आली माझ्या घरी ही दिवाळी
आली माझ्या घरी ही दिवाळी
आली माझ्या घरी ही दिवाळी
आली माझ्या घरी ही दिवाळी...
" अर्ध्या तासात येते अस म्हणून गेलेली ही, अजून कशी नाही आली रे? " दीपाताईंनी त्यांच्या लेकाला मनोजला विचारलं..
" हो ना..एक महत्वाचं काम आहे अस म्हणून गेली..आता तासभर तरी होऊन गेला..
आता एवढी छान दिवाळी पहाट आहे.. समोरच गाण्याचा कार्यक्रम सुरू आहे...मी म्हणल हीच आवरलं की खाली जाऊ, थोडा वेळ गाणी ऐकू, घरी येऊ..फराळ करून देवळात जाऊ , तर ही कुठे जाऊन बसली कोण जाणे?" मनोज बेडरूम मधून बोलला..
तेवढ्यात बेल वाजली.." दार कोणी बंद केलं दिवाळी असून" अस बोलत दिपाताईनी दार उघडलं..
बघतात तर समोर त्यांची धाकटी बहीण आणि तिची लेक वीणा दारात...
" अय्या..तू? " अस म्हणत त्यांनी त्यांच्या बहिणीला वनिताला दारातच मिठी मारली..डोळ्यात पाणी होत..ते आवरत तिला घरात आणलं.. वनिताच्या डोळ्यात ही पाणी होत..
आणि मागे त्याचं सामान घेऊन उभी होती..त्यांची सून सरिता..
दीपाताई आश्चर्याने तिच्याकडे पहात बसल्या...तिने नजरेने खूण केली..सांगते अशी..
खर तर दीपाताईंच्या ही खूप मनात होत वनिताला दिवाळीसाठी घरी चार दिवस रहायला बोलवावं अस..पण अप्पांना विचारायची हिंमत न्हवती..त्यांना माणसांची फारच नावड..
त्याच अस झालं होत..सहा महिन्यापूर्वीच वनिताचे मिस्टर अचानक हार्ट फेल होऊन गेले..ध्यानी मनी नसताना घरावर दुःखाचा डोंगर कोसळला..
वनिताच लव मॅरेज होत..अनुप साऊथ इंडियन होता.. घरच्यांचा विरोध होता..तो ही दोन्ही घरचा..तरी लग्न करून दिलं होत दोघांच्या आईवडलांनी कर्तव्य म्हणून..पण फारस नातं न्हवत..
पण गोरीपान, देखणी नात, वीणा बघून सर्व मावळले
आणि थोडा ताण कमी झाला..
अनुप हुशार होता, पण आर्थिक परिस्थिती बेताची होती...
त्याने खूप मेहनत करून स्वतः ला सिद्ध केलं होत..फ्लॅट, गाडी सर्व घेतल होत..आत्ता कुठे सुखाचे दिवस आले होते..आणि हा आघात..अचानक अनुपची ट्रान्स्फर इथे झाली आणि दोन्ही बहिणी एका गावात.. कल्याणमध्ये आल्या..
अनुप गेल्यावर दीपाताई बरेचदा वनिताकडे जायच्या..
एक दिवस अप्पा बोलले, " आता बास हे बहीण प्रेम..जास्तच होतंय.." मग नाईलाजाने त्यांनी जाणं कमी केलं..फोनवर मात्र खूप बोलण व्हायचं..तेवढीच दुधाची तहान ताकावर..दुसर काय?
बाकी सगळ ठीक होत, तरी अप्पांचा स्वभाव फारच माणूसघाणा होता..त्यामुळे सगळेच थोडे दूर..
सून आल्यावर काय होईल अशी काळजी दीपाताईंना वाटायची..पण सरिताने खूप आपलंसं केलं सर्वांना..त्यामुळे घरात थोडा मोकळेपणा आला होता..
दीपाताईंच्या डोळ्यासमोरून भूतकाळ सरकुन गेला आणि एक धास्ती ही...
त्यांनी अहोकडे त्याच नजरेने पाहिलं..तर ते मंद स्मित करत होते..हे पाहून तर त्यांना धक्काच बसला..
त्यांनी सरिताकडे परत एकदा पाहिलं..तिची आश्वासक नजर त्यांना निवांत करून गेली...
सरिता स्वतः फ्रेश होऊन आली आणि वनिता मावशी आणि वीणालाही फ्रेश होऊन या म्हणाली..
किचन मधुन सगळा फराळ , प्लेट्स घेऊन आली.. फक्कड आल घालून सर्वांना आवडतो तसा चहा करण्यासाठी परत किचनमध्ये आली..
मनोजही पाठोपाठ किचन मध्ये आला.. त्याच्याही चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होत..तिने सगळ ओके अस सांगितल आणि त्याने हळूच इकडे तिकडे बघत तिच्या गालावर अलगद ओठ टेकले ..ती लाजली..आणि तो हसत हॉलमध्ये गेला..
फराळ, चहा झाला..
मग दीपाताई आणि ती बेडरूम मध्ये आली.. " आई..काही काळजी करू नका.. अप्पांशी बोलून, मी वनिता मावशी आणि वीणाला दिवाळीसाठी चार दिवस राहण्यासाठी घेऊन आलेय..आणि हो भाऊबीजेला वर्षा आत्त्या ही येणार आहेत ह..ते ही बोलणं झालंय त्यांच्याशी..तुम्ही आता सगळी चिंता सोडून दिवाळी मस्त एन्जॉय करा..." सरिता त्यांना प्रेमाने थोपटत बोलली..
दीपाताईंना खूप गहिवरून आल...
" सुखी रहा बेटा..किती मनकवडी आहेस ग ..माझ्या खूप मनात होत ग..पण ह्याच्या माणूसघाण्या स्वभावामुळे हिंमतच झाली नाही बोलायची..तू मात्र त्यांना प्रेमाने जिंकलस ग..मला जे जमल नाही ते तू केलस..मला ना अस पोटात शिरून प्रेम लावताच येत नाही..मी आपल स्वभाव कधी बदललायचा नाही, हाच ग्रह करून घेतला होता..खूप बर वाटल.. खरच..कौतुक वाटत तुझ मनापासून.." दिपाताई अगदी मनापासून बोलल्या..
त्यांचं हे बोलणं त्यांचे मिस्टर, अप्पा बाहेरून ऐकत होते..ते आत आले आणि म्हणाले, " दीपा.. खरच माझ्या अश्या स्वभावामुळे तुला माणसांची आवड असून कधी कोणाला फारस घरी बोलवायला जमल नाही...मी ही कधी ह्या स्वभावाला मुरड घातली नाही..सूनबाईने मला वेगळा दृष्टीकोन दिला.. आणि मग माझ्या लक्षात आलं..माफ कर मला.."
" अहो..काहीतरीच काय? मीच कधी नीट प्रयत्न केला नाही..आपल्या सरिताने बघा, कस छान सांभाळून घेतल सगळ.."
" आजपासून तुला प्रॉमिस करतो..तुला ज्यांना ज्यांना घरी बोलवायचं आहे, त्यांना तू बोलावू शकतेस .. मी ही त्यांचं आनंदाने स्वागत करेन..हे तुला माझ दिवाळी गिफ्ट.."
" शेवटी काय..तर आनंदापाशी आनंद..हो ना सूनबाई.."
अस म्हणत अप्पा खळखळून हसले.. दिपाताई त्यांच्या कडे आणि सूनेकडे कौतुकाने बघत हसत होत्या आणि " आली माझ्या घरी ही दिवाळी" चे सुर बाहेर आनंद पसरवत होते..
