Pratibha Tarabadkar

Abstract Inspirational

3.4  

Pratibha Tarabadkar

Abstract Inspirational

अलक

अलक

1 min
198


आईला बरं नाही असं वडीलांनी कळवलं होतं पण ऑफिसमध्ये प्रचंड काम,मुलाची परीक्षा इ.मुळे ती जावू शकली नव्हती.जरा उसंत मिळाली आणि लगोलग ती आईवडिलांना भेटावयास निघाली.

दारात तिची रिक्षा थांबताच कृश, वयामुळे थोडे वाकलेले वडील तिची बॅग घेण्यासाठी पुढे झाले.लेक आली म्हणून आनंदाने लुकलुकणारे त्यांचे डोळे बरंच काही सांगून गेले.

आईला बघण्यासाठी ती बेडरुममध्ये गेली तर आई तिथे नव्हती.

'हातपाय धुवून लगेच जेवायलाच बस गं',आपलं आजारपण विसरून लेकीसाठी पोळ्या लाटणाऱ्या आईला ओट्यापाशी पाहून भरुन आलेले डोळे तिने हळूच पुसले.



Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract