली मुलगी मानले. आणि शालिनी च्या आई वडिलांना आपल्या मुलीचा खूप अभिमान वाटत होता.

शालिनी चे हॉस्टेल ला जाऊन राहणे, खऱ्या अर्थाने सार्थकी लागले होते.......!!!!!



Rate this content
Log in

Similar marathi story from Horror