तरीही ती लढा देतच आहे - भाग सहावा
तरीही ती लढा देतच आहे - भाग सहावा


भाग सहावा-
सुजाता सारखे व्यक्तिचित्र असणे ह्याला दैवतच मानावं लागेल, कारण आजच्या काळात एवढे कोणीच सहन करू शकत नाही , पण गेले २० वर्षे ती फक्त सहन आणि सहनच करत होती. सुजाताच्या घरात तिच्या जाऊच्या मोठ्या मुलीचे लग्न होते, अतिशय गाजत वाजत ते लग्न पार पडले होते, सुजाताने स्वतःची मुलगी समजून लग्नात कामे केली, तिच्या माहेरचे पण त्या लग्नाला उपस्थित होते. घरात कुठलेही कार्य असेल, तर सुजाता स्वतःहून सगळे सांभाळून घ्यायची. इकडे सुजाताच्या मुलीची १२ वी झाली होती मामाकडे असताना. दिवसेंदिवस सुजाताची परिस्थिती बिकट होत चालली होती, तिला घरात ही बघावं लागायचं, कधी कधी शेतात ही जावे लागायचे, इकडे घरात नवऱ्याचे करावे लागत होते सगळे जागेवर, आणि मुलांकडे वेगळे लक्ष द्यावे लागत होते त्यात तिच्या जाऊचा छळ हा वाढतच चालला होता. सुजाताला स्वतःकडे लक्ष द्यायला वेळच नसे. तिला कधी कधी विचार यायचा की माझी ही परिस्थिती बदलेल की अशीच राहील?????
काही वर्षांनी सुजाताचा मुलगा रोहन हा दहावीला गेला होता, त्याचं हे वर्ष खूप महत्त्वाचे होते, म्हणून सुजाता खूप लक्ष देत होती , त्याच्या खाण्या- पिण्याकडे, त्याचे सगळे व्यवस्थित करत होती.
ऐकुन सगळ्यांना नवल वाटेल, पण रोहन जेव्हा सकाळी शाळेत जायचा, तर त्याच्यासाठी साधा चहा देखील तिची जाऊ गॅसवर करू देत नव्हती.... का तर, तिचा गॅस संपेल म्हणून.
आणि चहा करायला दूध ही देत नव्हती, आणि सुजाता कडे पैसे नसायचे, कारण ती रोहनची शाळेची फी कशीतरी भरत होती, बिचारी सुजाता तिच्या मुलासाठी चूल पेटवून चहा करत असे, दूध नसायचे म्हणून तो मुलगा काळा चहा पिऊन शाळेत जात असे, हे सगळे सुजाताच्या सासू सासर्याणा दिसत होते, पण ते काही बोलायला
गेले की तिची जाऊ त्यांनाही शिव्या देत असे. त्यामुळे घरात कोणीच तिला काही बोलत नसे, पण सगळ्यात जास्त ती सुजातावर खूप अन्याय करत होती.
एवढ्या वर्षात तिने सुजाताला कधीच स्वयंपाक करू दिला नाही कारण किराणा तिचा होता म्हणून, कधी कधी मुलांची इच्छा व्हायची वेगळं काही खायची, पण सुजाताला बनवून देता येत नव्हते, एवढे सगळे ती मुलांसाठी आणि नवऱ्यासाठी सहन करत होती. हळूहळू तिच्या माहेरी कळू लागले, की सुजाता काय सहन करतेय म्हणून..., पण त्यांचेही हाथ बांधले गेले होते समाजामुळे.
रोहनची दहावीची परिक्षा झाली आता निकाल लागणार होता, तसा त्याने अभ्यास केलाच होता त्यामुळे त्याला विश्वास होता की तो पास होणार म्हणून, निकाल घेण्यास रोहन शाळेत गेला असता......,
निकाल बघून तो स्तब्ध झाला, त्याला काही सुचेनासे झाले..... तो खूप घाबरला होता, कारण त्याच्या घराची परिस्थिती ही त्यालाही माहित होती आणि सुजाताचे कष्ट ही त्याला माहित होते. घरी येऊन त्याने निकाल वडिलांना दाखवला, रोहन दहावीच्या परीक्षेत नापास झाला होता, एका विषयात कमी मार्क आल्यामुळे तो दहावी नापास झाला होता, हे सुजाताला कळताच पुन्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकली होती. तिने केलेले अतोनात कष्ट तिला पुन्हा दिसू लागले, रोहनच्या शाळेची फी, बसची फी, क्लासची फी ही तिने कशी भरली होती ते तिलाच माहीत होते....
तिला खूप दुःख झाले आणि ती रडू लागली....
पुढे चालू....,