आठवणी (अलक)
आठवणी (अलक)
रम्य ते बालपण आपण म्हणतो ते किती बरोबर आहे नाही का! मी लहान असताना माझी आजी मला दररोज न चुकता गोष्टी सांगायची, मग त्या गोष्टी रामायण महाभारतातील असोत, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल असोत, इसापनीती असो किंवा अजून काही..आजी म्हणजे चालतंबोलतं विद्यापीठ होती माझ्यासाठी... अशी एकही रात्र गेली नाही ज्या दिवशी मी गोष्ट ऐकली नाही! पण आता ना की ती उरलीय आणी तिच्या गोष्टी! पण तिच्या प्रत्येक आठवणीतून ती मला भेटत असते, खरंच आठवणी कधीच जुन्या होत नाहीत ते खरंय...
