आवड
आवड
तशी लहानपणापासूनच गायनाची आवड होती तेजाला, म्हणून तिच्या आईने तिला संगीत क्लासमध्ये तिचं नाव घातलं, आणि तेजाही अतिशय आनंदाने क्लासला जायची. खरंतर तेजाच्या बाबांना ते आवडायचं नाही, पण त्यांनी कधी बोलून नाही दाखवलं की त्यांना संगीत आवडत नाही. आज तेजा उत्तम गाणी म्हणते आणि तिचा आवाज तिची ओळख बनलाय, खरंच पालकांनी त्यांच्या मुलांचा कल ओळखायला व त्यांना प्रोत्साहन द्यायला शिकलंच पाहिजे नाही का!
