Author Sangieta Devkar

Abstract Romance

4.0  

Author Sangieta Devkar

Abstract Romance

आस तुझी

आस तुझी

3 mins
213


आज दिवसभर पावसाने नुसता उच्छाद मांडला होता. वंदना चे कामात लक्षच लागत नवहते. सकाळी प्रशांत ला बोलली होती की आज सुट्टी घे नको जाऊ ऑफिस ला.पण महत्वाचे काम आहे जायला हवे म्हणून प्रशांत गेला.

वंदना सारख आपले टी व्ही वर न्यूज बघत होती. मुंबईत पाऊस मुसळधार पडत होता. काय ग वंदना ,सारख्या बातम्या का बघतेस आई नी विचारलेच.

अहो आई आज पाऊस किती पडतोय बघा,मला यांची काळजी वाटू लागली आहे.

अग मुंबई चा पाऊस आज तू ओळखतेस का? होईल कमी.

दुपारी एकदा वंदना ने प्रशांत ला कॉल केला. तो ठीक आहे आणि संध्याकाळी व्यवस्थित घरी येईल बोलला.

दुपार नंतर अचानक पाऊस वाढला. काही ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली. बसेस आणि रेल्वे ही पावसात अडकल्या. रस्त्यावर पाणीच पाणी झाले होते. प्रशांत विरार ला रहात होता आणि चर्चगेट ला त्याचे ऑफिस होते. ती रेल्वे लाइन ही बंद झाली. वंदना ने त्याला कॉल लावला पण नॉट रीचेबल लागत होता. कदाचित पावसा मुळे फोन सेवा ही विस्कळीत झाली होती.


संध्याकाळ झाली वंदना ने देवा समोर दिवा लावला,हात जोडून देवाला विनंती केली की प्रशांत जिथे असेल तिथून सुखरूप घरी येवू दे.

इकडे प्रशांत ऑफिस मधून बाहेर पडला होता आणि रेल्वे मध्ये अडकला होता. त्याच्या सोबत अनेक घरी जाणारे लोक त्या ट्रेन मध्ये अडकले होते. रेल्वे ट्रॅक पाण्या ने जाम झाला होता. पाण्यात ट्रेन सुरू करणे अवघड होते. पोलिसांनी सगळयांना जिथे आहात तिथेच थांबून रहा अस सांगितले होते. प्रशांत ही काळजीत होता घरी कसे कळवायचे याचा विचार करत होता. त्यात फोन ही बंद झाला होता. सगळ्याच ट्रेन्स एका जागी थांबून होत्या.

आई बाबा कधी येणार ग ? छोटी पूर्वा वंदना ला विचारत होती. पण वंदना गप्प होती. टी व्ही वर जागोजागी झाडे आणि पोल पडलेले दाखवत होते. वाहतूक ठप्प झाली होती. वंदना मनातून खूप घाबरली होती. घरात सासू आणि सात वर्षाची पूर्वा . आता आई ही प्रशांत ची चिंता करू लागली. प्रशान्त ची काही च बातमी समजत नवहती. पाऊस बाहेर कोसळत होता आणि अचानक लाईट्स ही गेले. पूर्वा घाबरून वंदना च्या कुशीत शिरली. आई जपमाळ घेऊन देवाचा जप करत राहिल्या. वंदना ने इमर्जन्सी लाईट लावली . ती स्वामींची परम भक्त होती. मना पासून तिने स्वामींना साकडे घातले. देवा हा पाऊस थोडा वेळ थांबू दे आणि माझा नवरा सुखरूप घरी येऊ दे अशी विनवणी करत होती. कसेबसे दोन घास खाऊन वंदना ने पूर्वा ला आणि आई ना झोपायला लावले. मी आहे नका काळजी करू अस सांगितले.

वंदना ला प्रशांत ची खूप काळजी वाटू लागली. तो कुठे आहे? ऑफिस मधून निघाला होता की नाही? की ट्रेन मध्ये आहे की अजून कुठे वाटेत अडकला ? काही ही समजत नवहते. ती ही पडून राहिली पूर्वा जवळ. रात्रीचे एक वाजत आला होता. अजून ही प्रशांत चा पत्ता नवहता. त्याच्या विचारात अश्रु ढाळत झोपी गेली.

मध्यरात्री दाराचा आवाज झाला. लाईट्स अजून आले नवहते. वंदना,ये वंदना दार उघड . प्रशांत चा आवाज ऐकू आला तशी वंदना पटकन जागी झाली आणि दार उघडले तर दारात पूर्णपणे भिजलेल्या अवस्थेत प्रशान्त उभा होता. " अहो,तुम्ही ठीक आहात ना म्हणत वंदनाने त्याला मिठी मारली.

हो वंदू मी ठीक आहे.

पण तुम्ही घरी कसे आलात. लोकल तर बंद आहे मग?

वंदू अग मी ऑफिस मधून निघालो आणि ट्रेन मध्ये बसलो आणि पाऊस वाढला. मग काय सगळी वाहतूक बंद. ट्रेन मध्येच अडकून होतो. थोड्या वेळाने मग एन डी आर एफ चे जवान आले आणि त्यांनी आमची मदत केली. त्यांच्याच गाडी ने मला इथं पर्यंत सोडले.

मी खूप घाबरले होते. आई सुद्धा.

त्यांचा आवाज ऐकून आई ने विचारले "वंदना आला का ग प्रशान्त?

हो आई आले ते,झोपा तुम्ही .

प्रशान्त कपडे बदलायला गेला. वंदना ने स्वामीं समोर हात जोडले आणि त्यांचे आभार मानले.

" "किती सोसले मी तुझे

माझे एवढे ऐक ना :

वाटेवरई माझा सखा

त्याला माघारी आण ना;


वेशीपुढे आठ कोस

जा रे आडवा धावत;

विजेबाई, कडाडून

मागे फिरव पांथस्थ;


आणि पावसा, राजसा

नीट आण सांभाळून :

घाल कितीही धिंगाणा

मग मुळी न बोलेन;"

(कवयित्री--- इंदिरा संत)

अशी तिची अवस्था झाली होती पण आता ती निश्चिन्त होती.


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract