Rutuja Thakur

Others


3  

Rutuja Thakur

Others


तरीही ती लढा देतच आहे - भाग सातवा

तरीही ती लढा देतच आहे - भाग सातवा

2 mins 9 2 mins 9

भाग सातवा


सुजाताने रागाच्या भरात रोहनला खूप मार मारले, कारण तिला आतून खूप संताप होत होता, तिला वाटत होते जणू काही आता सगळे आयुष्य थांबूनच गेले आहे, रोहनशी बोलत नव्हती. आता काही गरज नाहीये शाळेत जायची, घरीच बस म्हणून रोहनला ओरडू लागली. सुजाताला असे वाटू लागले की माझ्या कष्टातच काहीतरी कमी राहिली असेल, मीच कुठेतरी कमी पडलीय, म्हणून हे असे झाले.

मग शैलेशने तिला समजावले, तिच्या भावानी तिला समजावले, दोन तीन दिवसांत तिचा राग शांत झाला, मग कुठे जाऊन ती रोहनशी बोलली, रोहनला तो नापास झालाय म्हणून खूप वाईट वाटत होते, पण त्याने घरी सगळ्यांना सांगितले की ह्यावर्षी पुन्हा अभ्यास करेन आणि चांगल्या मार्कांनी पास होऊन दाखवेल. आता रोहनने मनाशी ठाम निश्चय केला होता की काहीही झाले तरीही ह्यावेळेस मी पास होणारच, कारण आईने केलेली मेहनत, कष्ट हे सगळे तो स्वतः बघत होता. रोहनच्या दोन्ही बहिणींची १२वी झाली होती, एक तर मामकडेच राहत होती, मामांनी साक्षीला पार्लरचा क्लास लावून दिलेला, ती क्लास करत होती. आणि दुसरी म्हणजेच सोनल ही मावशीकडे आली होती, तीही मावशीकडे राहून शिवणकामचा क्लास करत होती.

सुजाताने पुन्हा धीर धरला, आणि पुन्हा जोमाने कामाला लागली, ती बाहेरील ड्रेसही शिवत होती, घरातील कामे करूनही ती स्वतः कमवत होती. जाऊच्या दोन्ही मुलींचे लग्न झाले होते, चांगल्या घरात त्या सुखी होत्या.

आता वेळ होती ती सुजाताच्या मुलींच्या लग्नाची.

जाऊचा छळ हा सुजातामागे सुरूच होता. कधीकधी सुजाताला खूप रडू यायचे, की देव मलाच का इतके भोगायला लावतोय...???? काय चुकी केली होती मी??? मलाच इतक्या यातना का???

एकदा तर तिने स्वतःचे बरे वाईट करण्याचा विचार केला, कारण ती आता पूर्णपणे खचली होती, आतून तुटून गेली होती, जगण्याची मानसिकता नष्ट झाली होती, पण तिला तिच्या मुलांचे, नवऱ्याचा चेहरा समोर आला, माझ्यानंतर ह्यांचे काय होईल, कोण बघेल????

म्हणून परत खंबीर झाली ती बिचारी, आणि विचार केला की आता दुःख पदरी आले आहे पण नक्कीच कधीना कधी सुख ही येणार म्हणून फक्त तो दिवस येईल म्हणून ती पुन्हा जगू लागली.....

शैलेशचे वेळेवर जेवण, त्यांच्या गोळ्या औषधे ती वेळेवर देत होती, आता हळूहळू शैलेश हे चालू लागले होते, त्यांच्यात आता सुधारणा होऊ लागली होती. हे बघून सुजाताला आनंद झाला, कारण तिला माहित होते कधीना कधी शैलेश हे आधीसारखे होणार म्हणून... त्याची सुरुवात आता होऊ लागली होती, आणि सुजाताने आता ठरवून घेतले होते की कोणी कितीही बोलो, ऐकुन सोडून द्यायचे लक्ष द्यायचे नाही आपले काम करत राहायचे...,

हे ही दिवस निघून जातील......,

                           पुढे चालू....,Rate this content
Log in