Pratibha Tarabadkar

Abstract

4.5  

Pratibha Tarabadkar

Abstract

अलक

अलक

1 min
381


अलक

   

 तिने वड्या थापून त्यांचे चौकोनी तुकडे पाडले.वड्यांकडे पाहून ती आनंदीत झाली.अगदी आईसारख्या जमल्यात.आईला सांगण्यासाठी तिने मोबाईल उचलला आणि इतका वेळ उत्साहाने लुकलुकणारे डोळे पाण्याने डबडबले.

तिची आई तर मागच्याच महिन्यात देवाघरी गेली होती.


  अलक(२)


   सकाळी तिला जाग आली तेव्हा अंग कसकसत होतं.गेले आठ दिवस कामवाली न आल्याने काम करुन ती दमून गेली होती.भांड्यांच्या आवाजाने ती उठून बसली.बनियन आणि पायजमा पूर्ण भिजलेला असा नवरा डोकावला आणि त्याने विचारले, 'भांडी घासून झाली आता चहा टाकू का?' तिनं हसून मान डोलावली.

तिला वाटलं,'प्रेम फक्त शब्दांनीच व्यक्त होतं असं थोडीच आहे? कृतीतून ही व्यक्त करता येतं की!'



  अलक(३)  


    उलट्यांनी बेजार झालेल्या सुनेच्या पाठीवरुन मायेने हात फिरवत सासू म्हणाली,'बाई ग,हे गर्भारपण,बाळंतपण म्हणजे आपल्या बायकांची सत्वपरीक्षा असते!'

आणि त्या क्षणापासून इतके दिवस परकी वाटणारी सासू तिची दुसरी आईच झाली.



Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract