Rutuja Thakur

Others

3  

Rutuja Thakur

Others

तरीही ती लढा देतच आहे - भाग आठवा (शेवटचा)

तरीही ती लढा देतच आहे - भाग आठवा (शेवटचा)

3 mins
94


भाग आठवा (शेवटचा )


माहेरी सुजाता सगळ्यात लहान होती, पण सासरी जे तिने अनुभवलं होतं ते खूप मोठं आव्हान होतं, पण तिने सगळे निभावून नेले होते.

रोहनने पुन्हा परीक्षेची तयारी करायला सुरुवात केली, मन लावून तो अभ्यास करू लागला. इकडे सुजाता तिचे रोजचे कामे करतच होती, पण सध्या मात्र तिची जाऊ जरा जास्तच त्रास द्यायला लागली होती, शेवटी वैतागून सुजाताच्या सासूने तिच्या सासऱ्याना, ह्या दोघांना वेगळे करा म्हणून सांगितले, कारण सासुही आता तिच्या स्वभावाला कंटाळली होती. ते म्हणतात ना एखाद्याच्या स्वभावाला काही औषध नसते, तसचं काहीसं सुजाताच्या जाऊचे होते.

ज्या क्षणाची सुजाता आतुरतेने वाट बघत होती तो क्षण आलाच शेवटी.

सुजाताच्या सासऱ्यानी दोघांना वेगळे केले, घर एकच... फक्त दोघांच्या खोल्या ह्या वेगळ्या झाल्या होत्या. आता सुजाता वेगळी झाल्यामुळे तिने स्वतःचा गॅस घेतला, किराणा सामान घरात मस्त भरून घेतले. हा खूप सुवर्ण क्षण होता तिच्यासाठी, कारण आज ती त्या जाचापासून कायमची मुक्त झाली होती, आता तिला टोमणे देणारं, टोचून बोलणारं कोणी नव्हते. काम तर प्रत्येकाला करावेच लागते, पण मानसिक त्रास नको असायला आणि आता कुठेतरी जावून सुजाताच्या जीवनात थोड्या सुखाची चाहूल लागली होती.

आज ती खूप खुश होती. तिला विश्वास होता की हेही दिवस जातील म्हणून.....,

सुजाता शैलेश रोहन आणि तिची सासू हे आता एकत्र राहत होते. सासरे जाऊकडे होते. आता सुजाता जे हवं ते बनवू शकत होती, स्वतःच्या छोट्याश्या घरात खूप आनंदी होती. तिची बातमी ऐकताच तिच्या माहेरी सगळ्यांना खूप आनंद झाला, कारण सुजाताच्या आनंदामध्येच त्यांना ही आनंद वाटत होता. आणि आता शैलेश ही बऱ्यापैकी चालू लागले होते, त्यांच्यात पुष्कळ सुधारणा ही झाली होती. आता सुजाता आधीपेक्षा ही खूप जास्त खंबीर झाली होती, एक वेगळा आत्मविश्वास तिच्यात आला होता. आणि आता काही दिवसांतच तिच्या दोन्ही मुलीही तिच्याकडे परतणार होत्या.... आता साक्षीचा ही पार्लरचा क्लास झाला होता, आणि सोनलचा शिवणकामचा क्लास झाला होता, ह्या दोघीही नक्कीच आईकडे येवून स्वतःच अस्तित्व बनवतील अशी सुजाताला अपेक्षा होती....,

आणि काही दिवसांनी आता रोहनचा दहावीचा निकालही लागणार होता, मात्र ह्यावेळेस त्याला पूर्ण खात्री होती की तो चांगल्या मार्कानी पास होणार म्हणून....

तर अशाप्रकारे नेहमी दुःख झेलनाऱ्या सुजाताच्या जीवनात सुखाची चाहूल लागली होती, आणि आता ह्यापूढे सगळे चांगलेच होणार हाच एक तिचा ध्यास होता...!!!


निष्कर्ष- 

मित्रांनो ही काल्पनिक कथा नसून ही एक सत्यकथा आहे, सुजाता सारखे पात्र खरे अस्तित्वात आहे, आणि त्यांनी त्यांच्या जीवनात अनुभवलेल्या ह्या गोष्टी तुमच्या समोर मांडन्याचा फक्त एक प्रयत्न केला आहे.

आज कितीतरी सुजाता दुःखाला कंटाळून, जाचाला कंटाळून, स्वतःपुढे असलेल्या आव्हानाला कंटाळून आत्महत्या करत असतात...., 

पण ही एक वेगळी सुजाता आपण सगळ्यांनी अनुभवली आहे, हे एक खूप मोठे सकारात्मक उदाहरण आज आपल्या समोर आहे, की कितीही दुःख येऊ दे, अडचणी येऊ देत... पण स्वतःची वाट न भरकटता तिच्या कुटुंबासाठी, तिच्या वडिलांच्या अब्रुसाठी, तिच्या मुलांच्या उज्वल भविष्यासाठी तिने सगळे कष्ट सहन केले, आणि आज आपल्यासमोर एक  "The Great Sujata...." म्हणून तिचे कर्तव्य बजावत उभी आहे.

बघा ना, दैव ही तिच्यापुढे हरले..... आणि शेवटी त्या अग्नीपरीक्षेतूनन तिची सुटका झालीय.

गेली २० वर्षे जे ती भोगत होती, त्यातून तिने स्वतची सुटका करुन घेतली आहे, ते ही कोणाला त्रास न देता. आज तिच्यामुळे तिच्या माहेरचे नाव हे गर्वाने मोठे झाले आहे, आज सुजाताचे वडील लक्ष्मण ह्यांनाही आपल्या मुलीबद्दल गर्व वाटत असेल. खरंच सगळ्यांना मुलगी असावी, सून असावी तर ती सुजाता सारखी...

सुजाताला तिच्या पुढच्या वाटचालीसाठी आपल्या सगळ्यांकडून खूप खूप शुभेच्छा आणि प्रेमसुद्धा..


Rate this content
Log in