सुमित संदीप बारी

Abstract Others

4.9  

सुमित संदीप बारी

Abstract Others

अंधश्रद्धा व त्या मागचे कारण

अंधश्रद्धा व त्या मागचे कारण

1 min
313


आपण सर्वांनी भरपूर लोकांना मांजर आडवी गेली तर रस्ता बदलताना किंवा त्या रस्त्याने न जाता दुसऱ्या रस्त्याने जातांना पाहिले असेल नाहीतर, तुम्ही स्वतः देखील असे केले असेल. तर यामागे खरचं काही कारण आहे का नुसती अंधश्रद्धा आहे? यामागील योग्य कारण जाणून घेऊयात...


     भरपूर वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, जेव्हा गाडीचा शोध लागला नव्हता. तेव्हा लोक बैलगाडी, घोडागाडी याने प्रवास करत, काही वेळेस रात्रीचा प्रवास करावा लागत असे. आता मनीमाऊचे डोळे हे रात्री चमकतात हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. मग घोडा, बैल हे रात्री त्या मांजरीचे चमकते डोळे पाहून घाबरत, व पुढे चालायचे नाही, खूप वेळ वाट पाहिल्यानंतर लोक रस्ता बदलत किंवा जायचे टाळत असत. पुढे जाऊन ही घटना अंधश्रद्धा बनली. 


आपणही अश्या अंधश्रद्धांना बळी न पडता, त्याच्या मागील असणाऱ्या खऱ्या कारणांचा उलगडा केला पाहिजे.


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract